लखनऊ : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यास योगी आदित्यनाथ हेच मुख्यमंत्री असतील असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

पंतप्रधानांची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारात तिसरी आभासी सभा झाली. त्या वेळी पंतप्रधानांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. समाजवादी पक्ष सत्तेत असताना राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली नव्हती. मात्र योगींनी २०१७ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर परिस्थिती बदलली. करोनाचा प्रादुर्भाव नसता तर योगींची कामगिरी अधिक चांगली झाली असती असे मोदींनी नमूद केले. योगींचे सरकार पुन्हा आले तर गरिबांना अधिक वेगाने घरे देण्यात येतील. उत्तर प्रदेशची जनता भाजपला मोठे बहुमत देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. योगी आदित्यनाथ हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असे संकेत पंतप्रधानांनी दिले.