काल पाकिस्तानमधील दुसऱ्या क्रमाकांच्या सर्वात मोठ्या हवाई तळावर अतिरेकी हल्ला करण्यात आला आहे. तुरबत शहरात असलेल्या पीएनएस सिद्दीकी या हवाई तळावर बॉम्बस्फोट आणि गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) घेतली आहे. तर या आधी पाकिस्तानने जाहीर केल्याप्रमाणे १८ मार्च रोजी अफगाणिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी (TTP) संबंधित दहशतवाद्यांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात पाच महिला आणि तीन मुले ठार झाल्याचे काबूलमधील अंतरिम तालिबान सरकारने म्हटले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात टीटीपीच्या हाफिज गुल बहादूर गटाशी संबंधित दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले होते. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पाकिस्तानी लष्कराच्या चौकीवर १६ मार्च रोजी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी या संघटनेने स्वीकारली होती, त्या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह सात जवान ठार झाले होते. यानंतर पाकिस्तानने हा हवाई हल्ला केला होता. अफगाणिस्तानमधून अमेरिकेच्या सैन्य माघारीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पाकिस्तान अचानक असे तालिबानविरोधात का उभे ठाकले ते समजून घेण्याचा हा प्रयत्न !

अधिक वाचा: पाकिस्तानने चोरला भारताचा बासमती तांदूळ; परिस्थिती खरंच किती चिंताजनक?

A 19-year-old girl, Ayesha Rashid
…फिर भी दिल है हिंदुस्तानी! पाकिस्तानमधील १९ वर्षीय आयेशावर भारतात यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया!
Amit shah on ucc
“देश शरियावर चालवायचा का?” UCC ला विरोध करणाऱ्यांना अमित शाहांचा थेट प्रश्न, म्हणाले, “अनेक मुस्लिम देश…”
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?

पाकिस्तानचा आरोप

उत्तर वझिरिस्तानमधील हल्ला दहशतवाद्यांनी केला होता. या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या सीमेपलीकडे ‘सुरक्षित आश्रयस्थान’ लाभले तसेच दहशतवादाच्या अलीकडच्या लाटेला अफगाणिस्तानचा पूर्ण पाठिंबा आणि मदत असल्याचा पाकिस्तानी लष्कराचा आरोप आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने नमूद केले की, ‘गेल्या दोन वर्षांत या दहशतवादी संघटनेबद्दल विद्यमान अफगाण सरकारला वारंवार सूचित करण्यात आले आहे. यावर काबुल सरकारचे प्रवक्ते, जबिउल्लाह मुजाहिद म्हणाले, ‘अफगाणिस्तानची इस्लामिक राजवट कोणालाही आपला भूभाग वापरून सुरक्षिततेशी तडजोड करण्याची परवानगी देत ​​नाही.’

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानची स्थापना २००७ साली झाली, ही एक सशस्त्र संघटना आहे, ही संघटना इस्लामचे कठोर नियम लादण्याच्या उद्देशाने अनेक दहशतवादी संघटनांनी मिळून एक गट म्हणून स्थापन केली होती. टीटीपी आणि अफगाणिस्तानातील तालिबान यांची वैचारिक जवळीक आहे, गेली अनेक वर्ष पाकिस्तानने (भारताविरुद्ध) त्यांना पोसण्याचेच काम केले. २०२१ साली काबूलवर तालिबानींची सत्ता आल्यानंतर टीटीपीच्या दहशतवाद्यांना हद्दपार करून पाकिस्तानविरुद्ध अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर थांबवेल, अशी पाकिस्तानची अपेक्षा होती. मात्र, काबुलने टीटीपीला लगाम घालण्यास नकार दिल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. अफगाणिस्तानातील पाकिस्तानचे विशेष प्रतिनिधी राजदूत आसिफ दुर्रानी यांनी १६ मार्च रोजी माहिती देताना, सुमारे पाच ते सहा हजार टीटीपी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये आश्रय घेतल्याची माहिती दिली.

मूळ पाकिस्तानमध्येच

११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेल्या बॉम्बहल्ल्यामुळे कंदाहारमधील मूळ तालिबान नेतृत्व पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेट्टा येथे स्थलांतरित झाले. या भागात त्यांना कट्टर इस्लामी चळवळीला अधिक सैन्य आणि नवीन नेते मिळाले. “पाकिस्तानी तालिबान चळवळ ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर उदयास आली असा लोकप्रिय समज असला तरी ही चळवळ अफगाणिस्तानमध्ये आधीच सक्रिय होती आणि अफगाण राजवट संपुष्टात आल्यानंतर ती मायदेशी परतली,” असे पत्रकार अबुबकर सिद्दीकी यांनी त्यांच्या ‘The Pashtun Question: The Unresolved Key to the Future of Pakistan and Afghanistan (2014) या पुस्तकात लिहिले आहे. नेतृत्व आणि बहुसंख्य तालिबानी सैन्य वझिरीस्तानमधील असतानाही, या चळवळीने पाकिस्तानचे फेडरली प्रशासित आदिवासी क्षेत्र (FATA), खैबर पख्तुनख्वा प्रांत, पूर्व पंजाब प्रांत आणि दक्षिण सिंध प्रांत येथील अनुयायी आणि सहयोगींना आकर्षित केले, असे सिद्दिकी यांनी लिहिले आहे.

पाकमध्ये दहशतवादी हल्ले

पाकिस्तान सरकारने २००७ च्या डिसेंबर महिन्यात माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येसाठी टीटीपीला जबाबदार धरले आणि अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेने २००८ च्या जानेवारीत त्यार शिक्कामोर्तबही केले, परंतु टीटीपीने हा आरोप फेटाळला. टीटीपीने कधी काळी वायव्य पाकिस्तानातं मोठ्या भागावर नियंत्रण ठेवले होते. टीटीपीचा संस्थापक नेता बैतुल्ला मेहसूद २००८ मध्ये टाइम मॅगझिनच्या ‘टाइम १००’ या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत दिसला होता. परंतु २००९ साली ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. याच्या मृत्यूनंतर टीटीपीची लोकप्रियता घसरली हती,” असे सिद्दीकी यांनी लिहिले आहे. टीटीपीने अनेक हल्ले केले, २०१४ च्या नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या मलाला युसुफझाई (त्यावेळची तरुण कार्यकर्ता ब्लॉगर), आणि २०१२ च्या ऑक्टोबर मध्ये इतर दोन शाळकरी मुलींवर स्कूल-बसमध्ये गोळीबार; २०१४ साली डिसेंबर मध्ये पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर झालेला हल्ला; ज्यामध्ये ८ ते १८ वयोगटातील १३२ शाळकरी मुलांची आणि शाळेतील नऊ कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली होती, हे सर्व टीटीपीने गेल्या काही वर्षांत घडवून आणलेले वेगळे हल्ले आहेत.

अंगणातील साप

अफगाण तालिबानने टीटीपी विरुद्ध कारवाई करण्यास नकार दिल्याने पाकिस्तानची झालेली निराशा म्हणजे ‘अंगणात पाळलेला साप केवळ शत्रूलाच नाही तर आपल्यालाही चावू शकतो’ अशीच आहे. २०११ मध्ये, क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांच्यासमवेत एका संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले होते: “हे त्या जुन्या कथेसारखे आहे, तुम्ही तुमच्या अंगणात साप ठेवू शकत नाही, (आणि ठेवलाच) तर त्यांनी फक्त तुमच्या शेजाऱ्यांनाच चावावे अशी फक्त अपेक्षा करू शकता. अखेरीस ते साप ज्याच्या अंगणात असतील त्याचाही चावा घेण्याचा प्रयत्न करतील.” २०१४-१५ मध्ये, पाकिस्तानच्या सशस्त्र दलाने ऑपरेशन झर्ब-ए-अझब राबवले, देशाच्या वायव्य भागात टीटीपीसह अतिरेक्यांच्या विरोधात एक विस्तृत ऑपरेशन केले, त्यात अंदाजे ३,५०० बंडखोर मारले गेले.

अधिक वाचा: Hazratbal Shrine Development Project काश्मीरमधला हजरतबल विकास प्रकल्प: पंतप्रधान मोदींनी का घेतला पुढाकार? काय आहे इतिहास?

तालिबानचा टीटीपीशी ऋणानुबंध

२० मार्च रोजी पाकिस्तानी दैनिक डॉनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात, जाहिद हुसैन या अग्रगण्य समालोचकाने पाकिस्तानवर सीमापार हल्ले करण्यात अफगाण तालिबानचा टीटीपी बरोबर सहभाग असल्याच्या पुराव्याकडे लक्ष वेधले आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या संभाव्य वापराबद्दल चिंता व्यक्त केली. हुसैन यांनी नमूद केले की त्यांचे जुने संबंध आणि वैचारिक जवळीक पाहता अफगाण तालिबान त्यांच्या सहकारी जिहादींवर कारवाई करणार नाहीत. “अफगाण तालिबानचे सत्तेवर परतणे हे पाकिस्तानमधील दहशतवादी हिंसाचाराच्या पुनरुज्जीवनासाठी एक प्रमुख कारण ठरले आहे यात शंका नाही. परंतु, पाकिस्तानच्या बाजूने सुसंगत रणनीती नसल्यामुळे टीटीपीला गमावलेली जागा परत मिळवता आली आहे… खरेच, तुष्टीकरणाचे धोरण त्रास देण्यासाठी परत आले आहे,” असे हुसैन लिहितात.

आम्ही तुम्हाला सावध केले होते!

सध्या नवी दिल्लीसाठी ‘आम्ही तर तुम्हाला आधीच सांगून सावधही केले होते’ असा क्षण आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुढील काही महिन्यांत सर्व दहशतवादी संघटनांविरुद्ध ठोस पावले उचलावीत, जेणेकरून नवी दिल्लीशी संवादाची संभाव्य दारे उघडली जातील, असे तज्ज्ञ सांगतात.