News Flash

FIFA World Cup 2018 : नामसाधर्म्यामुळे स्वित्झर्लंडच्या चाहत्यांचा गोंधळ; मैदानापासून १२०० किलोमीटर दूर केलं हॉटेल बुक

ब्राझील-स्वित्झर्लंड सामना रविवारी झाला. या सामन्याआधी, स्वित्झर्लंडवरून आलेल्या चाहत्यांचा नामसाधर्म्यामुळे गोंधळ उडाला.

FIFA World Cup 2018 : फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत रविवारच्या लढतीत मेक्सिकोने गतविजेत्या जर्मनीला १-० ने पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर ब्राझील आणि स्वित्झर्लंडमधला सामना १-१ गोलबरोबरीमुळे अनिर्णित राहिला. या लढतीआधी बलाढय ब्राझीलला विजयासाठी सर्वाधिक पसंती दिली जात होती. पण स्वित्झर्लंडचा संघ ब्राझीलचे आव्हान थोपवून धरण्यात यशस्वी ठरला. अशा दोन निकालांमुळे हा दिवस फुटबॉलप्रेमींना कायम लक्षात राहील. मात्र स्वित्झर्लंडच्या काही चाहत्यांसाठी हा दिवस एका वेगळ्याच कारणासाठी लक्षात राहिला.

ब्राझील आणि स्वित्झर्लंड यांच्यात रविवारी सामना झाला. या दरम्यान, स्वित्झर्लंडवरून हा सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी रशियात येऊन एक चूक केली. ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड हा मूळ सामना रोस्टोव्ह-ऑन-डॉन या शहरातील स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार होता. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या स्विस चाहत्यांनी मूळ सामन्याच्या ठिकाणापासून सुमारे १,२८१ किलोमीटर दूर अंतरावर हॉटेलमध्ये रूम बुक केली होती.

त्यानुसार हे चाहते शहरात दाखल झाले. आणि तेथे आपले हॉटेल शोधू लागले. खूप प्रयत्न केल्यावरही त्यांना त्यांचे हॉटेल सापडले नाही. अखेर त्यांनी पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. ज्यावेळी पोलिसांनी या चाहत्यांचे म्हणणे ऐकले त्यावेळी त्यांनी सारी भानगड लक्षात आली. रशियाबाबत जास्त माहिती नसल्याने या चाहत्यांनी थोडी गडबड केली असल्याचे पोलिसांना समजले.

ब्राझील आणि स्वित्झर्लंड यांच्यातील सामना हा रोस्टोव्ह-ऑन-डॉन (Rostov-on-Don) या शहरात होता. मात्र या चाहत्यांनी रोस्टोव्ह वेलिकी (Rostov Veliky) या शहरातील हॉटेलात बुकिंग केले होते. या दोन शहरातील अंतर हे सुमारे १२०० किलोमीटर आहे. परंतु नावातील साम्य असल्यामुळे या चाहत्यांची गफलत झाल्याचे नंतर समजले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना निवारा मिळवून देण्यास मदत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 9:31 pm

Web Title: fifa world cup 2018 swiss fans confuse book hotel 1281 km away
टॅग : Football
Next Stories
1 FIFA World Cup 2018 DEN vs AUS : ऑस्ट्रलियाने डेन्मार्कला बरोबरीत रोखले; बाद फेरीतील आव्हान जिवंत
2 FIFA World Cup 2018 Video : भर सामन्यात पक्ष्याचा जीव वाचवण्यासाठी स्पेनच्या खेळाडूची धडपड
3 FIFA World Cup 2018 : शतकी सामन्यातील विजयानंतर सुआरेझने केली ‘ही’ खास घोषणा
Just Now!
X