अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, यशोमती ठाकूर आदी दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांत टीका केली. भाषणात त्यांनी अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यावर नाव न घेता टीका केली. यासंदर्भात बोलताना शरद पवारांनी आपली चूक झाली, असं थेट विधान केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

“मी इथे आलोय तुम्हाला एक गोष्ट सांगण्यासाठी. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना अमरावतीकरांनी खासदार केलं. पाच वर्षांचा त्यांचा अनुभव बघितल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली. ही चूक आता पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे”, असं शरद पवार म्हणाले.

ajit pawar sharad pawar
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “साहेब जर आम्हाला…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
eknath shinde bhavna gavli hemant patil
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेनं भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
eknath shinde and uddhav thackeray (2)
उद्धव ठाकरेंबरोबर वादाची ठिणगी का पडली? एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘वर्षा’वरील तो प्रसंग; म्हणाले, “मला दोन तास…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरद पवारांची टीका

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. “देशातली सत्ता मोदींच्या हातात आहे. गेली १० वर्षं आपण बघतोय. अनेक ठिकाणची त्यांची भाषणं ऐकतोय. काय सांगतात ते हल्ली?” असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.

“आज संसदेत अशी कुणी व्यक्ती नाही जी एकाही दिवसाचा खंड न पाडता ५६ वर्षं सतत निवडून येतेय. या काळात अनेकांना जवळून आणि लांबून पाहिलं. इंदिरा गांधींना पाहिलं. राजीव गांधींचं काम पाहिलं. नरसिंह रावांचं काम पाहिलं. त्यांच्या मंत्रीमंडळातही काम केलं. मनमोहन सिंह यांच्यासोबतही काम केले. जवाहरलाल नेहरूंनंतरच्या सर्व पंतप्रधानांच्या कामाची पद्धत आम्ही पाहिली. देशाच्या कानाकोपऱ्या जायचं, भाषणं करायची, त्या भाषणातून नवा भारत कसा उभा करता येईल, यासाठी लोकांचा आत्मविश्वास वाढेल असा संदेश या सर्व राज्यकर्त्यांनी दिला. आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा नेहरूंवर टीका करतात. काँग्रेसवर टीका करतात”, असं शरद पवार म्हणाले.

“फडणवीसच नव्हे, मविआच्या काळात आणखी तीन भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला”, एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप

“नेहरूंनी स्वातंत्र्यपूर्व काळात आयुष्याच्या उमेदीची १० ते ११ वर्षं इंग्रजांच्या तुरुंगात घालवली. स्वातंत्र्यानंतर देश संसदीय लोकशाही पद्धतीने चालायला हवा यासाठी एक रचना उभी केली. त्या नेहरूंचं योगदान या देशाच्या इतिहासात कुणी पुसू शकत नाही. त्यांच्यावर आज पंतप्रधान टीका करतात, चुकीच्या गोष्टी सांगतात”, अशा शब्दांत शरद पवारांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.

नागपुरात फक्त ५४ टक्के मतदान – शरद पवार

दरम्यान, नागपूरमधील मतदानाची टक्केवारी सांगत शरद पवारांनी त्यावर चिंता व्यक्त केली. “ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीचा पहिला टप्पा संपला. झालेलं मतदान चिंता करण्यासारखं आहे. नागपुरात ५४ टक्के मतदान झालं. गडचिरोलीत ७० टक्के मतदान झालं. गडचिरोलीचा आदिवासी ७० टक्के मतदान करतो आणि नागपूरचा सुविद्य माणूस ५४ टक्क मतदान करतो. यातून काहीतरी शिकलं पाहिजे”, असं ते म्हणाले.