scorecardresearch

विश्लेषण : इजिप्तमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वात जुन्या mummy चा लागला शोध

कैरो शहराजवळ पुरातत्व शास्त्रज्ञांना ४३०० वर्षापूर्वीची, दगडाच्या शवपेटीत, सोन्याचे आवरण असलेली mummy-ममी सापडली आहे

Explained, Oldest, mummy, Tomb, Egypt, discovered
विश्लेषण : इजिप्तमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वात जुन्या mummy चा लागला शोध ( Photo Courtesy – Reuters )

इजिप्तमध्ये कैरो शहारापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या Saqqara या गावामध्ये अनेक पूरातन बांधकाम आहेत आणि या ठिकाणी अनेक थडगी आणि त्यामध्ये जतन केलेल्या mummy या सापडल्या आहेत. तेव्हा याच भागात जतन केलेल्या स्मशानभूमीच्या परिसरात आणखी एक थडगं आणि त्यामध्ये एका mummy चा शोध नुकताच लागल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

इजिप्तमध्ये आत्तापर्यंत सापडेल्या अनेक mummy पैकी आत्ता सापडलेली mummy ही सर्वात पूरातन असल्याची शक्यता आहे. तसंच सर्वात परिपूर्ण जतन केलेली mummy म्हणनूही याकडे बघितलं जात आहे. Hekashepes नावाच्या ३५ वर्षीय व्यक्तिची ही mummy असून याला पूर्णपणे सोन्याचा लेप देण्यात आला आहे. यामुळे जसं याचं जतन करण्यात आलं होतं त्याच स्वरुपात कुठेही झीज न झालेली mummy बघायला मिळाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

इसवीसन पूर्व २५०० च्या आधी Saqqara या भागात अनेक बांधकामे झाली, त्या वेळच्या प्रथेनुसार अनेक mummy आणि त्याचे जतन करण्यासाठी विविध आकाराची थडगी बांधण्यात झाली. त्या काळात अनेक राजांच्या राजवटी होऊन गेल्या आणि प्रत्येक काळात Saqqara भागात स्मशानभूमीचा जणू काही विस्तार होत राहीला.

त्यामुळेच या भागात अनेक थडगी आणि त्यामध्ये mummy सापडल्या आहेत. आजही या ठिकाणी काळाच्या ओघात जमिनीत गाडली गेलेली अनेक बांधकामे सापडत आहेत. त्यामुळेच या भागाला जागतिक वारसा म्हणून युनेस्को १९७९ जाहीर केलं आहे.

सापडलेल्या आत्तापर्यंतच्या सर्वात जुन्या mummy मुळे पुन्हा एकदा संशोधनाला चालना मिळाली असून आणि नवा इतिहास काय उलगडला जातो, तेव्हाच्या बदलत्या संस्कृतीवर काय प्रकाश पडतो याकडे आता लक्ष लागून राहिलेलं असेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 20:21 IST