IS Your Phone Waterproof: वॉटरप्रूफ फोन हे पूर्वी केवळ बांधकाम कामगारांसाठी किंवा माउंटन बाइकर्ससाठी डिझाइन केले होते. मात्र आता iPhone 13 Pro, Galaxy S22 Ultra आणि नवीन Pixel 6 आणि Pixel 6 Pro यासारख्या नवीन युगातील मॉडर्न फोनमध्ये ही हे फीचर आढळून येते. वॉटरप्रूफ फोन असावा अशी इच्छा प्रत्येकाची असते. विशेषतः अशी मंडळी ज्यांना घाई गडबडीत वस्तू पाडण्याची खूप सवयच असते. चुकून कधी फोनवर चहा सांडला, कधी पाण्यात फोन पडला, अशावेळी अन्य कोणते फीचर नसले तरी फोनचा जीव वाचवणारं वॉटरप्रूफ फीचर खूप महत्त्वाचं असतं. अलीकडे अगदी स्वस्त फोनमध्येही हे फीचर असतं पण नेमका आपला फोन किती वॉटरप्रूफ आहे हे ओळखायचं कसं?

फोन वॉटरप्रूफ आहे असं फीचर जरी तुम्हाला खरेदीच्या वेळी सांगण्यात येत असलं तरी फोन किती वॉटरप्रूफ आहे हे ओळखणं महत्त्वाचं आहे. अर्थात यासाठी तुम्ही प्रयोग करून पाहू शकत नाही. एक साधा उपाय म्हणजे तुमच्या फोनचा आयपी कोड तपासणे. IP67, IP68 किंवा IPX8 असे आयपी कोड आपल्याला फोनच्या सेटिंगमध्ये दिसतील. नेमका याचा अर्थ काय हे आज आपण पाहणार आहोत..

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
sleep fundamental right
Right to Sleep : भारतात झोप हा खरंच मूलभूत अधिकार आहे का?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन

IP67, IP68 and IPX8 याचा नेमका अर्थ काय?

IP, हे आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनने सेट केलेले मानक आहेत. हा आयपी कोड विद्युत उपकरणांच्या निर्मात्यांनी प्रदान केलेल्या संरक्षणाचा स्तर सांगण्यासाठी दिलेला असतो. रेटिंग कोडमधील पहिला क्रमांक हा धूळ, माती, कचरा अशा घन वस्तूंपासून दिलेल्या संरक्षणाचे प्रमाण दर्शवितो. हे संरक्षण 0 ते 6 पर्यंत असते.तर दुसरी संख्या आर्द्रता किंवा द्रव घटकांपासून संरक्षणाचे प्रमाण दर्शवते, ज्यामध्ये संरक्षण 0 ते 8 पर्यंत असते.

काहीवेळा तुम्हाला आयपी रेटिंग दिसेल ज्याच्या जागी X ने नंबर दिलेला असेल, जसे की IPX8. याचा अर्थ कंपनीने चाचणीचे तपशील दिलेले नाहीत त्यामुळे रेटिंग क्रमांक X ने बदलला आहे. IPX8-रेट केलेले डिव्हाइस पाण्यात बुडूनही काम करू शकते परंतु धूळपासून संरक्षणासाठी अधिकृतपणे रेट केलेले नाही.

iPhone 13 Pro ला IP68 रेटिंग आहे, याचा अर्थ हा फोन धुळीपासून संरक्षित आहे आणि पाण्यात बुडूनही काम करू शकतो. तसेच Galaxy S22 Ultra सुद्धा IP68 रेट केलेले आहे. म्हणजे हा फोनही पूर्णपणे वॉटरप्रूफ असेल बरोबर? पण नाही, खरा गोंधळ इथेच आहे.

आयपी रेटिंग वरील 8 नुसार फोन हा ३० मिनिटांसाठी १ मीटर खोल पाण्यात बुडून राहू शकतो पण हे निर्मात्यावर अवलंबून आहे. म्हणजेच iPhone 13 Pro ६ मीटर पाण्यात ३० मिनिटांपर्यंत सुरक्षित असतो तर S22 अल्ट्रा ३० मिनिटांपर्यंत १.५ मीटर पाण्यात राहू शकतो.

आयपी कोड वॉटरप्रूफ सुरक्षेचा स्तर वेळ वापर
0
1उभ्या रेषेत पडणाऱ्या पाण्यापासून संरक्षण१० मिनिटहलका पाऊस 
2१५ डिग्रीमध्ये फोन पकडलेला असताना उभ्या रेषेत पडणाऱ्या पाण्यापासून संरक्षण १० मिनिटहलका पाऊस 
3६० अंशात फोन धरला असल्यास पाण्याचा थेट फवारा व उभ्या रेषेत पडणाऱ्या पाण्यापासून संरक्षण५ मिनिट हलका पाऊस व फवारा 
4पाण्याचा थेट फवारा व हलके शिंतोडे५ मिनिट पाऊस व फवारा
5६.३ mm व्यासाच्या कोणत्याही दिशेने येणाऱ्या कमी दाबाच्या पाण्यापासून संरक्षण३ मीटर अंतरापासून ३ मिनिटपाऊस, स्वयंपाकघर आणि बाथरूमच्या नळातील पाण्यापासून संरक्षण
612.5 मिमी व्यासाच्या कोणत्याही दिशेने येणाऱ्या शक्तिशाली पाण्यापासून संरक्षण३ मीटर अंतरापासून ३ मिनिटपाऊस, स्वयंपाकघर आणि बाथरूमच्या नळातील पाण्यापासून संरक्षण
730 मिनिटांपर्यंत 1 मीटर (किंवा 3.3 फूट) खोली असलेल्या पाण्यात बुडून संरक्षण30 मिनिटेपाऊस आणि पाण्यात बुडणे
81 मीटरपेक्षा जास्त खोली असलेल्या पाण्यात बुडविण्यापासून संरक्षित (निर्मात्याने अचूक खोली निर्दिष्ट करणे आवश्यक आहे).किमान 30 मिनिटेपाऊस आणि पाण्यात बुडणे

माझ्या फोनला आयपी रेटिंग नाही.. माझा फोन वॉटरप्रूफ नाही का?

एखाद्या कंपनीला उत्पादनाला IP रेटिंग असल्याची जाहिरात करण्यासाठी आधी कठोर चाचण्या द्याव्या लागतात. या चाचण्या वेळखाऊ आणि महाग असू शकतात. अनेक कंपन्या यासाठी रोख खर्च करू इच्छित नाहीत, विशेषतः जेव्हा बजेट-केंद्रित मॉडेल्सचा विचार केला जातो.

हे ही वाचा<< विश्लेषण: ८० हून अधिक लोकांचे प्राण घेणारा ‘Blackout Challenge’ चा ऑनलाईन ट्रेंड नेमका आहे तरी काय?

काही फोन जसे की, Motorola च्या Moto G50 हे अधिकृत IP रेटिंगशिवाय “वॉटर-रेपेलेंट” किंवा “वॉटर-रेझिस्टंट” असे फीचर असल्याची जाहिरात करतात. यावेळी फोन पाण्यात बुडून राहू शकत नाही. ओलावा व आर्द्रता रोखण्यासाठी हा फोन सक्षम असू शकतो. यासाठी वॉटर-रेपेलेंट नॅनो कोटिंगचा वापर केला जातो. सोप्या शब्दात सांगायचं तर हे फोन तुम्ही पाण्यात बुडवून वापरू शकत नाही मात्र हलक्या पावसात फोनवर बोलताना आपल्याला घाबरण्याची गरज नाही.