शेळीच्या दुधाचा विषय असेल तर महात्मा गांधी यांची आठवण आल्याखेरीज राहत नाही. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वीच शेळीच्या दुधाचे महत्त्व अधोरेखित केले होते. गावाकडे चला, अशी घोषणाही त्यांनीच दिली. गाई-म्हशीच्या दुधामुळे गाव संपन्न झाले. सहकारी दूध संघामार्फत खेडोपाडी अर्थव्यवस्था उभी राहिली. मात्र, यात शेळीच्या दुधाचा कुठेही उल्लेख आढळत नाही. शेळी-मेंढी पालनाकडे मांस निर्मिती म्हणूनच आजवर पाहिले गेले. श्वेतक्रांतीमध्ये अव्वल ठरलेल्या गुजरातने आता शेळीच्या दुधालाही बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरातचे कृषी मंत्री राघवजी पटेल यांनी सध्या अनौपचारिकरित्या विकल्या जाणाऱ्या शेळीच्या दुधाचे ब्रँडिग आणि विपणन करण्याच्या शक्यतेवर प्रस्ताव मागितले आहेत.

सौराष्ट्रातील सुरेंद्रनगर जिल्ह्यात २६ ऑक्टोबर रोजी गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) (ज्यांच्याकडे अमूलची मालकी आहे), सुरेंद्रनगर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांच्या प्रतिनिधींची आणि यासह पशुसंवर्धन विभागाचे संचालक यांची भेट घेतली. यावेळी शेळीच्या दुधाला वलय मिळवून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.

documentary maker lok rang article marathi news, Lakshadweep marathi article marathi news
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : निसर्गसंवर्धनाची गाथा
Why was Harvey Weinstein conviction overturned in the MeToo case
#MeToo प्रकरणातील अत्याचारी हार्वे वाइनस्टीन यांची शिक्षा रद्द का झाली? चळवळीला धक्का बसणार?
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय

हे वाचा >> शेळीचे दूध दुर्लक्षितच..

गुजरातमध्ये शेळीच्या दुधाची क्षमता किती आहे?

गुजरात पशुसंवर्धन संचालनालयाने नुकताच एक सर्व्हे केला, त्यानुसार राज्यात २०२१-२२ साली शेळ्यांची संख्या ५०.५५ लाख आणि शेळीच्या दुधाचे उत्पादन ३.३९ लाख टन (३२९ लाख लिटर) असल्याचे सांगितले. राज्यात जमा होणाऱ्या इतर दुधाच्या तुलनेत हे प्रमाण केवळ दोन टक्के एवढेच आहे. शेळी (मादी शेळीला डोई म्हणतात) एका वेतामध्ये दिवसाला सरासरी १.५ ते २ लिटर दूध देते. तिचा गर्भधारणा कालावधी १५० दिवसांचा असतो. एक शेळी दरवर्षी जास्तीत जास्त चार करडू जन्माला घालू शकते. एका वेतीचा काळ जास्तीत जास्त चार महिन्यांचा असतो. शेळीचे करडू दोन वर्षांत पुनरुत्पादन (दूध देण्यास) करण्यास सक्षम होते.

गुजरातमध्ये शेळ्यांच्या संख्या (४८.६७ लाख, २०१९ च्या पशुधन गणनेनुसार) इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. राजस्थानमध्ये (२.०८ कोटी), पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये शेळ्यांची संख्या एक कोटींच्या वर आहे.

हे वाचा >> Milk Adulteration: भेसळयुक्त दूध कसे ओळखावे? दुधाची शुद्धता तपासण्यासाठी फॉलो करा ‘या’ २ ट्रिक्स

अमूलची या प्रस्तावावर प्रतिक्रिया काय?

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनकडे (GCMMF) १८ जिल्ह्यांतील दूध उत्पादक संघ आहेत. यात सूरसागर डेअरी या सुरेंद्रनगर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचाही समावेश आहे. फेडरेशनकडून दरदिवशी २५९ लाख लिटर किंवा २,६६७ टन दुधाचे उत्पादन घेतले जाते. यातील ५१ हजार लिटर म्हणजे पाच टक्के उंटाच्या दूधाचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी कच्छमधील उंट पालकांनी दुधाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. इतर सर्व गाय आणि म्हशीचे दूध आहे.

GCMMF ते उपाध्यक्ष वालमजी हुंबाळ यांनी सांगितले, “भारतात कुठेही शेळीच्या दुधाचे ब्रँडिग आणि मार्केटिंग करणारे संघटित दूध संघ सध्यातरी नाहीत. शेळीचे दूध आरोग्यासाठी लाभदायक आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, एखादे उत्पादन कसे ब्रँडेड आणि त्याची जाहिरात केली जाते, यावर बरेच काही अवलंबून आहे आणि यामध्ये दूध उत्पादकांची मोठी भूमिका असते. कोणतेही नवे उत्पादन बाजारात आणणे, हे आव्हानात्मक असते. त्याआधी दूध संघाला खरेदी, प्रक्रिया आणि वितरण साखळी तयार करण्यासाठी भांडवली गुंतवणूक करावी लागते.”

हुंबाळ पुढे म्हणाले, “अनौपचारिक चर्चा सुरू आहे, पण शेळीच्या दुधाचे कमी उत्पादन महत्त्वाची अडचण होऊ शकते. असे असले तरी, जर सूरसागर दूध संघाने दूध गोळा करण्याची जबाबदारी घेतली, तर अमूल हे दूध स्वीकारेल आणि त्यावर प्रक्रिया आणि मार्केटिंग करण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल.”

हे वाचा >> गाढविणीचं दूध एवढं महाग का विकले जाते? कसा बनवला जातो त्यापासून साबण? जाणून घ्या

शेळी-मेंढी पालन करणाऱ्यांना याचा फायदा कसा होणार?

शेळी-मेंढी पालन करणाऱ्यांचे उत्पादन विकण्यासाठी कोणतीही औपचारिक यंत्रणा नसल्यामुळे पशुपालक शेळीच्या दुधाचा मावा आणि मिठाईचे घटक बनविण्यासाठी वापर करतात किंवा शेळीचे दूध स्थानिक चहा विक्रेते किंवा हॉटेल चालकांना प्रति लिटर २१ रुपये दराने विकण्यात येते. काही वेळा शेळीचे दूध इतर दुधात मिश्रण करून विकण्यात येते.

सुरेंद्रनगर जिल्हा शेळी-मेंढी पालक मालधारी संघाचे अध्यक्ष नरन रबारी हे शेळीच्या दुधाचे संकलन आणि जाहिरात वेगळ्या पद्धतीने व्हावी, यासाठी आग्रही आहेत. ते म्हणाले, २०१८ पर्यंत अमूलने कच्छच्या सरहद डेअरीकडून उंटाचे दूध खरेदी सुरू करेपर्यंत उंट पाळणाऱ्यांची आमच्यासारखीच अवस्था होती. आता उंटपालकांना प्रति लिटर ५१ रुपयांचा भाव मिळत आहे.

नवसारीमधील कामधेनू विद्यापीठाच्या पशुधन संशोधन विभागातील संशोधक शास्त्रज्ञ सुनील चौधरी म्हणाले की, अमूलसारख्या मोठ्या दूध संघाकडून जर खरेदी होणार असेल तर शेळीपालन व्यवसायाला नवी उभारी मिळेल. शेळी-मेंढी पालन करणाऱ्यांना यातून चांगला नफा मिळू शकतो आणि बाजाराला शेळीच्या दुधाची उपलब्धता होऊ शकते.

सूरसगार दूध संघाचे अध्यक्ष बाबा भारवड म्हणाले की, शेळीच्या दुधापासून चांगल्या दर्जाचे चीझ तयार केले जाऊ शकते.

यामुळे शेळीचा दुधाळ प्राण्यात समावेश होऊ शकतो?

सुनील चौधरी म्हणाले की, शेळी रोज जेवढे दूध देते, त्याची तुलना इतर दुधाळ प्राण्यांशी केल्यास शेळीला दुधाळ प्राणी म्हणता येणार नाही. शेळीचे संगोपनच मुळात मांस आणि दूध या दोन गरजांसाठी केले जाते. जर शेळीच्या दुधाची वेगळी ब्रँडिंग आणि मार्केटिंग केल्यास शेळी-मेंढी पालन करणाऱ्यांना अधिकचे पैसे मिळू शकतात. पण, तरीही शेळ्यांचा कळप सांभाळणे परवडावे यासाठी शेळ्यांना शेवटी कत्तलखान्याची वाट दाखवावी लागेल.

गुजरातमधील पशुधन निर्यातदार असोसिएशनचे सचिव आदिल नूर म्हणाले की, अहमदाबादच्या बकरा मार्केटमधून दर आठवड्याला १० हजार बोकडांचा व्यापार होतो. बोकडाचे मांस सध्या प्रतिकिलो ६५०-७०० रुपये दराने विकले जात आहे. १० किलो वजन असलेले बोकड भारतीय बाजारात ५,५०० ते ६००० रुपयांना विकले जाते आणि परदेशात निर्यात करताना त्याची ७,५०० एवढी किंमत मिळते.

शेळीच्या दुधाचे काय फायदे आहेत?

नरन रबारी यांनी शेळीच्या दुधाचे फायदे सांगण्यासाठी महात्मा गांधी यांचे उदाहरण दिले. महात्मा गांधी शेळीच्या दुधाला प्राधान्य देत असत. शेळी हिरवी पाने, औषधी वनस्पती, झुडुपे आणि गवत खात असल्यामुळे तिच्या दुधाला अनन्यसाधारण औषधी महत्त्व आहे.

अनिल चौधरी यांची संस्था सध्या सुरती जातीच्या शेळी विकसित करण्यासाठी संशोधन करत आहे. त्यांनी सांगितले की, शेळीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण तीन टक्क्यांच्या आसपास असते, हे प्रमाण आईच्या दुधाइतकेच आहे. त्यामुळे हे दूध पचण्यासाठी अतिशय हलके असते. नवजात बाळाच्या आईला दूध देण्यास काही अडचणी निर्माण झाल्या तर डॉक्टर नवजात बाळाला बकरीचे दूध देण्याचा सल्ला देतात.