मी वादळात उभा राहणार आहे, संकटांना तोंड देणार आहे. येऊदे किती संकटं मी उभा ठाकलो आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी परभणीतल्या भाषणाला सुरुवात केली. उद्धव ठाकरे बोलत असताना पाऊस आला. त्या पावसातही त्यांनी भाषण केलं.महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव ह्यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीका केली.

परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला

“माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे ही परभणी आहे. माझ्यासमोर सगळे माझे मावळे बसले आहेत. मिंधे आणि भाजपा यांना वाटलं असेल की पैशांनी सगळं घेता येतं पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत. आपली परीक्षा आहे. वादळला अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे. पाठीवरुन आम्ही वार करत नाही.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Priyanka Gandhi Vadhera candidate from Wayanad  Rahul gandhi MP from Rae Bareli continues
प्रियंका गांधी-वढेरा वायनाडच्या उमेदवार; राहुल यांची रायबरेलीची खासदारकी कायम
Kiran Mane Post on Gautam Buddha
किरण मानेंची पोस्ट चर्चेत, “…आणि ब्राह्मण्यवादावर धम्माने नेत्रदीपक विजय मिळवला”
Chandrakant Khaire
“मी एकटा पडलो”, पराभवानंतर चंद्रकांत खैरेंचं विधान; म्हणाले, “काही लोकांवर संशय, उद्धव ठाकरेंकडे…”
Rajiv Shukla, bjp, claim,
“चारशेच्या दाव्याची हवा निघाली”, काँग्रेस नेते राजीव शुक्लांची भाजपवर टीका; म्हणाले, “विरोधी पक्षांना ज्याप्रमाणे…”
Khalistani separatist amritpal singh indira gandhi assassins son lead in punjab
इंदिरा गांधींच्या मारेकर्‍याचा मुलगा आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल आघाडीवर; कारणं काय?
Narendra Modi
मोदींचा नवीन पटनायक यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, “बीजेडीने लुटलेले पैसे कुठंही ठेवले तरी एक एक…”
MP Swati Maliwal
अरविंद केजरीवालांना अटक झाली तेव्हा स्वाती मालिवाल अमेरिकेत का होत्या? खुलासा करत म्हणाल्या “आप कार्यकर्त्यांनी…”
Shishir Shinde demand for expulsion of Gajanan Kirtikar
मतदानानंतर महायुतीत धुसफूस; गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची शिशिर शिंदे यांची मागणी, भाजपचीही टीका

मोदी शाह यांना महाराष्ट्राबद्दल आकस

“आपल्या गीतातून जय भवानी शब्द काढा हे सांगत आहेत. महाराष्ट्र मोदी आणि शाह यांना कान धरुन आणि जय भवानी जय शिवाजी म्हणत उठाबशा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही. मोदी-शाह यांचा महाराष्ट्राबद्दल आकस आहे. उद्धव ठाकरेला संपवायचं आहे ना? बघा प्रयत्न करुन. पण महाराष्ट्राबद्दलचा राग असा काढता? दिल्लीत बसलेत म्हणजे सगळा देश यांची मनमानी सहन करेल का? प्रेमाने मिठी मारली तेव्हा आम्ही साथ दिली. पण आता पाठीत वार केला आहात तर माझी वाघनखं बाहेर आली आहेत. आम्ही काही सुधीर मुनगंटीवारांसारखी वाघनखं आणण्याची शोबाजी करत नाही.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे पण वाचा- “एकनाथ शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, त्यानंतर मातोश्रीवर आले आणि..”, आदित्य ठाकरेंचा दावा

टिनपाट लोक मोदींच्या बाजूला

“आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, साधू-संतांचा महाराष्ट्र आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या प्रचार सभेत बहिण भावाच्या नात्याबाबत बोलले ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लावणारं आहे. त्यांना मोदींनी आधी काही गोष्टी शिकवाव्यात. तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना नकली आहे म्हणता. तुमच्या आजूबाजूला जे टिनपाट लोक आहेत ते वाट्टेल ते बोलत आहेत. सुप्रिया सुळेंना चॅनलसमोर शिवी दिली पण मोदी-शाह काही बोलत नाहीत. महिलांचा अपमान केलात तरीही चालेल पण मतं द्या म्हणत आहेत. अशा लोकांना एकही मत मिळता कामा नये.” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

भाकड जनता पार्टीच्या मालिकेचा सिझन ३ आता नको

“मोदी-शाह आपल्या घराणेशाहीबद्दल बोलत आहेत. मला माझ्या घराण्याबाबत अभिमान आहे. आज मोदींचं नाणं महाराष्ट्रात चालत नाही, त्यांचा चेहरा चालत नाही. त्यामुळे गद्दारांना बरोबर घेतलं आहे जे हिंदूहृदयसम्राटांचा चेहरा दाखवून तुमच्याकडे मतं मागत आहेत. मोदी जेव्हा घराणेशाहीवर बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवर बोलणारच. भाकड जनताचा नवा सिझन आलाय जुमला तीन. अॅक्टर तोच, खलनायक तोच, स्टोरी रायटर तोच. कितीवेळा तीच सीरिज बघायची? महाराष्ट्र आणि देश यांनी नासवून टाकला. ही मालिका आता बंद करा. ही मालिका पाहून कुणाचं पोट भरलेलं नाही. डोळ्यांदेखत महाराष्ट्र लुटत आहेत. जे महाराष्ट्राच्या हक्काचं आहे ते गुजरातला नेत आहेत. तरीही आपण गप्प बसायचं. ते होणार नाही. समोरच्याचं डिपॉझिट जप्त करुन आपल्याला जिंकायचं हे लक्षात ठेवा असंही उद्धव ठाकरे म्हणाले.