पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपाच्या सर्व दिग्गज नेत्यांसोबत दिसणारे केशव प्रसाद मौर्य यांना राज्यातील मागासवर्गीय नेते म्हणून भाजपाला सादर करायचे आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारख्या नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर, भाजपा त्यांना आघाडीवर आणत आहे. मात्र आता सपांनी त्यांना घरी घेरण्याची तयारी केली आहे. सपा आघाडीकडून मागास समाजातून आलेल्या पल्लवी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पल्लवी पटेल ही मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री आणि अपना दल (एस) च्या नेत्या अनुप्रिया पटेल यांची धाकटी बहीण आहे.

पल्लवी यांच्या आई कृष्णा पटेल या अपना दल कामरावादी पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाशी युती केली आहे. केशव प्रसाद मौर्य विरुद्ध पल्लवी यांना मैदानात उतरवून सपाने मोठी खेळी केली आहे. पल्लवी या केशव प्रसाद मौर्य यांच्या विरोधात मजबूत उमेदवार असू शकतात. अशाप्रकारे. कौशांबी जिल्ह्यातील सिरथू मतदारसंघातून केशव प्रसाद मौर्य यांचा विजय सोपा मानला जात होता, मात्र सपाच्या खेळीनंतर ही लढत चुरशीची दिसत आहे.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Sanjay Patil vs laxmi hebbalkar
“त्यांना एक पेग…”, भाजपाचे माजी आमदार संजय पाटील यांची महिला मंत्र्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”

केशव प्रसाद मौर्य यांनी २०१२ मध्ये सिरथू मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यानंतर २०१४ मध्ये ते फुलपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१७ मध्ये ते उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. आता पुन्हा एकदा ते घरच्या मतदारसंघात परतले आहेत. कौशांबी जिल्ह्यात मागासवर्गीय लोकांची संख्या लक्षणीय आहे. केशव प्रसाद मौर्य यांच्याशिवाय भाजपाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गोरखपूरमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय दिला आहे. तर बहुतांश दिग्गज नेत्यांना भाजपाने निवडणुकीत उतरवले आहे.

दरम्यान, पटेल कुटुंबात वाद झाला होता. यानंतर कृष्णा पटेल यांनी मुलगी अनुप्रिया पटेल यांच्यापासून वेगळे होऊन अपना दल कामेरवादी नावाचा नवा पक्ष स्थापन केला. या पक्षात कृष्णा पटेल आणि त्यांची मुलगी पल्लवी सहभागी झाल्या आहेत. याशिवाय अपना दल एसचे प्रमुख अनुप्रिया पटेल आणि त्यांचे पती आशिष पटेल आहेत.