अफगाणिस्तानमध्ये सरकार बनवण्याच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या तालिबानने आपल्या सर्वोच्च नेत्याचं नाव निश्चित केलं आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंडला देशाचा सर्वोच्च नेता म्हणजेच अफगाणिस्तानच्या पंतप्रधान पदी बसवलं आहे. नेता म्हणून अखुंड याची निवडही करण्यात आलीय. त्याचबरोबर दोन उपपंतप्रधानही नियुक्त करण्यात येणार असून मुल्ला बरादर आणि मुल्ला अब्दुस सलाम यांची या पदांवर वर्णी लागणार आहे. अफगाणिस्तानमधील प्रत्येक माहिती जागतिक स्तरावरील प्रसारमाध्यमांना देणारा जबीउल्लाह मुजाहिदीन हा अखुंडचा अधिकृत प्रवक्ता म्हणून काम करणार आहे. ‘द न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार मुल्ला अखुंडजादाने मोहम्मद हसन अखुंडचे नाव या पदासाठी सुचवलं आहे. अखुंडजादाने मोहम्मद हसन अखुंडला रईस-ए-जम्हूर, रईस-उल-वजारा म्हणून अफगाणिस्तानचा प्रमुख नेता या नावाने जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडलाय. तालिबानला सहकार्य करणाऱ्या अनेक गटांच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यात आल्यानंतर अखुंडचं नाव निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> तालिबानला युनायडेट नेशन्सकडून मोठा दिलासा

मुल्ला मोहम्मद हसन अखुंड हा सध्या तालिबानकडून घेण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण निर्णयांबद्दल अंतिम जबाबदारी असणाऱ्या रहाबारी शूरा या नेत्यांच्या परिषदेचे प्रमुख आहे. तालिबान जे निर्णय घेतं त्यामागे असणाऱ्या परिषदेला रहबारी शूरा असं म्हटलं जातं. त्याच परिषदेचे अखुंड हा प्रमुख नेता आहे. अखुंडचा जन्म कंदहारमध्ये झाला असून नंतर ते तालिबानच्या सशस्त्र लढाईचं नेतृत्व करणाऱ्या गटाच्या सहसंस्थापकांपैकी एक आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी रविवारी काबूलमध्ये माजी पंतप्रधान गुलबुद्दीन हिमतयार यांची भेट घेतली. अफगाणिस्तानमधील अफगाण न्यूज पोर्टलने दिलेलेया माहितीनुसार सरकार कसं बनवायचं यासंदर्भातील चर्चेसाठी ही बैठक घेण्यात आलेली. याच बैठकीमध्ये बरादर आणि  तालिबानचा सर्वोच्च नेता हिबातुल्लाह अखुंदजादा यांच्याऐवजी अखुंडला प्रमुख नेता म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. पाकिस्तानच्या मदतीने अखुंडाची निवड करण्यात आल्याचं समजतं. अखुंड हा इतर नेत्यांपेक्षा कमी प्रभावशाली असल्याने तो तालिबानच्या इशाऱ्यावर काम करेल अशा अपेक्षेने ही निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अखुंड हा तालिबानची स्थापना झाली त्यावेळीच्या काही मोजक्या संस्थापकांपैकी एक आहेत.

नक्की वाचा >> तालिबान पुन्हा एकदा अमेरिकेला डिवचण्याच्या तयारीत; सरकारची घोषणा ‘या’ दिवशी करण्याची शक्यता

कट्टरतावादी…

अखुंडने २० वर्षांपासून रहबारी शूराचे प्रमुख म्हणून काम पाहिलं आहे. या कालावधीमध्ये अखुंडने आपली चांगली प्रतिमा तालिबान समर्थकांमध्ये निर्माण केली आहे. अखुंडची पार्श्वभूमी लष्करी प्रशिक्षणाऐवजी धार्मिक अभ्यासक अशी आहे. अखुंड हा त्याच्या धर्मासंदर्भातील अभ्यास आणि धार्मिक ओढ यासाठी ओळखला जातो. तो कट्टरतावादी विचारसणीचा नेता आहे.

नक्की वाचा >> तालिबानमधील तरुण पॉर्न वेबसाइट्सवरुन तयार करतायत Kill List; जाणून घ्या काय आहे प्रकरण

त्या ३० जणांपैकी एक…

तालिबानने दिलेल्या माहितीनुसार अखुंड हा २० वर्षांपासून हैबतुल्ला अखुंजादाचे निकटवर्तीय आहेत. अखुंडाने अफगाणिस्तानमध्ये १९९६ साली सरकार स्थापन झालं तेव्हा महत्वपूर्ण पदांची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी मुल्ला मोहम्मद रब्बानी अखुंद पंतप्रधान पदी विराजमान झाले होते. तालिबानच्या पहिल्या कार्यकाळामध्ये मुल्ला हसन अखुंड हा परराष्ट्र मंत्री होते आणि नंतर उप-पंतप्रधान झाले होते. एका अहवालानुसार मुल्ला हसन अखुंद २००१ साली कंदहारमधील राज्यपालांच्या कार्यालयामध्ये मंत्रिपरिषदेचे उपाध्यक्षही होते. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार अखुंद हे तालिबानची स्थापन करणाऱ्या ‘३० मूळ संस्थापक सदस्यांपैकी एक’ आहेत.

नक्की वाचा >> “…म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्यच”; शिवसेनेनं जावेद अख्तर यांना सुनावलं

पाकिस्तानमध्ये दिली जाते त्यांच्या विचाराची शिकवण

अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टन डीसीमधील राष्ट्रीय सुरक्षेशीसंबंधित कागदपत्रांनुसार, “मुल्ला हसन अखुंद पश्चिम आणि मुजाहिद्दीन दोन्हींच्या विरोधात मनात तेढ असणारा नेता आहे. तालिबानमध्ये त्याला सर्वात प्रभावशाली कमांडर्सपैकी एक मानलं जातं. पाकिस्तानमधील अनेक मदरश्यांमध्ये त्याच्या विचारांची शिकवण दिली जाते.”

दहशतवाद्यांच्या यादीमध्ये 

२००१ पर्यंत सुरक्षा, गुप्तचर विभाग, अंतर्गत सुरक्षा, सर्वोच्च न्यायालया, संस्कृती आणि संचार, शिक्षण यासारख्या विभागांमध्ये अखुंडाने काम केलं आहे. २०१० मध्ये त्यांना अमेरिकन यंत्रणांकडून ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्तही समोर आलं होतं. अखुंडाची तालिबानमधील संघटनात्मक बांधणी आणि इतर कामांमध्ये फार महत्वाची भूमिका असली तरी ते फारसे लोकप्रिय नेते नाहीत. पडद्यामागे राहून काम करणाऱ्या नेत्यांमध्ये अखुंडाचा समावेश होतो. मात्र त्याचवेळी संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीत त्याचं नाव आहे.

नक्की वाचा >> एक फोटो आणि नाव… जगाला एवढीच ओळख असणारा ‘तालिबान’चा म्होरक्या आणि त्याच्याबद्दलचं गूढ

मतभेद आहेत पण…

तालिबानमधील मुल्ला बरादरच्या नेतृत्वाखालील तालिबानी दोहा गट, हक्कांनी नेटवर्क आणि पूर्व अफगाणिस्तानमधील गट तसेच तालिबानचा कंदहारमधील गट यांमध्ये मतभेद आहेत. सत्ता स्थापनेवरुन हे मदतभेद असल्याने सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा खटाटोप तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरु असल्याने वारंवार सत्तास्थापनेची तारीख पुढे ढकलली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is mullah mohammad hasan akhund leader of taliban in new government of afghanistan scsg
First published on: 07-09-2021 at 15:10 IST