भांडवली बाजारात गुंतवणूकदार सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता अनुभवत आहेत. गेल्या काही सत्रांमध्ये सेन्सेक्स ३ ते ४ टक्क्यांनी घसरला आहे. बाजारातील ही अस्थिरता कशामुळे आहे, अस्थिरता मोजणारा निर्देशांक इंडिया व्हीआयएक्स काय संकेत देतोय हे जाणून घेऊया…

इंडिया व्हीआयएक्स म्हणजे काय?

इंडिया व्हीआयएक्स हा एक भांडवली बाजारातील अस्थिरता मोजणारा निर्देशांक आहे, जो राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईद्वारे गणला जातो. निर्देशांकाचा उपयोग नजीकच्या कालावधीतील अस्थिरता आणि बाजारातील चढ-उतारांसाठी शक्यता मोजण्यासाठी केला जाते. हा निर्देशांक एनएसईने प्रथम वर्ष २००३ मध्ये सादर केला होता. मात्र, अस्थिरता दर्शवण्याऱ्या या निर्देशांकाची मूळ संकल्पना वर्ष १९९३ पूर्वीची आहे, जी शिकागो बोर्ड ऑप्शन्स एक्सचेंजने सादर केली होती. जेव्हा बाजारात सतत चढ-उतार होत असतात आणि शेअर वर-खाली होत असतो तेव्हा त्यानुसार अस्थिर निर्देशांकात मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहू शकतो. त्याचप्रमाणे, जेव्हा बाजार अधिक स्थिर असतो तेव्हा व्हीआयएक्स निर्देशांक उच्चांकी पातळीवर असतो आणि अस्थिरता कमी असते, तेव्हा व्हीआयएक्स निर्देशांकात घसरण होते. शकता. हा निर्देशांक पुढील नजीकच्या कालावधीतील म्हणजेच पुढील ३० दिवसांमध्ये बाजाराबद्दल गुंतवणूकदारांची धारणा दर्शवतो.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Pm Narendra modi Speech in Nashik
“मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला..”, पुढे नेमकं काय घडलं?
Narendra Modi
“मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो, मला अनेक मुस्लीम मित्र, पण २००२ नंतर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Ghatkopar incident
Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; VIDEO समोर!
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
issue of Excess Fare Ticket in train
विश्लेषण : जनरल रेल्वे प्रवासीही आरक्षित डब्यात… काय आहे ‘ईएफटी’ तिकीट? त्यामुळे प्रवाशांचा जीव का गुदमरतोय?

हेही वाचा >>> विश्लेषण : महागाईने बिघडवले थाळीचे गणित?

इंडिया व्हीआयएक्स कसा मोजला जातो?

इंडिया व्हीआयएक्स निर्देशांकातील वाढ आणि घसरण बाजाराची अस्थिरता ठरवते.  गुंतवणूकदारांना त्यांची बाजारात आगामी मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा त्यांनी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा मागोवा घेण्यास आणि बाजारातील परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो. इंडिया व्हीआयएक्स निर्देशांक हा निफ्टी निर्देशांकाप्रमाणे नाही. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, निफ्टी हा त्यात सहभागी असलेल्या कंपन्यांच्या किमतीवरून गणला जातो, तर अस्थिर निर्देशांक म्हणजेच इंडिया व्हीआयएक्स हा लोकप्रिय ब्लॅक अँड स्कोल्स मॉडेलवर आधारित आहे. हा निर्देशांक पाच व्हेरिएबल्स म्हणजे ज्यात स्ट्राइक किंमत, शेअरचा बाजारभाव (स्पॉट प्राईस), करार मुदत समाप्ती, जोखीम मुक्त दर आणि अस्थिरता यावर अवलंबून आहे. व्हीआयएक्स मूल्याचा अस्थिरतेशी थेट संबंध आहे, याचे मूल्य जितके जास्त असेल तितकी अस्थिरता जास्त असते. तर, मूल्य कमी असल्यास बाजारातील अस्थिरता कमी होईल असे समजले जाते.

भारतीय शेअर बाजाराबाबत काय संकेत?

व्हीआयएक्स निर्देशांक सध्या १७ ते १९ श्रेणीत आहे आणि वरचा अडथळा पार केल्यावर तो लवकरच २२ गुणांकावर पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या आठवड्यात सलग पाच सत्रात शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. इंडिया निर्देशांक सध्या १८.६६ गुणांकवर आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, त्याचा वरच्या दिशेने प्रवास सुरू राहणार आहे. म्हणजे येत्या महिन्याभरात बाजारातील अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता आहे. व्हीआयएक्सला सध्या चालना देणारे प्राथमिक घटक सध्याच्या लोकसभा निवडणुका, जागतिक पातळीवर अमेरिकी रोख्यांचा वाढता परतावा दर आणि भौगोलिक-राजकीय तणाव हे आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात तो २२ गुणांकावर पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा >>> अमेरिकेत आशियाई वंशाच्या नागरिकांविरुद्ध द्वेष वाढत आहे का? सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

अस्थिरता वाढीची कारणे काय?

भारतात सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ४ जून, २०२४ रोजी जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा बाजारावर काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय परदेशी गुंतवणूकदारांनीदेखील भांडवली बाजारात समभाग विक्रीचा सपाटा सुरूच ठेवला आहे. व्हीआयएक्स निर्देशांक १६ गुणांक पातळीच्या खाली सरकण्यात अयशस्वी झाल्यास बाजारात समभाग विक्रीचा अधिक दबाव दिसून येईल. परिणामी बाजारात मूळ मुद्दल बचतीकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारतीय बाजाराबाबत आकडेवारी काय सांगते?

इंडिया व्हीआयएक्स निर्देशांकात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. तो गुणांक सध्या १७ ते १९ या श्रेणीत आहे. देशभरात ४ जून २०२४ रोजी जाहीर होणाऱ्या  लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी भारतीय शेअर बाजारात असलेल्या भीतीच्या घटकाचे सध्या संकेत मिळत आहेत. व्हीआयएक्समध्ये आणखी वाढ होण्याचे ते संकेत आहेत. मात्र इंडिया व्हीआयएक्सने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ३९.९० गुणांकाचा उच्चांक गाठला होता. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी तो ३० गुणांकावर पोहोचला होता.  वर्ष २००८ मध्ये ज्यावेळी शेअर बाजार कोसळला होता त्यावेळी भारताचा व्हीआयएक्स ९२ च्या पातळीवर गेला होता, तर २०२० मध्ये करोना महासाथीचा उद्रेक झाल्यानंतर तो ८६.६३ च्या शिखरावर पोहोचला. आता मात्र अजूनही तो २० पातळीवर असून २२ पर्यंत मर्यादित पातळीत मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. 

जागतिक घटना काय संकेत देतात?

गेल्या आठवड्यात काय घडले हे बघू या, जेणेकरून येत्या काही सत्रात काय अपेक्षित आहे याचा अंदाज लावता येईल. सध्याच्या या बाजार घसरणीचे नेतृत्व बँक निफ्टीने केले, परिणामी त्याने एकंदर निफ्टीला खाली खेचले. अमेरिकी डॉलर इंडेक्स वधारला, ज्यामुळे भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांवर दबाव आला आणि परदेशी गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. मजबूत डॉलरसह बुलियन म्हणजेच सोने आणि तेल आणि ऊर्जेशी निगडित कमॉडिटीचे भाव वधारले. म्हणजेच गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून दुसऱ्या गुंतवणूक साधनांमध्ये पैसा वळवण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणुकीमध्ये विविधता आणत ते उच्च परतावा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयादेखील घसरला आहे, त्याचादेखील भांडवली बाजारावर दबाव दिसून येतो आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजारभांडवल कमी झाले आहे. शिवाय गेल्या काही महिन्यात सेन्सेक्स, निफ्टीमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर सोने, चांदी, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाली आहे. अमेरिकी भांडवली बाजारदेखील सकारात्मक आहेत. मंगळवारी इंडिया व्हीआयएक्स सध्या २० ते २१.८८ गुणांकादरम्यान आहे. विद्यमान वर्षात १ जानेवारीला तो १५ वर होता. २३ एप्रिल रोजी त्याने १०.२० चा नीचांक गाठला तर सध्या तो २०.६८ गुणांकावर असून आगामी काळात वाढण्याची शक्यता दर्शवतो आहे. म्हणजेच बाजारात येत्या काळात अस्थिरता वाढण्याचे संकेत त्यातून मिळत आहेत.