मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज; उत्तराखंड, मणिपूरमध्ये सत्तेची संधी;पंजाबात आप व काँग्रेसमध्ये रस्सीखेच; गोवा अगदीच काठावर

untitled-6-copy

उत्कंठापूर्ण लढत असलेल्या उत्तर प्रदेशात भाजप सर्वाधिक जागा जिंकण्याचा अंदाज बहुतेक सर्वच मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल्स) गुरुवारी वर्तविला. पण २०२ हा बहुमताचा आकडा गाठण्यामध्ये भाजपला यश मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच तर मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांनी गरज पडल्यास थेट मायावतींबरोबर हातमिळवणी करण्याचे स्पष्ट संकेत गुरुवारी रात्रीच दिले. त्याचवेळी उत्तराखंड व मणिपूर भाजप जिंकू शकतो, पंजाबमध्ये काँग्रेस व आपमध्ये जोरदार लढत असण्याची चिन्हे आहेत, तर चिमुकल्या गोव्यामध्ये भाजप अथवा काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता धूसर वाटते आहे.

उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज ‘टाइम्स नाऊ’च्या चाचणीत आहे. त्यांच्यानुसार भाजपला १९०-२१०, समाजवादी पक्षाला ११०-१३० आणि मायावतींना ५७-७४ जागा मिळतील.

याउलट ‘एबीपी न्यूज’ व ‘सीएसडीएस’ने केलेल्या चाचणीमध्ये भाजपला (१६४-१७६) बहुमतासाठी किमान पंचवीस जागा कमी पडण्याचा अंदाज आहे. त्यांच्या पाठोपाठ समाजवादी व काँग्रेस (१५५-१६९) राहील आणि मायावतींना (६०-७२) जागा मिळतील. तसे घडल्यास आणि अखिलेशांची भूमिका पाहिल्यास समाजवादी, काँग्रेस आणि मायावती अशी गोळाबेरीज होऊ शकते. त्या स्थितीत सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला हात चोळत बसावे लागेल.

untitled-8

untitled-9