लोकसभा निवडणुकीचं वातावरण हे चांगलंच तापलेलं देशभरात दिसून येतं आहे. महाराष्ट्रात आणि देशात ७ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला. या तिसऱ्या टप्प्यानंतर आता वेध लागले आहेत ते चौथ्या टप्प्याचे. चौथ्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. याच दरम्यानचा अमित शाह यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. इंस्टाग्रामवर या व्हिडीओची चर्चा होते आहे.

अमित शाह प्रचारात प्रचंड व्यग्र

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचारात प्रचंड व्यग्र आहेत. महाराष्ट्रातही ते सभा घेत आहेत. तसंच मुलाखतीही देत आहेत. विविध वाहिन्यांना अमित शाह ज्या मुलाखती देत आहेत त्यातून ते मोदी सरकारने दहा वर्षांत केलेला विकास आणि पुढच्या पाच वर्षांचा अजेंडा काय असणार? हे मांडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्या सभांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. अशातच एका सभेसाठी जात असताना त्यांना गर्दीतून एकाने ओ अमित काका अशी हाक मारली.

pm narendra modi remarks criticising opposition alleging suppressing my voice
Budget 2024 : ‘मध्यमवर्गाचे सशक्तीकरण करणारा अर्थसंकल्प’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया
supriya sule
अमित शाह यांची शरद पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “याच शरद पवारांना मोदी सरकारने…”
PM Narendra Modi has shared this important PC laptop security tip
सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सांगितला कानमंत्र! स्वतः पाळतात ‘ही’ एक गोष्ट
8 year old girl raped in andhra pradesh Crime news
धक्कादायक! शाळेतील मित्रांकडूनच आठ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; श्वान पथकाने आरोपींचा ‘असा’ काढला माग
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Sanjay Raut on Pm Narendra Modi Speech
‘बालबुद्धीच्या नेत्यानेच मोदींना घाम फोडला’, संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका
Vidhan Parishad Adhiveshan Devendra Fadnavis Ambadas Danve
अंबादास दानवेंवरील कारवाईच्या प्रस्तावावर चर्चेला नकार दिल्याने विरोधकांचा गोंधळ, फडणवीस संतापले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi debut as Leader of the Opposition first speech aggression
राहुल गांधींच्या भाषणावर मोदी-शाहांसह सत्ताधाऱ्यांनी का नोंदवला आक्षेप?

हे पण वाचा- शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी, शाह यांचे आभार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय आहे?

अमित शाह गर्दीतून सभेसाठी जाताना दिसत आहेत. गर्दी त्यांना पाहण्यासाठी उभी आहे. कॅमेरेही लागले आहेत. तितक्यात गर्दीतून हाक येते “ओ अमित काका SS” त्यानंतर सगळेच हसू लागतात. सभेसाठी जाणारे अमित शाह काही सेकंद थांबतात. आवाजाच्या दिशेने पाहतात आणि स्मित हास्य करतात. त्यानंतर जय श्रीराम चा नारा येतो. हे पाहून अमित शाह गर्दीपुढे हात जोडतात आणि अभिवादन करतात आणि पुढे जातात. @streets.of_ahmedabad या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकेश प्रजापती यांचं हे अकाऊंट आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या व्हिडीओला मागच्या २४ तासांमध्ये १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच युजर्सनी विविध कमेंटही केल्या आहेत.

हे पण वाचा- देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका, “उद्धव ठाकरे कागदी वाघ, त्यांनी आयुष्यात..”

पाहा व्हिडीओ

युजर्सच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया काय?

जय श्रीराम ही घोषणा अनेकांनी कमेंटमध्ये लिहिली आहे. अमित शाह या काळातले लोहपुरुष आहेत असं म्हणत काहींनी त्यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केली आहे. अमित काका नाही मोटा भाई म्हणायचं होतं ते सगळ्यांचे मोटा भाई आहेत असंही एका युजरनी लिहिलं आहे. अमित शाह यांना ज्या मुलाने हाक मारली त्याला खूप आनंद झाला असेल. असंही काही युजर्सनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ अहमदाबादमधला असावा. व्हिडीओ गुजरातमधला आहे हे समजू शकलं आहे. मात्र व्हिडीओची सोशल मीडियावर भलतीच चर्चा आहे.