प्रशांत केणी

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी बेंगळूरु येथे १२ आणि १३ फेब्रुवारीला होणाऱ्या महालिलावाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दोन कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या अव्वल श्रेणीत सलामीवीर शिखर धवन, धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर आणि फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन या भारतीय खेळाडूंसह पॅट कमिन्स आणि कॅगिसो रबाडा या परदेशी वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. ३७० भारतीय आणि २२० परदेशी अशा एकूण ५९० खेळाडूंवर १० संघ बोली लावणार आहेत. यंदा महालिलावाचा आलेख उंचावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Netflix target of crores in the Indian market
नेटफ्लिक्सची विक्रमी झेप… भारतीय बाजारपेठेत कोटींचे टार्गेट!
LSG Assistant Coach Sreedharan Sriram on Mayank Yadav
LSG vs RR : राजस्थानविरुद्ध वेगवान गोलंदाज मयंक यादव खेळणार की नाही? एलएसजीचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणाले…
Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
loksatta analysis imd predict india to receive above normal monsoon
विश्लेषण : यंदा दमदार पावसाचा अंदाज का वर्तवला जात आहे?

लिलावात किती आणि कोणते संघ सहभागी होणार आहेत?

२०२२च्या ‘आयपीएल’ हंगामात दोन संघांची वाढ होणार आहे. त्यामुळे या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स असे १० संघ सहभागी होणार आहेत.

किती खेळाडूंचा ‘आयपीएल’च्या महालिलावात समावेश असेल?

‘आयपीएलच्या लिलावासाठी १२१४ खेळाडूंनी नोंदणी केली होती. परंतु संघांनी खेळाडूंची पसंती दर्शवल्यानंतर ही यादी कमी करून ५९० खेळाडूंपर्यंत आणण्यात आली आहे. यात ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंचे अन्य पद्धतीने वर्गीकरण केल्यास २२८ आंतरराष्ट्रीय दर्जाचे, ३५५ बिगरआंतरराष्ट्रीय आणि ७ सहयोगी राष्ट्रांचे क्रिकेटपटू असे करता येईल.

लिलावातील परदेशी खेळाडूंची तुलना केल्यास कोणते देश आघाडीवर आहेत?

लिलावातील परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ४७ खेळाडू आहेत, तर दुसरा क्रमांक ३४ खेळाडूंचा समावेश असलेल्या वेस्ट इंडिजचा लागतो. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचे ३३, श्रीलंकेचे २३, इंग्लंडचे २४, न्यूझीलंडचे २४ आणि अफगाणिस्तानचे १७ खेळाडू लिलावात आहेत. तसेच आयर्लंड ५, बांगलादेश ५, नामिबिया ३, स्कॉटलंड २, झिम्बाब्वे १, नेपाळ १, अमेरिका १ या खेळाडूंचाही समावेश आहे.

प्रत्येक संघात किती खेळाडूंच्या समावेशाचे बंधन आहे?

प्रत्येक संघाला कमाल २५ आणि किमान १८ खेळाडूंना संघात स्थान देता येईल. यापैकी जास्तीत जास्त आठ परदेशी खेळाडूंना स्थान देता येऊ शकते.

महालिलावाआधी कोणत्या खेळाडूंना संघांनी कायम ठेवले आहे आणि त्यांना किती रुपये मानधन दिले जाणार आहे?

कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी :

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : विराट कोहली (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी) आणि मोहम्मद सिराज (७ कोटी)

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमरा (१२ कोटी), सूर्यकुमार यादव (८ कोटी), किरॉन पोलार्ड (६ कोटी)

पंजाब किंग्ज : मयांक अगरवाल (१४ कोटी), अर्शदीप सिंग (४ कोटी)

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (रु. १४ कोटी), उमरान मलिक (४ कोटी), अब्दुल समद (४ कोटी)

चेन्नई सुपर किंग्ज : रवींद्र जडेजा (१६ कोटी), महेंद्रसिंह धोनी (१२ कोटी), मोईन अली (८ कोटी), ऋतुराज गायकवाड (६ कोटी)

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (९ कोटी), पृथ्वी शॉ (७.५ कोटी), आनरिख नॉर्किए (६.५ कोटी)

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (१४ कोटी), जोस बटलर (१० कोटी), यशस्वी जैस्वाल (४ कोटी).

कोलकाता नाइट रायडर्स : सुनील नरिन (१२ कोटी), आंद्रे रसेल (८ कोटी), वरुण चक्रवर्ती (८ कोटी), वेंकटेश अय्यर (६ कोटी).

कोणता संघ लिलावात किती खेळाडू खरेदी करू शकतो आणि याकरिता त्यांच्याकडे किती रक्कम शिल्लक आहे?

पंजाब किंग्ज संघात सर्वाधिक २३ खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत, तर चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या संघांमधील २१ खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत. अन्य संघांच्या प्रत्येकी २२ जागा रिक्त आहेत. पंजाब किंग्ज संघाच्या खात्यावर सर्वाधिक ७२ कोटी रुपये रक्कम शिल्लक आहे, तर दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वात कमी ४७.५ कोटी रुपये रक्कम आहे.

संघ शिल्लक रक्कम (कोटी)खेळाडू संख्या परदेशी खेळाडू
चेन्नई सुपर किंग्ज ४८२१
दिल्ली कॅपिटल्स ४७.५२१
कोलकाता नाईट रायडर्स ४८२१
लखनऊ सुपर जायंट्स ५९२२
मुंबई इंडियन्स ४८२१
पंजाब किंग्ज  ७२२३
राजस्थान रॉयल्स ६२२२
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु ५७२२
सनरायजर्स हैदराबाद ६८२२
गुजरात टायटन्स ५२२२

लिलावातील सर्वांत वयस्कर आणि सर्वांत युवा खेळाडू कोण आहे?

दक्षिण आफ्रिकेचा ४२ वर्षीय फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर हा लिलावातील सर्वांत वयस्कर खेळाडू आहे, तर अफगाणिस्तानचा नूर अहमद हा १७ वर्षीय खेळाडू सर्वांत युवा खेळाडू आहे. नूर नुकत्याच झालेल्या युवा विश्वचषक स्पर्धेत खेळला होता.

लिलावातील मूळ किमतीनुसार कोणत्या श्रेणीत किती खेळाडूंचा समावेश आहे?

महालिलावातील अव्वल श्रेणी मानल्या जाणाऱ्या दाेन कोटी मूळ किंमत असलेल्या गटात ४८ खेळाडूंचा समावेश आहे. १.५ कोटी मूळ किंमत असलेल्या द्वितीय श्रेणीत २० खेळाडूंचा, तर १ कोटी मूळ किंमत असलेल्या तिसऱ्या गटात ३४ खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय ७५ लाख, ५० लाख, ४० लाख, ३० लाख आणि २० लाख अशा आणखी पाच श्रेणींमध्ये खेळाडूंचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

अव्वल श्रेणीत कोणते भारतीय आणि परदेशी खेळाडू आहेत?

अव्वल श्रेणीत रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, देवदत्त पडिक्कल, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, कृणाल पंड्या, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक, इशान किशन, अंबाती रायुडू, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि यजुर्वेंद्र चहल या १७ खेळाडूंचा समावेश आहे. याचप्रमाणे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, अष्टपैलू मिचेल मार्श, अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ, अष्टपैलू शाकिब अल हसन, धडाकेबाज फलंदाज फॅफ ड्युप्लेसिस, आदी ३१ खेळाडूंचा समावेश आहे.

कोणते युवा विश्वविजेते खेळाडूही लिलावात समाविष्ट आहेत? ही संख्या मर्यादित का राहिली?

भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) विश्वविजेत्या संघातील कर्णधार यश धूल, विकी ओस्तवाल आणि राजवर्धन हंगर्गेकर हे खेळाडू लिलावात छाप पाडण्याची अपेक्षा आहे. मात्र यष्टिरक्षक दिनेश बाणा, उपकर्णधार-फलंदाज शेख रशीद, डावुखरा वेगवान गोलंदाज रवी कुमार, अष्टपैलू निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, सलामीवीर अंक्रिश रघुवंशी, मानव पारख, गर्व सांगवान या युवा ताऱ्यांना मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूने किमान एक प्रथम श्रेणी किंवा अ-दर्जाचा सामना खेळायला हवा. जर या खेळाडूकडे देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव नसल्यास लिलावाच्या तारखेआधी त्याने वयाची १९ वर्षे पूर्ण केलेली असावी.

‘आयपीएल‘च्या पहिल्या हंगामानुसार आतापर्यंत कोणते खेळाडू महागडे ठरले आहेत?

‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामात महेंद्रसिंह धोनीसाठी चेन्नई सुपर किंग्जने सर्वाधिक ९.५कोटी रुपयांची बोली लावली होती. भारताचा युवराज सिंग आणि इंग्लंडचा बेन स्टोक्स हे दोनदा महागडे खेळाडू ठरले आहेत. ‘आयपीएल’च्या आतापर्यंतच्या इतिहासात गतवर्षी राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक १६.२५ कोटी रकमेला ख्रिस मॉरिसला खरेदी केले होते.