कर्नाटक विधानसभा निवडणुकांची उत्सुकता अवघ्या देशाला लागून राहिली होती. आज या निवडणुकांचे निकाल हाती येणार असून त्यावर पुढील निवडणुकांची राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. एकीकडे कर्नाटकच्या सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडीच्या दिशेनं आगेकूच केलेली असताना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून यासंदर्भात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या निकालांसंदर्भात प्रतिक्रिया देताना थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

“यातून एक संदेश आहे की मोदी…”

“हा सगळ्यांसाठी एक संदेश आहे की मोदी है तो मुमकिन है असं काहीही नसतं. मोदींनाही हरवता येऊ शकतं”, असा उल्लेख सुषमा अंधारेंनी टीव्ही ९ शी बोलताना केला आहे.

Lok Sabha Election 2024
“भाऊ म्हणून मी पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार”, रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “अजितदादा विसरले असतील, पण…”
lok sabha 2024, mahayuti, no Rebellion, maha vikas aghadi, keshav upadhye, bjp spokesperson, maharshtra politics, maharashtra, marathi news, politics news, ajit pawar ncp, eknath shinde shivsena, nashik, maharashtra news,
राज्यात महायुतीमध्ये बंडखोरी अशक्य – केशव उपाध्ये यांना विश्वास
Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
Ajit Pawar on Vijay Shivtare Question Marathi News
Ajit Pawar: “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले; विजय शिवतारेंबाबत मांडली भूमिका!

…तरी विजय भाजपाचाच? केंद्रीय नेत्यानं मांडलं गणित; दिली तीन निवडणुकांची आकडेवारी!

कर्नाटक निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम?

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत सुषमा अंधारेंनी कर्नाटक निवडणूक निकालांचा महाराष्ट्रावर होऊ शकणारा परिणाम सांगितला आहे. “महाराष्ट्रावर याचा परिणाम म्हणजे ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी तिथे जाऊन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, गरज नसताना बजरंगबलीचा मुद्दा फडणवीसांनी काढला. या सगळ्याचा तिथे अजिबात फायदा झाला नाही. त्यामुळे आता असे कार्ड ते महाराष्ट्रात वापरताना दहा वेळा विचार करतील”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

“‘या’ एका घोषणेने कर्नाटकात भाजपाचा पराभव”, सचिन पायलट यांनी सांगितलं काँग्रेसच्या विजयाचं कारण

“जे कार्ड कर्नाटकात चालले नाहीत, फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात लोक हे कार्ड अजिबात चालू देणार नाहीत. नक्कीच लोक यातून धडा घेतील की बजरंगबली हा राजकारणाचा विषय असू शकणार नाही. तो आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. पण भाजपा जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरते, तेव्हा ती धर्म आणि महापुरुष यांच्यामागे लपायचा प्रयत्न करते”, अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी भाजपावर हल्लाबोल केला.