2,500-Year-Old ‘Yagya Kund’ Found During Excavationराजस्थानच्या भरतपूर मधील बहज या गावात सुरू असलेल्या उत्खननात भारतीय पुरातत्त्व विभागाला तब्बल २५०० वर्षांपेक्षा जुनी १५ यज्ञकुंडं सापडली आहेत. केवळ यज्ञकुंडंच नाही तर काही तांब्याची नाणी, मृदभांडी आणि काही मूर्तींचे अवशेषही सापडलेले आहेत. पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते हे स्थान प्राचीन व्यापारी शहर आणि धार्मिक तीर्थक्षेत्र असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी होणारे उत्खनन भारतीय पुरातत्त्व खात्याच्या जयपूर विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. जयपूर विभागातील पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक विनय गुप्ता यांनी सांगितले की, ५० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ब्रज परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खननाचे काम सुरू करण्यात आले आहे. उत्खननादरम्यान सापडलेले पुरावे अतिशय अद्भुत आहेत. असा पुरावा पूर्वीच्या उत्खननात सापडलेला नाही. हे उत्खनन आणखी काही काळ सुरू राहणार असून काही अवशेषांसह इतर महत्त्वाचे पुरावे सापडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. बहज गावातील एका ढिगाऱ्यावर चार महिन्यांपासून उत्खनन सुरू आहे. उत्खननापूर्वीच पुरातत्त्व विभागाच्या पथकाने या ढिगाऱ्याची तपासणी करून येथे प्राचीन काळातील अवशेष असल्याची शहानिशा केली आणि मानवी संस्कृतीचा शोध घेण्यासाठी उत्खनन करण्याची विनंती भारत सरकारकडे केली होती. त्यानंतर भारत सरकारने आर्थिक तरतूद मंजूर करून येथील उत्खननास परवानगी दिली.

अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?

pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
narendra modi
“मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींकडून भूमिका स्पष्ट
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Radhika Khera congress
“रात्री नशेत असताना ते…”, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप करत राधिका खेरांचा राजीनामा
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
devendra fadnavis sharad pawar
“मला उद्ध्वस्त करण्यासाठी…”, ‘त्या’ आंदोलनाचा उल्लेख करत फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

श्रीकृष्णाच्या गोवर्धन पर्वताशी असलेला संबंध

बहज हे गाव पुरातत्त्वीय स्थळ म्हणून ३० वर्षांपूर्वी नोंदविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे हे ठिकाण मथुरेजवळ असून उत्तर प्रदेशपासून ४० किमी अंतरावर आहे. त्यामुळे या भागाचा आणि मथुरेचा संबंध निश्चितच असल्याचे अभ्यासक सांगतात. पौराणिक संदर्भानुसार, मथुरेच्या सभोवतालच्या प्रदेशाला व्रजमंडल म्हणत असत. त्यामुळे उत्खनन होत असलेल्या या गावाचा समावेश याच व्रजमंडलात होत असल्याचेही अभ्यासक सांगतात. येथील यज्ञकुंडात सापडलेली माती ही जवळच १० किमीवर असलेल्या गोवर्धन पर्वतावरची आहे. या यज्ञकुंडाची रचना मगधकालीन आहे. गोवर्धन पर्वतावरची माती धार्मिक कार्यासाठी वापरण्यात आल्याने या स्थळाचा संबंध भगवान श्रीकृष्णाने एका करंगळीवर उचललेल्या कथेतील गोवर्धन पर्वताशी असल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे.

ऐतिहासिक पुरावे १६ महाजनपदांशी संबंधित

या स्थळाच्या सभोवतालचा ५० किमीचा भाग पुरातत्त्वीय सर्वेक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. या भागाचा संबंध १६ महाजनपदांशी असल्याचे विनय गुप्ता यांनी ‘इंडिया टाइम्स’शी बोलताना सांगितले. या उत्खननात सापडलेले यज्ञकुंड मगध राजवंशाच्या (इसवी सन पूर्व ६८४-३२०) कालखंडातील असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या यज्ञ कुंडात सापडलेल्या नाण्यांवर हत्ती आणि तीन पर्वतांचे चित्र कोरलेले आहे. बहुदा ही नाणी देवतेला समर्पित केली असावी, असेही त्यांनी सांगितले. या स्थळावरील उत्खनन अद्याप पूर्ण झालेले नाही.

या गावापासून काही किलोमीटरवर असलेल्या आणखी एका पुरातत्त्वीय स्थळाचा या उत्खननात समावेश करण्यात आलेला आहे. यज्ञकुंडामध्ये जी माती सापडली आहे, त्यातून अनेक वस्तू सापडल्या आहेत. या सर्व वस्तू अग्नीत अर्पण केलेल्या असाव्यात, असे मत अभ्यासकांनी मांडले आहे. वेगवेगळ्या आकाराची लहान भांडी, कापडात गुंडाळलेली तांब्याची नाणी आणि तांबे आणि लोखंडी वस्तू यांचा यात समावेश आहे. पुरातत्त्व विभागाच्या जयपूर विभागाच्या अधीक्षकांनी त्यांच्या पीएचडी संशोधनादरम्यान बहज गावातील ढिगाऱ्याची पुरातत्त्वीय ओळख पटवली होती. जयपूर विभागाच्या पथकाने काही महिन्यांपूर्वी तेथे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणानंतर उत्खननाचा प्रस्ताव भारतीय पुरातत्त्व खात्याच्या महासंचालकांकडे पाठवण्यात आला आणि १० जानेवारी २०२४ पासून उत्खनन सुरू झाले. उत्खननादरम्यान सापडलेले सर्व अवशेष जयपूर पुरातत्त्व विभागाकडे पाठवण्यात आले आहेत.

महाभारताशी नाते

या ठिकाणी जी नाणी सापडली आहेत, त्यावरून प्रगत धातुशास्त्राची प्रचिती येते. किंबहुना अशा प्रकारचे तंत्रज्ञान शस्त्र निर्मितीसाठी वापरले जात होते, असेही अभ्यासकांनी सांगितले आहे. येथे सापडलेल्या नाण्यांवरील हत्ती हा या स्थळाचा संबंध महाजनपदांशी दर्शवतो. १६ महाजनपदांचा उल्लेख महाभारतातही आहे. शास्त्री कोसलेन्द्र दास हे जगद्गुरू रामानंदाचार्य राजस्थान संस्कृत विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी ‘इंडिया टाइम्स’ला सांगितले की, या उत्खननातून यज्ञकुंडाचे जे अवशेष समोर आले आहेत ते महत्त्वाचे आहेत. भागवत पुराणात मथुरा हे धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उत्खननादरम्यान हाडांपासून तयार केलेली अवजारे आणि मौर्य काळातील प्राचीन भाजलेल्या मातीची शिल्पेही सापडली आहेत.

अधिक वाचा: विदर्भ कन्या रुक्मिणीचे हरण कृष्णाने का केले?

भारताच्या इतिहासातील दुसऱ्या नागरीकरणाशी संबंधित

याशिवाय महत्त्वाचे म्हणजे या उत्खननातून शुंगकालीन अश्विनी कुमारांच्या शिल्पकृतींची जोडी सापडली आहे. महाभारतात अश्विनीकुमारांची नावे दस्त्र आणि नासत्य अशी आहेत. अशा पद्धतीच्या जोडमूर्तीचा शोध या भागात पहिल्यांदाच लागल्याचे विनय गुप्ता यांनी सांगितले. त्यामुळे या स्थळाचा संबंध महाभारताशी जोडण्यात आलेला आहे. मराठी विश्वकोशातील नोंदीत म्हटल्याप्रमाणे मथुरा ही या जनपदाची राजधानी होती. या नगरीविषयी मधुरा, मधुपूर, मधुपुरी, मधुपिका, मधुपट्टना अशी भिन्न नामांतरे प्राचीन साहित्यात आढळतात.

आजवर अज्ञात माहिती समोर येण्याची शक्यता

मधुरा वा मधुपुरी ही नावे मधू नावाच्या दैत्यावरून रूढ झाली असावीत. मगधकडे जाणारे व्यापारी मार्ग व राजमार्ग प्राचीन काळी मथुरेस एकत्र येत. त्यामुळे इंद्रप्रस्थ, श्रावस्ती, कौशाम्बी, वैशाली इ. नगरांशी मथुरेचा व्यापारी व सांस्कृतिक संबंध होता. इतकेच नाही तर हा १६ महाजनपदांचा कालखंड भारताच्या इतिहासात दुसऱ्या नागरीकरणाशी संबंधित आहे. त्यामुळे बहज या गावातील उत्खननात सापडलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांमुळे या कालखंडाविषयी अज्ञात माहिती समोर येण्याची शक्यता अभ्यासक वर्तवत आहेत.