जम्मू काश्मीर पोलीस, 44 राष्ट्रीय रायफल आणि सीआरपीफच्या जवानांनी दोन दिवसांपूर्वी राबवलेल्या एका संयुक्त मोहीमेत हेफखुरी मलदारा येथे एका हायब्रीड दशतवाद्याला पकडण्यात आलं. यावर अहमद असे त्याचे नाव असून त्याच्याकडून एक ९ एमएम पिस्तुल, १२ राउंड आणि एक मॅगझिन जप्त करण्यात आले आहे. तो शोपियांच्या हेफ झैनपोरा येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी सांगितले की, अहमद लष्कर ए तोयबाशी संबंधित असल्याचे आढळून आले असून, झैनपोरा पोलिसा ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्याची चौकशी सुरू आहे. यानिमित्त हे हायब्रीड दहशतवादी प्रकरण नेमकं काय आहे? हे आपण जाणून घेऊयात.

congress bjp manifesto climate change
गेल्या पाच वर्षांत देशाला अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचा फटका, याविषयी भाजपा-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?
Rahul Gandhi Congress Sam Pitroda Narendra Modi Caste Census wealth re-distribution
जातगणना, वारसा कर आणि संपत्तीचे फेरवाटप; काँग्रेसचे काय म्हणणे आहे?
The Vietnam War Guided Missiles chip cold wars
संविधानभान: सकारात्मक भेदभाव म्हणजे काय?
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

ते नेमके कोण आहेत? –

काश्मीरमधील सुरक्षा दलं आणि गुप्तचर संस्था या हायब्रीड दशतवाद्यांबद्दल सांगतात की, यांची दहशतवादी म्हणून ओळखही नसते, परंतु ते दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी कट्टरपंथी बनतात आणि हल्ला घडवल्यानंतर पुन्हा आपल्या सामान्य जीवनात परतात. सुरक्षा यंत्रणांनी त्यांचे वर्णन “boys next door” असे केले असून, त्यांना स्टँडबाय मोडवर ठेवलेले असते, अशीही माहिती समोर आली आहे. काश्मीरमध्ये मागील २० महिन्यात झालेल्या ५५ नागरिकांच्या हत्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक घटनांसाठी पोलिसांनी या हायब्रीड दहशतवाद्यांना जबाबदार ठरवले आहे. ज्यामध्ये एक तरुण होता.

अन्य दहशतवाद्यांपेक्षा ते वेगळे का आहेत? –

हे दहशतवादी त्यांना सोपवलेलं काम करताना सामान्यपणे जीवन जगत असतात. सुरक्षा यंत्रणांना त्यांना शोधणे कठीण जाते कारण ते सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहत असतात.

जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक(डीजीपी) दिलबाग सिंग यांनी सांगितले की, आमच्याकडे हायब्रीड दहशतवादी आहेत, ज्यांच्या नावाची दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये फारशी नोंद नाही. ते त्यांच्या पहिल्या कामगिरीनंतर दहशतवादी बनतात. अशा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हा शब्द कुठून आला? –

न्यूज 18 च्या नुसार, हायब्रीड दहशतवादी हा शब्द सर्वात पहिल्यांदा तेव्हा उदयास आला, जेव्हा ७ ऑक्टोबर २०२१ रोजी श्रीनगरमध्ये एका सरकारी शाळेत द रेसिस्टेंस फ्रंट(टीआरएफ)शी निगडीत असणाऱ्या संशयित दहशतवाद्यांनी दोन गैरमुस्लिम शिक्षकांची हत्या केली होती.

त्यांचा उद्देश काय आहे? –

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशत पसरवणे आणि दहशतवाद व त्यांच्या इकोसिस्टमला लक्ष्य करणारे व्यवसाय व सामाजिक कार्य थांबवणे हा त्यांचा उद्देश आहे. फुटीरतावादी, हिंसाचारी आणि भडकावणाऱ्यांच्या विरोधात उठणारा आवाज ते बंद करतात, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

कसे तयार होतात हे हायब्रीड दहशतवादी? –

असे दहशतवादी निर्माण करण्यासाठी सर्वात अगोदर त्यांचे ब्रेनवॉश केले जाते. धर्म आणि द्वेषाच्या नावावर त्यांना काहीही करण्यासाठी तयार केले जाते. त्यानंतर त्यांना गुप्तरित्या शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. यामध्ये बहुतांश प्रमाणात युवकांचा समावेश असतो, ज्यांना कट्टर बनवले जाते.