07 March 2021

News Flash

FIFA World Cup 2018: पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाची डेन्मार्कवर ३- २ ने मात

पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कवर ३-२ असा विजय मिळवला असून उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाचा सामना यजमान रशियाशी होणार आहे.

क्रोएशियाचा गोलकिपर सुबासिच हा विजयाचा शिल्पकार ठरला.

फिफा वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत क्रोएशियाची विजयी वाटचाल सुरुच असून पेनल्टी शूटआऊटमध्ये डेन्मार्कवर मात करत क्रोएशियाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कवर ३-२ असा विजय मिळवला असून उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाचा सामना यजमान रशियाशी होणार आहे.

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये रविवारी रात्री क्रोएशिया विरुद्ध डेन्मार्क यांच्यात सामना पार पडला. क्रोएशियाने साखळीतील तीनही सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश केल्याने संघाचे पारडे जड होते. तर १९९८ नंतर पुन्हा एकदा बाद फेरीचा अडथळा ओलांडण्यास डेन्मार्कचा संघ उत्सुक होता.

दोन्ही संघांची सुरुवात आक्रमक होती. पहिल्याच मिनिटाला डेन्मार्कने गोल मारुन १- ० अशी आघाडी मिळवली. जोर्गनसनने हा गोल मारला. पण क्रोएशियातर्फे मारियो मेंडझुकिझने चौथ्याच मिनिटाला गोल मारुन संघाला बरोबरी मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघाला गोल मारण्यात अपयश आले. डेन्मार्कला आणखी एक गोल मारण्याची संधी मिळाली खरी पण क्रोएशियाच्या गोलकिपरने हा प्रयत्न हाणून पाडला. निर्धारित पूर्ण वेळेत १- १ अशी बरोबरी कायम होती. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही बरोबरी कायम राहिल्याने हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहोचला. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कवर ३- २ विजय मिळवला. क्रोएशियाचा गोलकिपर सुबासिच हा विजयाचा शिल्पकार ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2018 7:31 am

Web Title: fifa world cup 2018 croatia beat denmark by 3 2 in penalty shootout enters quarter finals
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : मॅजिक आणि लॉजिक
2 FIFA World Cup 2018  : पंचनामा – अंतिम टप्प्याची थरारकता!
3 FIFA World Cup 2018 : अर्जेटिनाच्या पराभवानंतर मेसीच्या निवृत्तीचीच चर्चा
Just Now!
X