महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून अटक केली आहे. साहिल खान याला एसआयटीकडून डिसेंबर महिन्यात समन्स बजावण्यात आलं होतं. तर गेल्या शुक्रवारी मुंबई पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं. तत्पूर्वी २०२३ मध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यात एक नाव साहिल खान हेही होते. साहिल खानचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला. त्यानंतर गोवा, कर्नाटक, हैद्राबाद असा प्रवास करत तो छत्तीसगढमध्ये पोहचला. अखेर ४० तासांच्या पाठलागानंतर त्याला छत्तीसगढमधील जगदलपूर येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. त्याच पार्श्वभूमीवर महादेव ॲप आणि छत्तीसगढ यांचा संबंध समजून घेणे समयोचित ठरणारे आहे.

अधिक वाचा: विश्लेषण: जहांगीर हे नाव आलं कुठून? त्या मागचा इतिहास काय सांगतो?

Asha Sevika, umbrella, Wardha,
वर्धा : लाडक्या बहिणींना पावसाळी छत्र्यांचे वाटप
army jawan pravin janjal
वीर सुपुत्राला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप; शहीद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
IT hub, Satara Shirwal,
सातारा शिरवळ येथे आयटी हब, तर पुसेगाव रस्त्यालगत औद्योगिक वसाहत – उदय सामंत
Thane NCP President, Thane NCP President anand paranjpe, anand paranjpe Criticizes Bulldozer Baba Posters, action on Illegal Pubs and Bars, Eknath shinde, thane news
महायुतीच्या नेत्यांनो, मुख्यमंत्र्यांचे बुलडोझर बाबा पोस्टर लावू नका; राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांचा पोस्टर लावणाऱ्या नेत्यांना टोला
police will pay special attention to thieves during the Palkhi ceremony in dehu
देहूत पोलिसांची करडी नजर; पालखी सोहळ्यात चोरट्यांवर असणार पोलिसांचं विशेष लक्ष; पोलीस आयुक्तांनी दिली भेट
gold chain thief
सातारा: सोनसाखळी चोरट्याकडून २७ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
“…तर दगडालाही शेंदूर फासून लढण्याची तयार ठेवा,” खासदार अरविंद सावंत यांचे शिवसैनिकांना आवाहन; म्हणाले, “मातोश्रीचे आदेश…”
aamir khan mahatma Gandhi
आमिर खान म्हणतोय, “गांधी विचारांचा माझ्यावर प्रभाव”; सेवाग्राम आश्रमाला भेट

महादेव बेटिंग ॲप आहे तरी काय?

महादेव बेटिंग ॲप हे क्रिकेट, फुटबॉल, टेनिस इत्यादीसह विविध प्रकारच्या खेळांवर तसेच पोकर आणि व्हर्च्युअल स्पोर्टिंग गेमसह कार्ड गेमवर सट्टेबाजीची सुविधा देत होते. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर क्लोज नेटवर्कद्वारे या ॲपचे सर्व व्यवहार होत होते. केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आलेल्या २२ बेकायदेशीर बेटिंग ॲपमध्ये महादेव ॲपचाही समावेश आहे. आतापर्यंत रणबीर कपूरपासून ते कपिल शर्मापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजना ईडीकडून या प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे.

कोण आहे साहिल खान?

साहिल खान हा एक अभिनेता आणि फिटनेस ट्रेनर आहे. ‘स्टाईल’ आणि ‘एक्सक्यूज मी’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांसाठी तो ओळखला जातो. स्टीरियो नेशनच्या ‘नाचेंगे सारी रात’ या म्युझिकल व्हिडीओने त्यांने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तो फिटनेस इंडस्ट्रीकडे वळला आणि फिटनेस ट्रेनर झाला. यासाठी त्याला मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कारही मिळाले आहेत.

या अभिनेत्याने २००३ मध्ये निगार खानशी लग्न केले आणि २००५ साली जुलै महिन्यात त्यांचा घटस्फोटही झाला. अलीकडेच या ४७ वर्षीय अभिनेत्याने त्याच्या मिलेना नावाच्या २१ वर्षीय मैत्रिणीबरोबर सोशल मीडियावर काही छायाचित्रे शेअर करत तिची ‘पत्नी’ म्हणून ओळख करून दिली होती. आणि त्यानंतर त्यानेच रशियात विवाहबद्ध झाल्याचा खुलासाही केला.

साहिल खानचा या प्रकरणाशी नेमका संबंध काय आहे?

ऑनलाइन बेटिंग अॅप्लिकेशन्सचा प्रचार केल्यासंदर्भात साहिल खान याच्या विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. साहिल खान याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून या बेटिंग ॲपच्या पोर्टलवर गुंतवणूक करण्यास आणि साइन अप करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

महादेव ॲप आणि छत्तीसगड कनेक्शन

गेल्या वर्षी हे प्रकरण उघडकीस आले. २०२३ मध्ये फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणाकडे वेधले गेले. महादेव ॲपच्या एका प्रवर्तकाचे यूएईमध्ये लग्न झाले आणि या सोहळ्यासाठी सुमारे २०० कोटी खर्च करण्यात आला. बॉलिवूड मधील अनेक मोठ्या कलाकारांनी या लग्नाला उपस्थिती लावली होती. घरातील सदस्यांना नागपूरहून यूएईला नेण्यासाठी विमान भाड्याने घेण्यात आले होते. एकुणातच झळकलेली श्रीमंती भुवया उंचावणारी होती. इव्हेंट्स मॅनेजमेंट कंपनी, हॉटेल, कलाकार यांच्याबरोबर झालेल्या व्यवहाराचा तपशील ईडीच्या हाती लागला आणि महादेव ॲपशी संबंधित गैरव्यवहार समोर आले.

अधिक वाचा: चीनची भूक आफ्रिकन महिलांसाठी का ठरतेय डोकेदुखी?

‘महादेव अ‍ॅप’चे दोन मुख्य प्रवर्तक आहेत. दोन्ही छत्तीसगडचे रहिवासी असून या प्रकरणात सुमारे सहा हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीचा दावा आहे. सौरभ चंद्राकर हा महादेव ॲपचा मालक असून तो दुबईत बसून महादेव बुक बेटिंग ॲप चालवत होता. मूळचा छत्तीसगडमधील भिलाई येथील असलेला हा रहिवासी पूर्वी फळांचा रस विकण्याचे काम करत होता. आणि करोनाच्या कालखंडात ऑनलाइन बेटिंग व्यवसायात उतरला. किंबहुना गेल्याच वर्षी भाजपने या प्रकरणातील आरोपी शुभम सोनीचा एक व्हिडिओ शेअर केला होता, यात त्याने तो ॲपचा मालक आहे आणि त्याच्याकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांना ६१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दिल्याचे पुरावे आहेत असे म्हटले होते.

मनीलॉड्रिंग प्रकरणात ईडीने शुभम सोनीला फरार घोषित केलं होतं. मात्र, मुख्यमंत्री बघेल यांनी सर्व आरोप फेटाळून लावत भाजपाने मुद्दामहबन त्यांच्याविरोधात ईडीचे हत्यार उपसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने सादर केलेल्या तपासाच्या आधारे छत्तीसगडमधील आर्थिक गुन्हे शाखेने माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि इतरांविरुद्ध ‘महादेव अ‍ॅप’शी संबंधित ‘ऑनलाइन’ सट्टेबाजी घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल, ‘अ‍ॅप’ प्रवर्तक रवी उप्पल, सौरभ चंद्राकर, शुभम सोनी आणि अनिल कुमार अग्रवाल आणि अन्य १४ जणांचे प्राथमिक तपास अहवालात आरोपी म्हणून नाव देण्यात आले होते.

आता साहिल खान याला छत्तीसगड मधून अटक करण्यात आल्याने महादेव’ बेटिंग अ‍ॅपच्या छत्तीसगड कनेक्शनबद्दल आणखीही बरीच माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.