scorecardresearch

Premium

विश्लेषण : विमान प्रवासादरम्यान मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवायला का सांगतात? जाणून घ्या खरं कारण…

विमान प्रवासादरम्यान मोबाईल फोन फ्लाईट मोडवर ठेवायला का सांगातात? जाणून घ्या.

why airplane mode during flying
संग्रहित

विमानात बसल्यानंतर उड्डाण करण्यापूर्वी तुम्हाला काही सूचना दिल्या जातात. सीटबेल्ट व्यवस्थित बांधा, खिडकीची काच वर करा आणि मोबाईल फोन फ्लाईट मोडवर ठेवा वगैरे सूचनांचा त्यात समावेश असतो. पहिल्या दोन सूचना आपण समजू शकतो. कारण विमान जेव्हा उड्डाण घेतं तेंव्हा सीटबेल्ट बांधणं आवश्यक असतं, तसेच खिडकीचही काच वर करायला सांगातात, कारण एखादा अपघात झाल्यास बाहेरचं दिसावं, मात्र, मोबाईल फोन फ्लाईट मोडवर ठेवायला का सांगातात? आणि विमानाने उड्डाण केल्यानंतर मोबाईल फोन फ्लाईट मोडवरून काढला तर असं काय बिघडेल? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. त्यामुळे विमानात बसताना मोबाईल फ्लाईट मोडवर का ठेवायला सांगातात, ते जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण : वय वाढतं तसे आपण म्हातारे का होतो? आपल्या शरीरात नेमकं घडतं काय? सविस्तर जाणून घ्या

विमान वाहतुकीदरम्यान विमानचालक आणि नियंत्रण कक्ष यांच्यातील संभाषण हे रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे होते. आज वापरात असलेले डिजिटल तंत्रज्ञान हे जुन्या अॅनालॉग तंत्रज्ञानापेक्षा खूप प्रगत झाले आहे. एका संशोधनानुसार आपण वापरत असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं विमान संप्रेषण आणि नेव्हिगेशन प्रणाली सारखीच फ्रिक्वेन्सी सिग्नल सोडू शकतात. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांमुळे नियंत्रण कक्षाशी होणाऱ्या संभाषणात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विमानात इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यास मनाई करण्यात येते.

हेही वाचा – विश्लेषण : दोन पिढ्यांमधील दुवा! झुलन गोस्वामीची कामगिरी का ठरते प्रेरणादायी?

दरम्यान, १९९२ मध्ये यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने मोबाईल फोन आणि विमान नेव्हिगेशन आणि संप्रेषण या दोन्ही गोष्टींसाठी वेगवेगळी फ्रिक्वेन्सी बँडविड्थ तयार करण्यास सुरुवात केली. जेणेकरून एकमेकांमध्ये व्यत्यय येणार नाही. त्यानंतर इतर देशांनीही वेगवेगळी फ्रिक्वेन्सी बँडविड्थ तयार करण्यास सुरुवात केली. २०१४ पासून युरोपियन युनियनमध्ये विमानात इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, असं असतानाही विमान वाहतूक उद्योगाने विमानात मोबाईल फोनच्या वापरावर बंदी का उठवली नाही? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही बंदी न उठवण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे मोबाईल नेटवर्क आणि टॉवर्स. मोबाईल टॉवर्स हे एकमेकांशी जोडलेले असतात. जर प्रवाशांनी विमानात बसून मोबाईल फोन वापरले, तर नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात ताण येऊ शकतो.

हेही वाचा – विश्लेषण : प्राण्यांवरील अत्याचारांसाठी दंड अवघा १० रुपये? जोधपूरमधील घटनेमुळे PCA कायदा चर्चेत, नेमक्या काय आहेत तरतुदी?

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ५ जी तंत्रज्ञान. सध्याचे ५ जी वायरलेस नेटवर्क उच्च गतीच्या डेटा ट्रान्सफरसाठी बनवण्यात आले आहे. मात्र, विमान उद्योगातील अनेकांसाठी हे चिंतेचे कारण बनले आहे. कारण ५ जी नेटवर्कची बॅंडविथ ही एव्हिएशन बँडविड्थ स्पेक्ट्रमच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे विमान लॅंडिंग करताना विमानतळाच्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained why we should turn our phones on airplane mode while flying spb

First published on: 25-09-2022 at 09:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×