Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Updates : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. महाराष्ट्रातला आजचा शेवटचा टप्पा आहे. भिवंडी, नाशिक, मुंबई यासह महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे. भिवंडीत सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्यामामाला राष्ट्रवादीने तिकिट दिलं आहे. तर भाजपाने तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना संधी दिली आहे. भिवंडीत दुहेरी लढत होईल असं वाटत असताना निलेश सांबरेंनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने ही लढत तिहेरी झाली आहे.

कपिल पाटील तिसऱ्यांदा जिंकणार?

भाजपाने २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही वेळेला कपिल पाटील यांना संधी दिली होती. ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता मोदींनी ४०० पारचा नारा दिल्यानंतर त्यांच्याकडे तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी आहे. असं झालं तर कपिल पाटील विजयाची हॅट्रीक साधू शकतात. भिवंडीकर आज कुणाला कौल देणार ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसनेही तुल्यबळ मतदार दिला आहे. भिवंडी हा विरोधकांच्या दृष्टीने विचार केल्यास काँग्रेसचा मतदारसंघ आहे. मात्र महाविकास आघाडीत सुरेश उर्फ बाळ्यामामाला राष्ट्रवादीने तिकिट दिलं आहे. त्यामुळे सुरेश म्हात्रे कपिल पाटील यांच्यासमोर आव्हान उभं करु शकतात.

navi Mumbai lok sabha voting
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Iran President Ebrahim Raisi Died in Helicopter Crash in Marathi
Ebrahim Raisi Helicopter Crash: इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, देशावर शोककळा
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य

हे पण वाचा- राज्यातील अखेरच्या टप्प्यात कुणाची बाजी?

सुरेश म्हात्रेंचा सातवेळा पक्षबदल

कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींना तर सुरेश म्हात्रेंच्या प्रचारासाठी शरद पवारांना उतरावं लागलं. सुरेश म्हात्रेंच्या पक्षनिष्ठेविषयी आणि स्थैर्याविषयी भिवंडीकरांच्या मनात संभ्रम आहे. कारण मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा जवळपास सगळ्या पक्षांमधून ते फिरुन राष्ट्रवादीत स्थिरावले आहेत. शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती. भिवंडीतल्या यंत्रमाग कामगारांबाबत त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलं, तसंच शिवसेनेत एक वजन निर्माण केलं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बाळ्या मामा अर्थात सुरेश म्हात्रेंनी मनसेत प्रवेश केला. मात्र कपिल पाटील यांनी त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हरवलं. ज्यानंतर त्यांनी पुन्हा मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. सुरेश म्हात्रे यांनी २०१४ ते २०२४ या काळात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट, मनसे आणि शेवटी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असे सातवेळा पक्ष बदलले आहेत. कपिल पाटील यांचा कट्टर प्रतिस्पर्धी ही त्यांची ओळख आहे. आता सातवेळा पक्ष बदलेल्या सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामांना भिवंडीकर कौल देणार का हे आता आज ठरणार आहे.

हे पण वाचा- भिवंडीतील एमआयएमच्या उमेदवाराची माघार; एमआयएमच्या एका गटाचा बाळ्या मामा तर दुसऱ्या गटाचा निलेश सांबरे यांना पाठिंबा

निलेश सांबरेंचंही या दोघांना आव्हान

भिवंडीतला तिसरा चेहरा आहे निलेश सांबरेंचा. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी आधी केलेलं सामाजिक काम लोकांना पटवून देत त्याचपद्धतीचं काम निवडून आल्यानंतर व्यापक स्वरूपात मतदार संघात करण्याचा विश्वास जनतेत निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. गाव-पाडे, वाड्या-वस्त्या या ठिकाणी त्यांचं काम गेली अनेक वर्ष जिजाऊ संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून सर्वसामन्यां जनतेपर्यंत पोहचलं होतं. कधीही विद्यामान खासदार पोहचले नव्हते अशा गावात सांबरे यांनी स्वत: भेटी दिल्यानं ग्रामस्थांना एक वेगळाच आनंद झाला होता. त्यामुळे आपोआपच प्रत्येक माणूस त्यांच्या प्रचारात जिजाऊ संस्थेसह जोडला गेल्याचं पाहायला मिळालं. आता भिवंडीकर नेमकं कुणाला मतदान करुन लोकसभेत जाण्याची संधी देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.