समाज माध्यमांचा वापर आपल्या प्रचारासाठी करणे ही गोष्ट आता काही नवीन राहिलेली नाही. विशेषत: २०१४ च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने सत्तेत येण्यासाठी समाज माध्यमांचा वापर मोठ्या खुबीने केला होता. त्यावेळेला इतर कोणतेच पक्ष समाज माध्यमावर प्रचार करण्यासाठीची यंत्रणा स्वत:जवळ बाळगून नव्हते. मात्र, भाजपाकडे तेव्हापासूनच ‘आयटी सेल’ अस्तित्वात होती. त्यानंतर मग समाज माध्यमांच्या प्रभावाचे महत्त्व ओळखून इतरही पक्षांनी यावरील आपली ताकद मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले. सध्या समाज माध्यमांवर ‘इन्फ्लूएन्सर्स’ची चलती आहे. यांना फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या लाखोंमध्ये असते. त्यामुळे त्यांच्या तीस सेकंदांच्या रिललाही मोठे महत्त्व असते. आता समाज माध्यमांवरील हेच ‘इन्फ्लूएन्सर्स’ निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राजकीय पक्षांचं प्रमुख अस्त्र ठरत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याचे कारणही तसेच आहे. कारण विविध राजकीय पक्ष त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहेच. शिवाय अलीकडेच देशभरातील इन्फ्लूएन्सर्सना दिल्लीत गौरवण्यात आलं होतं. केंद्र सरकारनेच या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सरकारकडूनच देशातील मोजक्या इन्फ्लूएन्सर्सना ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्स’ देण्यात आले.

भारतातील १४२ कोटी लोक आणि ८० कोटी इंटरनेट वापरकर्ते येत्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या सगळ्यांवर येनकेन प्रकारे इंटरनेट आणि समाज माध्यमांचा प्रभाव आहे. भारतात इन्स्टाग्राम आणि यूट्यूब वापरणारे लोकही बहुसंख्येने आहेत. राजकीय विश्लेषकांचे असे मत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीने आपला राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी समाज माध्यमांवरील इन्फ्लूएन्सर्सचा वापर सुरू केला आहे. यामध्ये संगीत क्षेत्रापासून ते विनोद निर्मितीच्या क्षेत्रापर्यंत सगळ्या प्रकारच्या तरुण इन्फ्लूएन्सर्सचा समावेश आहे.

Political parties organising religious event ahead of assembly poll to attract voters in Mira road
मीरा भाईंदरमध्ये राजकारण्यांची धार्मिक चढाओढ
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Manager Fired HR
मॅनेजरचा CV क्षणार्धात नाकारला, एचआरची नोकरीच गेली; नेमकं काय घडलं वाचा!
Mahayuti Social Outreach through various programs in Nashik print politics news
नाशिकमध्ये महायुतीचे विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक अभिसरण
Maharashtra state housing policy announced after 17 years Mumbai
निवडणुकीपूर्वी गृहनिर्माण धोरण ठरविण्यासाठी सत्ताधाऱ्यांची घाई
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित

हेही वाचा : विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?

राजकीय व्यासपीठावर समाज माध्यमांवरील ‘स्टार्स’

लोकगायिका मैथिली ठाकूर ही अशाच इन्फ्लूएन्सर्सपैकी एक आहे. ती हिंदू भक्तिगीते गाते. ती सुरेल गाते, सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. सरकारद्वारे आयोजित केलेल्या ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्स’च्या २४ विजेत्यांपैकी ती एक आहे. “आत्मविश्वासू आणि खंबीर अशा नव्या भारतातील स्टोरीटेलर्स”ना प्रोत्साहन देण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

समाज माध्यमांवरील या स्टार्समध्ये एक समान धागा आहे. तो असा की, ते हिंदू बहुसंख्यांक संस्कृतीचा प्रचार करतात आणि भाजपाच्या उजव्या विचारधारेला समर्थन देतात. “असे अनेक इन्फ्लूएन्सर्स आहेत, जे सध्याच्या सरकारच्या बरोबरीने काम करत आहेत आणि त्यांच्यासाठी व्हिडीओ बनवत आहेत”, असे मैथिली म्हणाली. तिला फेसबुकवर १४ दशलक्षहून अधिक, तर इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर ४.५ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत.

विश्लेषकांचे असे म्हणणे आहे की, भाजपाबरोबर काम केल्याने वाढणारे फॉलोअर्स आणि त्यातून होणारी कमाई, यामुळे इतरही अनेक इन्फ्लूएन्सर्सना सत्ताधारी पक्षासोबत काम करण्यास प्रोत्साहन मिळू शकते. कारण येत्या निवडणुकीमध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.

२३ वर्षांची मैथिली ही पहिल्यापासूनच एक सुप्रसिद्ध टीव्ही स्टार आहे. मात्र, जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी तिने गायलेले भक्तीगीत ‘X’ सारख्या समाज माध्यमावर शेअर करतात, तेव्हा तिची लोकप्रियता आणखी वाढते. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ तिने पोस्ट केला तेव्हा मोठी खळबळ उडाली”, असे मैथिलीने सांगितले. तिला क्रिएटर्स अवॉर्डमध्ये ‘कल्चरल ॲम्बेसिडर ऑफ द इअर’चा पुरस्कार देण्यात आला.

मात्र, ‘इंटरनेट फ्रीडम फाउंडेशन’चे प्रतीक वाघरे यांना सरकार आणि समाज माध्यमांवरील स्टार्स यांच्यातील हे संबंध चिंताजनक वाटतात. त्यांची ही संस्था डिजिटल जगातील अधिकारांविषयी काम करते. “सरकार आणि इन्फ्लूएन्सर यांच्यातील या संबंधांबाबत चिंता करण्यासारखे बरेच काही आहे”, असे प्रतीक वाघरे म्हणतात. इन्फ्लूएन्सर्सना त्यांच्या कंटेटमधून पैसा आणि नवे फोलोअर्स दोन्ही हवे आहेत.

इतर पक्षांपेक्षा भाजपा आघाडीवर

सध्या सगळेच राजकीय पक्ष समाज माध्यमांचा वापर खुबीने करायला लागले आहेत. मात्र, भाजपाकडून अशा इन्फ्लूएन्सर्सचा वापर होणे ही त्यांची अत्याधुनिक अशी ‘सॉफ्ट पॉवर कॅम्पेन पॉलिसी’ असल्याचे दिसून येते आहे. सरकारी प्रचार करून पैसा अथवा अधिक लोकप्रियता मिळत असेल तर स्वत:ची राजकीय मते काय आहेत, ते बाजूला ठेवून अधिकाधिक इन्फ्लूएन्सर्स या नादाला लागतील, अशी चिंता प्रतीक वाघरे यांना वाटत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील १४० कोटी लोकसंख्येपैकी वय वर्षे तीसच्या खाली असणारी अर्ध्याहून अधिक लोकसंख्या समाज माध्यमांचा वापर करते. त्यामुळे तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीची ही युक्ती असल्याचे मैथिली ठाकूर सांगते.

‘MyGov’ या सरकारी ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडूनही पंतप्रधान मोदींच्या कौतुकास पात्र ठरलेल्या या इन्फ्लूएन्सर्सच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. ‘स्टॅटीस्टा’ या मार्केट ट्रॅकरनुसार, भारतातील ४६२ दशलक्ष यूट्यूबचे वापरकर्ते हे या प्लॅटफॉर्मचे एखाद्या देशातील सर्वाधिक वापरकर्ते आहेत. म्हणजे यूट्यूबसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे.

“तरुणाईकडे लक्ष्य दिल्याने तुम्ही देशातील मोठ्या लोकसंख्येवर प्रभाव टाकता.” असे मैथिली म्हणाली. मैथिली ठाकूरला भारतीय निवडणूक आयोगाने सदिच्छादूत म्हणूनही नियुक्त केले आहे, त्यामुळे तिने एखाद्या पक्षाचा प्रचार करणे नव्हे तर मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : देशातील पहिली निवडणूक कशी पार पडली होती? काय होती आव्हाने?

भाजपाचा उद्देश सफल होताना दिसतोय!

नॅशनल फिटनेस क्रिएटर अवॉर्डचा विजेता असलेला माजी कुस्तीपटू अंकित बैयानपुरियाने त्याच्या आठ दशलक्ष इन्स्टाग्राम फॉलोअर्सना थेट मोदींना आणि भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. म्हणजे ज्या उद्देशाने भाजपाने या इन्फ्लूएन्सर्सना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे, तो त्यांना सफल होताना दिसतो आहे. समाज माध्यमावरील इन्फ्लूएन्सर असलेल्या रणवीर अलाहबादी याच्या यूट्यूब चॅनेलवर भाजपाचे दिग्गज नेते पियुष गोयल आणि एस जयशंकर देखील झळकले आहेत. हा व्हिडीओ ‘MyGov’च्या सहकार्याने तयार करण्यात आला होता

वय वर्षे २० असणाऱ्या जान्हवी सिंहला ‘नॅशनल हेरिटेज फॅशन आयकॉन अवॉर्ड’ देण्यात आला. ती संस्कृती आणि धर्म या विषयावर कंटेट तयार करते. सरकारबरोबर काम करायला मिळते आहे याचा तिला आनंद आहे. याकडे ती एक मोठी संधी म्हणून पाहते. तिला भाजपाचे काम आवडते. हिंदू धर्माबाबत भाजपाने केलेल्या कामाचे तिला कौतुक वाटते, कारण भारत सध्या आपले मूळ आणि संस्कृती विसरत चालला आहे, असे तिला वाटते.

तिने आपल्या फॉलोअर्सना कुणाला मतदान करायला हवे ते सांगितले नसल्याचे ती म्हणते. ती म्हणते की, “मी समाज माध्यमांवर अशाप्रकारे थेट कोणतीही राजकीय मते व्यक्त करत नाही. मात्र, प्रत्येकाने मतदान करायला हवे, हा संदेश पोहोचवणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते.” पण, तिची निष्ठा मोदींशी आहे हे तिच्या कंटेटवरून स्पष्ट होते. कारण ती पुढे असे म्हणाली की, “देशासाठी नरेंद्र मोदी जे करत आहेत, ते इतर कोणताही नेता करताना दिसत नाही.”