भारतात २०१८ मध्ये करण्यात आलेल्या अखेरच्या व्याघ्रगणना सर्वेक्षणात २९६७ वाघांची नोंद करण्यात आली. जगभरातील एकूण व्याघ्रसंख्येच्या ७५ टक्के वाघ भारतात असल्याचा आनंद पंतप्रधानांपासून तर सर्वांनीच साजरा केला. मात्र, यावर्षी तब्बल १२७ वाघांचा मृत्यू झाला आहे, तो मागील दोन वर्षाच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे. जन्मदराच्या तुलनेत वाघांच्या मृत्युदराचा आलेख झपाट्याने उंचावल्याने व्याघ्रसंवर्धनावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

वाघांच्या शिकारीची कारणे

sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…

भारतात काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील बहेलिया शिकार जमातीने धुमाकूळ घातला होता. २०१३ ते १६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात शिकारी उघडकीस आल्या. त्याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचल्याचे तेव्हा लक्षात आले. शेकडो शिकाऱ्यांना अटक करण्यात आली आणि बहेलियांचा धुमाकूळ बऱ्याच प्रमाणात थांबला. मात्र, आता स्थानिक शिकाऱ्यांचा धोका वाघांना निर्माण झाला आहे. सोबतच जंगलालगतचे शेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात तृणभक्षी प्राण्यांमुळे पिके नष्ट होत आहेत. या तृणभक्षी प्राण्यांच्या मागावर वाघ-बिबटे येत आहेत. त्यामुळे शेतकुंपणावर वीजप्रवाह सोडणे, गावातील जनावरे मारल्यास त्यावर विष टाकणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष ही वाघांच्या मृत्यूची अलीकडे समोर आलेली कारणे आहेत.

व्याघ्रसंवर्धन जबाबदारी

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल खात्याच्या अखत्यारितील राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ही व्याघ्रप्रकल्पांचे पालकत्व सांभाळणारी सर्वोच्च संस्था आहे. नवीन व्याघ्र प्रकल्पांना मान्यता देणे, व्याघ्र प्रकल्पांची हद्द निश्चित करणे, व्याघ्र प्रकल्पांची सुरक्षा व त्यासाठी कृती आराखडा तयार करणे, मार्गदर्शक सूचना तयार करणे, वाघांच्या गणनेबरोबरच त्यांच्या शिकारीवर नियंत्रण अशी सर्व जबाबदारी प्राधिकरणावर असते. व्याघ्रसंवर्धनाचे उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यामुळे वाघ वाढल्याचे श्रेय घेत असताना त्याच्या मृत्यूची जबाबदारीदेखील प्राधीकरणाचीच आहे.

जबाबदारी डावलण्याचा प्रकार

२०२१ मध्ये वाघांच्या मृत्यूने शंभरी पार केल्यानंतर केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यास सुरुवात झाली आहे. केंद्राने म्हटले आहे की राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाने ‘प्रोजेक्ट टायगर’अंतर्गत शिकारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. तरीही वाघांच्या मृत्यूलाच माध्यमे ठळकपणे प्रसिद्धी देतात, हे खेदजनक आहे, असे केंद्राचे म्हणणे आहे. वाघांची संख्या वाढल्यानंतर शुभेच्छांचा स्वीकार करणाऱ्या केंद्राला वाघांच्या शिकारींनंतर आलेली टीका स्वीकारणे कठीण जात असल्याचेच या स्पष्टीकरणावरून दिसून येते.

महाराष्ट्राची स्थिती

महाराष्ट्रात २०२१ या वर्षात २७ वाघांच्या मृत्यूची नोंद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाने घेतली. मात्र, वनखात्याने ३२ वाघांचा मृत्यू या एका वर्षात झाल्याचे सांगितले. महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवातच एक वाघीण आणि तीन बछड्यांच्या शिकारीने झाली होती. वर्षाची अखेर देखील वाघिणीच्या मृत्यूने झाली. त्यातील १८ मृत्यू नैसर्गिक, सहा वाघांची शिकार, तीन वाघ वीजप्रवाहाने, एक वाघाचा रेल्वे अपघात तर चार वाघांच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात असून अद्याप चौकशी सुरूच आहे.

जन्मदराच्या आनंदावर मृत्युदराचे विरजण

भारतात २००६च्या गणनेत १४११ वाघ होते, तर २०१० मध्ये १७०६ वाघ होते. २०१४ मध्ये ही संख्या २२२६ वर आली आणि आता ती २९६७ वर पोहोचली. वाघांच्या संख्येनुसार पहिल्या तीन राज्यात अनुक्रमे कर्नाटक, उत्तराखंड व मध्य प्रदेशचा समावेश आहे. वाघांच्या वाढत्या आकडेवारीचा आनंद देशभर साजरा होत असताना गेल्या तीन वर्षातील वाघांच्या मृत्युने या आनंदावर विरजण घातले आहे. २०१९ मध्ये भारतात ९५ वाघ मृत्युमुखी पडले होते, तर २०२० मध्ये ही संख्या १०६ वर गेली.

गेल्या वर्षभरातील वाघांच्या १२७ मृत्युंपैकी ३२ मादी, ६७ नर आणि उर्वरित वाघ नर आहेत की मादी हे स्पष्ट झालेले नाही. तर याच मृत्यूपैकी ११ बछडे आहेत. एका वाघीण १५ पिलांना जन्म देते. हे लक्षात घेता झालेले नुकसान अतिशय मोठे आहे.

rakhi.chavhan@expressindia.com