उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांमधल्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. पंजाबमध्ये वर्षानुवर्षे सत्ता हातात असलेल्या काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाचा दारुण पराभव करत आम आदमी पक्षाने बाजी मारली. आपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून भगवंत मान यांना पुढे आणलं. या निकालानंतर मान यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीत ते केजरीवाल यांच्या पायाही पडले. या वेळचा व्हिडीओ आता समोर आला आहे.


आपनं पंजाबमध्ये ११७जागांपैकी ९२ जागांवर विजय मिळवला आहे. आज भगवंत मान नवी दिल्ली येथे अरविंद केजरीवाल यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी केजरीवाल यांची भेट होताच भगवंत मान केजरीवाल यांच्या पाया पडले. यावेळी आपचे नेते मनीष सिसोदिया देखील उपस्थित होते. पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी आज दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मान यांनी केजरीवाल यांना शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिलं.

Lok Sabha Elections Union Minister Jitendra Singh from Udhampur Constituency in Jammu Congress challenge to him
जितेंद्र सिंह यांच्यापुढे एकत्रित विरोधकांचे आव्हान
PM Narendra Modi On Rahul Gandhi
‘युवराज’ उत्तर प्रदेशातली जागा वाचवू न शकल्याने केरळमध्ये आले; मोदींचा राहुल गांधींवर हल्ला
Brand Thackeray
ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे… उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… ठाण्यासाठी रॅप गाणे
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप


पंजाबमध्ये आपचे केवळ २० आमदार होते. मात्र, आपने चांगली कामगिरी केल्याने पंजाबच्या मतदारांनी ‘आप’ला भरभरून मतदान केलं. आपचे ९२ आमदार पंजाबच्या लोकांनी निवडून दिले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला केवळ १८, अकाली दल आघाडीला चार, भाजप आघाडीला दोन आणि इतरांचा एका जागेवर विजय झाला आहे.


भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी त्या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी माझा लहान भाऊ भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. ते आज माझ्या घरी शपथविधीचं आमंत्रण देण्यासाठी आले होते. मला पूर्ण विश्वास आहे की भगवंत मान एक मुख्यमंत्री म्हणून पंजाबच्या प्रत्येक लोकांची इच्छा पूर्ण करतील, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.


आपचे भगवंत मान हे येत्या १६ मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्या आधी १३ मार्च रोजी भगवंत मान हे अरविंद केजरीवाल यांच्यासह अमृतसरमध्ये भव्य रोड शो करणार आहेत.