गौरव मुठे

आपल्या दैनंदिन आयुष्यात मिठापासून अगदी दागिन्यांपर्यंत सगळीकडे निदर्शनास येणारी नाममुद्रा म्हणजे टाटा समूह. सामाजिक क्षेत्रापासून अगदी शिक्षणापर्यंत टाटा समूह समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. आता टाटा समूहातील ‘रत्नां’पैकी एक असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी लवकरच बाजारात सूचिबद्ध होणार आहे. त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष सूचिबद्धतेकडे लागले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

‘टाटा टेक्नॉलॉजीज’च्या ‘आयपीओ’ला गुंतवणूकदारांकडून इतके महत्त्व का?

टाटा समूहातील सध्या ध्वजाधारी असलेली कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा समभाग २००४ मध्ये बाजारात सूचिबद्ध झाला. त्यानंतर आता तब्बल १८ वर्षांनंतर टाटा समूहातील कंपनी बाजारात सूचिबद्ध होणार असल्याने सर्वांचे तिच्याकडे लक्ष लागले आहे. आता ‘टाटा’ हे नाव जोडले गेल्यामुळे गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. टाटा टेक्नॉलॉजीज ही फॉर्च्युन इंडिया इन्फोटेक इंडस्ट्री रँकिंगमध्ये १५ वी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. टाटा टेक्नॉलॉजीजने अलीकडेच समभाग १:५ गुणोत्तरामध्ये विभाजित केले आहेत. म्हणजेच टाटा टेक्नॉलॉजीजच्या एका समभागाचे पाच भाग केल्याने दर्शनी मूल्य १० रुपयांवरून प्रत्येकी २ रुपये झाले आहे. त्यानंतर कंपनीने १:१ या प्रमाणात बक्षीस (बोनस) समभाग दिले. म्हणजेच कंपनीच्या प्रत्येक समभागाच्या बदल्यात १० अतिरिक्त समभाग विद्यमान गुंतवणूकदारांना देण्यात आले आहेत. याचा टाटा मोटर्स सर्वात मोठा लाभार्थी आहे.

‘टाटा टेक’ची समभाग विक्री कधीपासून?

टाटा समूहाची कंपनी असलेल्या ‘टाटा टेक्नॉलॉजीज’ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या २२ नोव्हेंबरपासून खुली होत असून गुंतवणूकदारांना २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल.

आयपीओसाठी किंमतपट्टा किती? किती निधी उभारणार?

कंपनीने भाग विक्रीसाठी प्रति समभाग ४७५ रुपये ते ५०० रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. सुकाणू गुंतवणूकदारांना २१ नोव्हेंबर रोजी खरेदीसाठी अर्ज करता येणार आहे. भागविक्रीतून कंपनीचा ३,०४२ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे.

वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ३० आणि त्यानंतरच्या ३० च्या पटीत समभागांसाठी बोली लावून, कंपनीच्या या भागविक्रीत सहभागी होता येईल. कंपनीचा समभाग महिनाअखेर ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबररोजी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध होणार आहे. आयपीओच्या माध्यमातून उभारला जाणारा निधी केवळ प्रवर्तक कंपन्यांना प्राप्त होणार आहे. कंपनी भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर कंपनीचे बाजारभांडवल १९,२६९ कोटी ते २०,२८३ कोटी रुपयंदारम्यान राहण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-विश्लेषण: ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम केव्हा सुरू होणार? विलंब का होतोय?

कोणासाठी किती शेअर राखीव?

विद्यमान भागविक्रीमध्ये टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स डीव्हीआरच्या भागधारकांसाठी एकूण १० टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच एकंदर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ५० टक्के, गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के समभाग राखीव ठेवण्यात आले आहे.

‘टाटा टेक’च्या भागविक्रीचा ‘टाटा मोटर्स’ला सर्वाधिक लाभ कसा?

टाटा टेक्नॉलॉजीजमधील बहुतांश हिस्सा पालक कंपनी टाटा मोटर्सकडे आहे. टाटा समूहातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने सरासरी प्रति समभाग ७.४० रुपयांना टाटा टेक्नॉलॉजीजचे समभाग खरेदी केले होते. आता या भागविक्रीच्या माध्यमातून प्रवर्तक कंपनी टाटा मोटर्स आणि विद्यमान भागधारक त्यांचा भांडवली हिश्श्याच्या आंशिक विक्रीच्या (ऑफर फॉर सेल) माध्यमातून ६.०८ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत. म्हणजेच ११.४ टक्के समभाग विक्री करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ अल्फा टीसी होल्डिंग्स ९७.१७ लाख समभाग (२.४ टक्के) विकतील आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड ४८.५८ लाख समभाग म्हणजेच १.२ टक्के समभाग विक्री करतील.

मुळातच टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ शेअर बाजारात आणण्याचे मुख्य कारण म्हणजे भांडवली बाजारातील समभाग सूचिबद्धतेचा फायदा पदरी पाडून घेणे, तसेच विद्यमान भागधारकांकडील समभागांची बाजारात विक्री करणे असा आहे. टाटा मोटर्सची सध्या या कंपनीत ७४.७९ टक्के हिस्सेदारी आहे, तर अन्य दोघांकडे अनुक्रमे ७.२६ टक्के आणि ३.६३ टक्के हिस्सेदारी आहे.

आणखी वाचा-कुत्रे, रोबोट आणि स्पंज बॉम्ब; जमिनीखालील भुयारात न उतरता इस्रायली सैनिक ते कसे नष्ट करत आहे?

टाटा टेक्नॉलॉजीज नेमके काय करते?

ही डिजिटल धाटणीच्या अभियांत्रिकी सेवा पुरवणारी जागतिक कंपनी आहे. उपकरण उत्पादकांना विशेषत: विमान आणि वाहन निर्माण क्षेत्रातील उद्योगांना ती नवीन उत्पादनांचे संकल्पचित्र, विकसन आणि उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन या क्षेत्रात सेवा प्रदान करते.

टाटा टेक्नॉलॉजीज लि. ही प्युअर प्ले इंजीनिअरिंग सर्व्हिस, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, डिजिटल इंजिनिअरिंग सोल्युशनसमध्ये काम करते. मॅन्युफॅक्चरिंग लेड व्हर्टिकल हा कामाचा केंद्रबिंदू आहे. टाटा मोटर्स आणि जग्वार हेच कंपनीचे मोठे (४० टक्के) ग्राहक असल्यामुळे साहजिकच ऑटोमोबाईल संबधित उत्पन्न एकूण उत्पन्नाच्या ७५ टक्के इतके आहे. याव्यतिरिक्त ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, इंडस्ट्रियल हेव्ही मशिनरी येथेही टाटा टेक्नॉलॉजी लोकांचे जीवनमान सुधारणासाठी सुरक्षित, अधिक टिकाऊ उत्पादने निर्माण करण्याचा प्रयत्न करते.

११,०००हून अधिक मनुष्यबळ, १९ ग्लोबल डिलिव्हरी सेंटर्स, एशिया पॅसिफिक, युरोप, उत्तर अमेरिका अशा ३ खंडांमध्ये आणि २७ देशांमध्ये पसरलेला व्यवसाय यावरून देशाच्या सीमा पार करून कंपनीचा व्यवसाय कसा विस्तृत झाला आहे याची नेमकी कल्पना आपण करू शकतो. डिसेंबर २०२२ ला संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने ३,०११.७९ कोटींचा महसूल मिळविला होता. तर त्याआधीच्या वर्षांतील याच कालावधीत (डिसेंबर २०२१ मध्ये) २,६०७.३० कोटींचा महसूल तिने नोंदविला आहे.

आणखी वाचा-विश्लेषण: स्मार्टफोनला लवकरच गुडबाय? काय आहे ‘स्मार्ट’पिन?

संभाव्य जोखीम काय असू शकते?

कंपनीचे ४० टक्क्यांहून अधिक उत्पन्न टाटा मोटर्सकडून येत असल्यामुळे या मुख्य ग्राहकाला काही व्यवसाय विषयक अडचणी निर्माण झाल्यास त्याचा कंपनीच्या कामावर परिणाम होऊ शकतो. वाहननिर्मिती क्षेत्र सध्या जोरात आहे, परंतु तिथे काही मंदीची लक्षणे दिसल्यास ते धोकादायक ठरेल. सध्या सणोत्सवाचा हंगाम असल्याने वाहनांना मागणी वाढली आहे.

तसेच कुशल मनुष्यबळ राखणे सध्या मोठे आव्हान ठरत आहे,तसेच वाढणाऱ्या खर्चाचे सुयोग्य नियोजन,भविष्यात होणाऱ्या अनेक बदलांना सामोरे जाणे हे एक मोठे आव्हान असेल.

Story img Loader