शेळीचे दूध म्हटले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आठवण येते. दिवसाला अर्धा लिटर शेळीचे दूध पिणारे गांधीजी जीवनाच्या अखंड घडामोडीत कधीही आजारी पडले नाहीत. शेळीचे दूध इतर कोणत्याही जनावराच्या दुधापेक्षा पचायला हलके तर आहेच. परंतु आहार मूल्याच्या दृष्टीनेसुद्धा ते एक शक्तिदायक व औषधी समजले जाते. एक परिपूर्ण सकस आहार म्हणून आजही शेळीचे दूध सर्वज्ञात आहे. लहान बालकांना तर मातेच्या दुधाखालोखाल पचनाला हलके शेळीचे दूध असते. तसा शेळी हा एक अत्यंत गरीब आणि सहजासहजी व्यवस्थापन करता येण्यासारखा प्राणी आहे. तरीसुद्धा आयुर्वेदाचा देशात प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भारतासारख्या देशात शेळी हा प्राणी दुधापेक्षा मांस उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. किंबहुना शेळी पालन करण्याचा मुख्य उद्देशच मटनाचा किंवा मांस निर्मिती असतो. साधारणपणे एका शेळीपासून मिळणारे दूध चार जणांच्या एका कुटुंबाला सहज पुरेसे होते. गरीब कुटुंबात शेळीला एक प्राणी म्हणून नव्हे तर एक कुटुंबातील घटक म्हणून जोपासले जाते.

शेळी पालनामध्ये सुधारणा होण्यासाठी राज्य शासनाने शेळी मेंढी प्रकल्प चालू केले. याद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज वाटून उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन मिळवून दिले. सद्यस्थितीत शेळीच्या जगात जवळपास १०४ प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत. हवामानातील बदलानुसार त्यांचे भारतासारख्या उष्ण कटीबंधीय प्रदेशामध्ये शेळीच्या २७ प्रकारच्या जाती आढळतात. देशी शेळी एका वेतात साधारणपणे ६० लिटर दूध देते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्य़ाचे काळे सोने म्हणून राष्ट्रीय पातळीवर उल्लेखलेली ‘उस्मानाबादी शेळी’ सर्वज्ञात आहे.

Strawberry Season end due to Water Shortage
पाण्याअभावी स्ट्रॉबेरीचा हंगाम आटोपला
Women at workplace
लैंगिक समानता असलेल्या कंपन्यांमध्ये महिला असतात अधिक प्रामाणिक, सर्वेक्षणातून अनेक खुलासे समोर!
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा

सानेनसारख्या विदेशी जातीपासून संकर केलेली एक शेळी एका वेतात ३०० लिटपर्यंत दूध देते. म्हणूनच तर या शेळीला ‘दुधाची राणी’ म्हणून ओळखले जाते. भारतापेक्षा युरोपीय राष्ट्रांमध्ये शेळीच्या दुधाबाबत अधिक जागरूकता आहे. स्वित्र्झलडसारख्या देशामध्ये शेळीला ‘स्वीस बेबीज फॉस्टर मदर’ (लहान बाळाची पालकमाता) असे संबोधले जाते. काही युरोपीय राष्ट्रांमध्ये शेळीला ‘वेटनर्स ऑफ इनफंट्स’ अर्थात ‘अर्भकाची दाई’ मानले जाते.

आहारमूल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन शास्त्रीयदृष्टय़ा आहारासंबंधी करण्यात आलेल्या एका अभ्यासात पाच महिने वय असलेल्या ३६ बालकांवर शेळीच्या व गाईच्या दुधाचा प्रयोग करण्यात आला. त्यातील काही बालकांना गाईचे दूध तर काही बालकांना शेळीचे दूध दिले असता असे आढळून आले की शेळीचे दूध प्राशन केलेल्या बालकांमध्ये वजनातील वाढ, उंची सुदृढपणा, हाडातील खनिज द्रव्यांची पातळी, रक्तातील जीवनसत्व ‘अ’ कॅल्शिअम, थायमिन, रोबोप्लेविन, नाएसिन आणि हिमोग्लोबीनच्या प्रमाणात तुलनात्मकदृष्टय़ा वृद्धी झालेली होती. महत्त्वाची बाब ही की एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पोषकमुल्ले असणारे शेळीचे दूध आजही अनेकांकडून नाकारले जाते याचे प्रमुख कारण म्हणजे शेळीच्या दुधाला येणारा एक विशिष्ट प्रकारचा वास. अर्थात चांगल्या पद्धतीने हाताळलेले आणि आरोग्यदृष्टय़ा शुद्धतेच्या दृष्टीने काढलेल्या दुधाला वास येत नाही.

chart

‘६ ट्रान्स नेनोनल’ या घटकामुळे बोकडाच्या शरीराला विशिष्ट प्रकारचा वास येतो. शेळ्याच्या कळपात जर बोकड असेल आणि तो कळपापासून वेगळा ठेवला नसेल, तर अशा ठिकाणी काढलेल्या दुधाला बोकडाचा विशिष्ट वास येतो. म्हणून शेळीचे दूध काढते वेळी कळपापासून बोकड नेहमी दूर ठेवावा. म्हणजे दुधास नराचा वास येणार नाही. जागतिक पातळीवर अनेक तज्ज्ञांनी व शास्त्रज्ञांनी शेळीच्या दुधाचा सखोल अभ्यास केला. संशोधनाअंती असे आढळून आले की शेळीच्या दुधामुळे पचनशक्ती तर वाढतेच शिवाय हृदयरोगासाठी कारणीभूत असणाऱ्या कोलेस्टेरॉलची साठवण शरीरामध्ये कमी करते. तसेच इतर जनावरांच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस यांचे प्रमाण अधिक असते. विविध आम्लांचे प्रमाण शेळीच्या दुधामध्ये अधिक असते. याचा उपयोग माणसाच्या चयापचय क्रियेतील विकारांवर व आतडय़ाचे व्रण इत्यादींवर उपचार म्हणून केला जातो.

अशाप्रकारे सर्वपोषण आहार म्हणून शेळीचे दूध समजले जाते. अगदी बालकापासून ते वृद्धांपर्यंत सर्वानाच याचा फायदा होतो. गरज आहे ती फक्त आधुनिक शेळीसंवर्धनाची, उत्तम जोपासणेची, जाणिवेची व दुर्लक्षित पोषण आहाराला लक्ष्यित करण्याची..

आहारमूल्याच्या दृष्टीने शेळीच्या दुधाची चर्चा करताना त्यातील घटकद्रव्यांची माहिती असणे आवश्यक आहे.

  • सर्वसाधारणपणे शेळीच्या दुधात आद्र्रता ८५ ते ८७ टक्के, प्रथिने ३.० ते ३.५ टक्के, स्निग्धता ४.५ टक्के, शर्करा (लॅक्टोज) ४ ते ५ टक्के आणि खनिज पदार्थ ०.५ ते १ टक्के असतात.
  • शेळीचे दूध पचनास हलके असण्याचे कारण म्हणजे दुधातील स्निग्ध पदार्थाच्या कणांचा सूक्ष्म आकार होय.
  • शेळीच्या दुधात शरीरविरोधी सूक्ष्मजंतूंचा नाश करणारे घटक, ज्याला आपण अँटीबॉडीज म्हणतो, हे अधिक असतात. त्यामुळे उपद्रवी ठरू पहाणाऱ्या सूक्ष्म जंतूंचा नाश नैसर्गिकरीत्या होतो.
  • शेळीच्या दुधात सर्वाधिक म्हणजे ९ ते १० प्रकारची खनिजे आढळून येतात. परिणामी आवश्यक खनिज घटकांची कमतरता कमी होण्यास चांगल्याप्रकारे मदत होते.
  • शेळीच्या दुधामध्ये गाईच्या दुधापेक्षा तुलनात्मकदृष्टय़ा अधिक आम्ले असतात. याची कल्पना सोबत दिलेल्या तक्त्यावरून सहज करता येऊ शकते.
  • वातावरणामध्ये सरासरी तापमानाला (३० अंश ते ३२ अंश से.) शेळीचे दूध कमीत कमी ९ तास चांगल्या स्थितीत राहू शकते.

pankaj_hase@rediffmail.com

(लेखक स्नातकोत्तर पशुवैद्यक पशुविज्ञान संस्था, अकोला येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)