व्होल्गा नदीच्या काठावर व नोव्होगोराडच्या पर्वतराजीजवळ असलेले स्टेडियम अतिशय विलोभनीय स्टेडियम म्हणून ओळखले जाते. हे शहर १९ व्या शतकापासून व्यापारी केंद्र असल्यामुळे दळणवळणाची भरपूर साधने येथे उपलब्ध आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये त्याच्या बांधकामास सुरुवात झाली. गतवर्षी डिसेंबरमध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले. विश्वचषक स्पर्धेनंतर निझ्नी नोव्होगोराड ऑलिम्पियन्स क्लबला हे स्टेडियम घरचे मैदान म्हणून दिले जाणार आहे.

  • प्रेक्षक क्षमता-४५ हजार ३३१
  • सामने-स्वीडन वि. दक्षिण कोरिया, अर्जेन्टिना वि. क्रोएशिया, इंग्लंड वि. पनामा, स्वित्र्झलड वि. कोस्टा रिका, तसेच उपउपान्त्यपूर्व व उपान्त्यपूर्व फेरीचा प्रत्येकी एक सामना.