पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोची येथे आज (२ सप्टेंबर) अनावरण करण्यात आलेल्या नौदलाच्या नवीन ध्वजाने स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्याने स्वीकारलेले ध्वज आणि पदांवर लक्ष केंद्रित केले आहे. नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडियाकडून मिळालेल्या दस्तऐवजांवरून असे दिसून आले आहे की, २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक बनणार होता, तेव्हा भारताचे माजी व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांनी नवीन ध्वज आणि रँक बॅज सुचवण्यात मोठी भूमिका बजावली होती.

ब्रिटीशकालीन ध्वज आणि रँक भारताने कधी बदलला? –

भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा ब्रिटीशकालीन ध्वज आणि रँकमध्ये बदल झाला. त्याआधी लष्कराचे ध्वज आणि बॅज ब्रिटिश पद्धतीचे होते. २६ जानेवारी १९५० रोजी लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजांचा नवा, भारतीय पॅटर्न तसेच लष्कराचे रेजिमेंटल ध्वज आणि तिन्ही सेवांच्या रँकचे बॅज स्वीकारण्यात आले. भारतीय लष्करी अधिकार्‍यांसाठीचे ‘किंग्स कमिशन’ देखील त्याच तारखेला बदलून ‘भारतीय आयोग’ करण्यात आले.

lalu prasad yadav tweet on narendra modi
“पाकिस्तान, कब्रिस्तान, हिंदू-मुस्लीम हे मोदींचे आवडते शब्द”, लालू प्रसाद यादव यांची खोचक टीका; म्हणाले, “शेवटच्या टप्प्यापर्यंत…”
uddhav devendra Fadnavis
“मी नागपुरी आहे, त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Sharad Pawar On PM Narendra Modi
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका; म्हणाले, “रशियाचे पुतिन आणि मोदी…”

लॉर्ड माउंटबॅटन यामध्ये कधी आले? –

राष्ट्रीय अभिलेखागारात १९४९ च्या फायली आहेत, ज्यात सशस्त्र दलांची नावे, ध्वज आणि पदांबाबत लॉर्ड माउंटबॅटन यांची तपशीलवार नोंद आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री बलदेव सिंग यांना माउंटबॅटन यांच्या सूचनांबाबत लिहिलेले पत्र यांचा समावेश आहे.

लंडनमध्ये दोघांची भेट झाली तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन यांनी नेहरूंना ही चिठ्ठी दिली होती. २४ मे १९४९ रोजी पंतप्रधानांच्या कार्यालयातून तत्कालीन गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांच्या कार्यालयाकडे ही नोट पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये ‘भारतीय सशस्त्र दलांची नावे आणि प्रतिज्ञापत्र’ या मुद्द्यावर असल्याचे नमूद केले होते आणि ही चिठ्ठी गव्हर्नर जनरल यांच्यासमोर ठेवण्यात यावी, असेही या नमूद करण्यात आले होते.

लॉर्ड माउंटबॅटन यांनी काय म्हटले आहे? –

नौदल चिन्हाबाबत माउंटबॅटन म्हणाले की, राष्ट्रकुलातील सर्व नौदल समान ध्वज फडकवतात ज्यामध्ये लाल क्रॉस असलेला मोठा पांढरा ध्वज असतो आणि वरच्या कोपऱ्यात युनियन जॅक असतो, त्याला ‘व्हाइट इंसाईन’ म्हणून ओळखले जाते. तसेच, नवीन चिन्हाबाबत त्यांनी हे देखील सुचवले की, रेड क्रॉस असायला हवे पण युनियन जॅकच्या जागी भारतीय राष्ट्रध्वज हवा. याशिवाय, ” गणवेशात शक्य तितके बदल करावेत”, अशी आग्रही विनंती देखील केली आहे.

माउंटबॅटनच्या सूचनांवर भारत सरकारने कशी प्रतिक्रिया दिली? –

नेहरूंनी सप्टेंबर १९४९ मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहून माजी गव्हर्नर जनरल माउंटबॅटन यांनी केलेल्या, शक्य तितके कमी बदल केले पाहिजेत, या सूचनेशी आपण सहमत आहोत असे सांगितले. माऊंटबॅटन यांनी नौदलासाठी सुचवलेल्या बदलांचा तत्कालीन पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला.

त्यानंतर गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांनीही नेहरूंना मे १९४९ मध्ये माऊंटबॅटन यांच्या सूचना मान्य केल्याबद्दल परत पत्र लिहिले. सरतेशेवटी, माउंटबॅटन यांच्या सूचना अक्षरशः स्वीकारल्या गेल्या आणि २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आणल्या गेल्या.