अ‍ॅप्पलच्या नव्या तंत्रज्ञानाबद्दल कायमच उत्सुकता असते. नव्या फोनमध्ये काय फिचर्स असेल याबद्दल चर्चा असते. आता अ‍ॅप्पलमधील आयफोनमध्ये पेरिस्कोप लेन्स असेल अशी जोरदार अफवा आहे. अ‍ॅप्पलचे लोकप्रिय विश्लेषक मिंग ची कुओ यांच्या मते पेरिस्कोप लेन्स २०२३ मध्ये येणाऱ्या आयफोनमध्ये असेल. त्यामुळे पेरिस्कोप लेन्स म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे, स्मार्टफोनच्या बाहेर न येता पेरिस्कोप कसं काम करेल याबाबत जाणून घेऊयात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेरिस्कोप लेन्स पहिल्यांदाच मोबाईल फोनमध्ये येणार आहे, अशातला भाग नाही. यापूर्वीही Huawei आणि Samsung यासारख्या स्मार्टफोन ब्रँडच्या काही फ्लॅगशिफ मॉडेल्समध्ये आधीपासूनच पेरिस्कोप लेन्स आहे. स्मार्टफोनमध्ये पेरिस्कोप लेन्स पहिल्यांदा Huawei द्वारे 5x ऑप्टिकल झुम कॅमेरा देण्यात आला होता. शार्प 902 हा स्मार्टफोन २००२ साली लॉन्च करण्यात आला होता. एकच लेन्स वापरून 2x ऑप्टिकल पेरिस्कोप लेन्ससारखा सेटअप असलेला पहिला फोन होता. यानंतर सॅमसंगने गॅलेक्सी एस २० अल्ट्रा या स्मार्टफोनमध्ये पेरिस्कोप लेन्सचा वापर केला होता. पण लहान फॉर्ममध्ये पेरिस्कोप लेन्स सेटअपचा कॅमेरा कसा काम करतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. स्मार्टफोन कॅमेरा सेन्सर थेट सेन्सरच्या मागे ठेवलेले असतात आणि प्रकाश लेन्समधून थेट सेन्सरवर पडतो जो इमेज कॅप्चर करतो.

WhatsApp नवं फिचर आणण्याच्या तयारीत; आसपासच्या रेस्टॉरंट-स्टोअर्सबद्दल माहिती कळणार

पेरिस्कोप लेन्स पाणबुडीशी संबधित आहे. पाणबुड्यांमध्ये लेन्स किंवा पेरिस्कॉप कॅमेऱ्यांचा वापर पाण्यामधून पृष्ठभागावरील हालचाली पाहण्यासाठी केला जातो. एका लांब ट्यूबच्या दोन्ही टोकाला ४५ अंश कोन असलेल्या लेन्स असात. पहिल्या ४५ डिग्रीपासून दुसऱ्या ४५ डिग्री दरम्यान प्रतिमा प्रतिबिंबित होते. त्यामुळे अडथळ्याविना चित्र स्पष्ट दिसतं. तसेच स्मार्टफोन पेरिस्कोपमध्ये झूम कॅमेरा सेटअपच्या बाबतीत कंपन्या ९० डिग्री उच्च गुणवत्तेचा प्रिझम वापरतात आणि लेन्स आणि सेन्सरच्या अ‍ॅ रेसह उभ्या मांडणीत ठेवतात. सेन्सर फोनच्या मागील बाजूस दिसत असलेल्या प्रिझमपासून ९० अंश कोनात ठेवलेला असतो. हा संपूर्ण सेटअप आयताकृती कमी जागेत सेट केला जातो. त्यामुळे त्याची लेन्स बाहेर येत नाही.

बहुतेक ब्रँड प्रिझम आणि फोल्ड केलेले ऑप्टिकल झूम सेन्सर वापरतात जसे की सॅमसंग 4x फोल्ड केलेले टेलिफोटो लेन्स वापरते जे प्रिझमद्वारे रिफ्रॅक्ट होणारी प्रतिमा झूम करते जी नंतर सेन्सरवर येते. स्मार्टफोन ब्रँड्सनी उच्च पातळीची अंमलबजावणी करण्यास देखील सक्षम केले आहे. उदाहरणार्थ, सॅमसंग अंतर्गत अल्गोरिदम वापरून पेरिस्कोप झूम लेन्सद्वारे 10x हायब्रिड झूम ऑफर करते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to work periscope lence in smartphone rmt
First published on: 04-01-2022 at 15:01 IST