२०२१ हे वर्ष भारताच्या राजकीय इतिहासात काहीशा वेगळ्या प्रकारे ओळखलं जाऊ शकतं. कारण, लोकसभेत प्रचंड बहुमत असलेल्या सरकारने रस्त्यावरील आंदोलनाची ताकद समजली जी मुख्यतः शांततापूर्ण आणि अराजकीय होती. शेतकऱ्यांचा विरोध व्यापक नव्हता, पण सरकारला झुकवण्याची ताकद या आंदोलनात होती. आता आगामी वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये या शेतकरी आंदोलनाचे राजकीय तसेच सामाजिक असे परिणाम जाणवण्याची दाट शक्यता आहे.

२०२१ मध्ये कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेने सामान्य जनजीवन विस्कळीत केल्यानंतर राजकारण पुन्हा सुरू झाले. दरम्यान, कोविडच्या सावटाखाली झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे महत्त्वपूर्ण होते. यामध्ये ममता बॅनर्जी यांचा एक शक्तिशाली प्रादेशिक नेता म्हणून उदय, केरळमध्ये डाव्या आणि काँग्रेस सरकारच्या बदलीचा पॅटर्न मोडून काढणारा काँग्रेसचा पराभव आणि आसाममध्ये भाजपाचा दणदणीत विजय याचा प्रामुख्याने समावेश होईल.

तर, आता २०२२ च्या पहिल्या सहामाहीत उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांमध्ये आणि वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्येही नवीन राजकीय समीकरणं मांडण्याची आणि विद्यमान समीकरणे बिघडवण्याची क्षमता आहे. हा निकाल भाजपा आणि नरेंद्र मोदी, अन्य विरोधी पक्षांचा दबाव असल्याचं जाणवणाऱ्या काँग्रेस तसेच अन्य प्रादेशिक पक्षांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे एकप्रकारे भाजपा आणि विरोधकांचं राजकीय भविष्य ठरवणाऱ्या अशा या निवडणुका असणार आहेत.

२०२१ आणि २०२२ मध्ये संसदेत आणि संसदेबाहेरील राजकीय क्षेत्रातील कटुता आणखीनच वाढली असून, महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी कदाचित यापेक्षा वेगळी नसेल. कोविड-19 ची तिसरी लाट मोठ्या प्रमाणावर येत असताना, साथीच्या रोगावरील राजकारणाला नवे वळण लागू शकते. जम्मू आणि काश्मीरसाठी सरकार आपली राजकीय योजना उघड करू शकते, ज्यामध्ये राजकारण विभाजित करण्याची देखील क्षमता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रूपाने पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या निवडणूक यंत्रणांची मध्यावधी चाचणी होणार आहे. कोविड-19 ची दुसरी लाट, इंधन किमतीत झालेली वाढ आणि बेरोजगारी यावरून विरोधी पक्ष सरकारवर हल्लाबोल करत होते. शेतीविषयक कायदे मागे घेण्याच्या सरकारच्या आश्चर्यकारक निर्णयाने विरोधकांना जल्लोष करण्याचे कारण मिळाले. पण मोदींची लोकप्रियता कमी होत चालली आहे किंवा भाजपा विरोधात नाराजी पसरली आहे, अशी कोणतीही स्पष्ट चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल हा पहिला सूचक असेल.