लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडले. आता पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्याचील प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सटाणा या ठिकाणी जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मोदींची बुधवारी नाशिक जिल्ह्यात जाहीर सभा पार पडली. मात्र, या सभेत कांद्याच्या प्रश्नावर मोदी काहीच बोलले नाहीत, त्यावरून शरद पवारांनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली. ‘शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नसेल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, असा इशारा पवारांनी दिला.

शरद पवार काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात आणि आमच्यावर टीका करतात. मोदींनी आमच्यावर टीका केली तरी आमच्या अंगाला भोक पडत नाहीत. खुशाल टीका करा. आम्हाला त्याची चिंता नाही. आम्हाला चिंता ही शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध कसे होईल याची आहे. यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे ते जनतेला सांगा. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाहीत. शेतमालाच्या किंमती वाढू म्हणून सांगितलं. मात्र प्रत्येक्षात काहीही केलं नाही. शेतकऱ्यांना लागणाऱ्या खतं आणि औषधांच्या किंमती कमी करू म्हणून सांगितलं पण केल्या नाही. आज शेतकरी जे पिकवत आहेत त्याला चांगली किंमत मिळत नाही. त्यामुळे जो तुमच्या मेहनतीला किंमत देत नाही, त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही”, असा हल्लाबोल शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

arvind kejriwal narendra modi (1)
Video: “त्यांनी देवेंद्र फडणवीस, खट्टर यांना संपवलं, आता एकच व्यक्ती…”, अरविंद केजरीवाल यांचं मोठं भाष्य!
Sharad pawar on Ajit Pawar baramati
बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचाराला अनुपस्थित; शरद पवार काळजी व्यक्त करत म्हणाले, “ते…”
arvind kejriwal
“ही तर यंत्रणेला लगावलेली चपराक”, सर्वोच्च न्यायालयात केजरीवालांच्या भाषणांचा संदर्भ देत ईडीने काय म्हटलं?
sharad pawar raj thackeray
“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”, शरद पवारांचा टोला, ‘त्या’ टीकेवर दोन वाक्यात प्रत्युत्तर
Pm Narendra modi Speech in Nashik
“मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला..”, पुढे नेमकं काय घडलं?
eknath shinde bags checking
नाशिकला उतरताच मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची हेलिपॅडवरच तपासणी, निवडणूक आयोगाला काय काय आढळलं?
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
raj thackeray prakash ambedkar
“राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होण्याची शक्यता”, प्रकाश आंबेडकरांचा दावा; वेळही सांगितली, “शिवशक्ती-भीमशक्तीबाबत म्हणाले…”

हेही वाचा : मोदींची नक्कल करणाऱ्या श्याम रंगीलाचा वाराणसीतून उमेदवारी अर्ज फेटाळला; कारण काय?

ते पुढे म्हणाले, “आपला देश महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचाराने चालवण्याची गरज आहे. आपल्या देशाची जवळपास तीन हजार किलोमीटर जागा चीनने ताब्यात घेतली आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनने रस्ते तयार केले आहेत. त्या ठिकाणी काही घरेही बांधली आहेत. या देशाच्या संरक्षणाला धोका पोहोचेल असे काम होत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतेही ठोस पाऊल उचलत नाहीत. जी परिस्थिती आपल्याला दिसते ती स्थिती बदलायची असेल तर या निवडणुकीत भाजपाचा पराभव करणं गरजेच आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“आज देश मोदींच्या हातामध्ये आहे. ते बुधवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. ते नाशिकच्या दौऱ्यावर आले तेव्हा अपेक्षा होती की, नाशिक, सोलापूर, सातारा, पुणे या सर्व भागात शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न आहे. त्यावर ते बोलतील. मात्र, ते बोलले नाहीत. सरकारने कांद्याची निर्यात थांबवली आहे. त्यामुळे कांद्याचे दर पडले आहे. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील असे काम केले पाहिजे. मात्र, आज काय परिस्थिती आहे”, अशी टीका असं शरद पवार यांनी केली.

शरद पवारांनी भाषण आटोपतं घेतलं

धुळे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सटाण्यात सभा पार पडली. मात्र, या सभेवेळी मोठ्या प्रमाणात वादळ सुटले होते. त्यामुळे सभेसाठी लावलेले मंडप जोरदार वाऱ्यामुळे उडत होते. तसेच व्यासपीठाच्या मागच्या बाजूला लावलेलं बॅनर वाऱ्यामुळे पडले. हे पाहून शरद पवार यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं.