आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या उत्तरप्रदेशातलं राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. सध्या प्रचारसभा, रॅली यांच्यावर बंदी असली तर डिजीटल माध्यमातून सर्वच राजकीय पक्ष आपापला प्रचार पूर्ण ताकदीनं करत आहेत. २२ जानेवारीपर्यंत निवडणूक आयोगाने सर्व प्रचारसभा, रॅली यांच्यावर बंदी घातलेली असली तरी ऑनलाइन माध्यमातून प्रचार करण्याला परवानगी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदारसंघ वाराणसी इथल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्याला नैसर्गिक शेतीवर भर देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहन द्यायला हवं. आपल्याला प्रत्येकाला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाशी जोडून घ्यायला हवं. प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. लोकांना मतदानाचं महत्त्व समजावून सांगायला हवं.

उत्तरप्रदेशासोबतच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांसोबतचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच राजकीय कार्यक्रम होता. निवडणूक आयोगाने करोनाच्या पार्श्वभूमीवर रोड शो, प्रचारसभा, रॅली यांच्यावर २२ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. २२ जानेवारीनंतर करोनाची परिस्थिती पाहून निवडणूक आयोग ही बंदी हटवायची की पुढे तशीच ठेवायची याविषयी निर्णय घेणार असल्याचं झी न्यूजचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi uttar pradesh assembly election 2022 vsk
First published on: 18-01-2022 at 14:12 IST