23 January 2021

News Flash

Fifa World Cup 2018 : महिला रिपोर्टरशी केलेले ‘ते’ अश्लील चाळे पैजेसाठी…

Fifa World Cup 2018 : महिला रिपोर्टरने लाईव्ह विश्लेषण करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या तरूणाने तिचे चुंबन घेत तिच्याशी असभ्य वर्तन केले.

Fifa World Cup 2018 : फिफा विश्वचषक २०१८ ही स्पर्धा रशियामध्ये सुरु आहे. अनेक संघांना अपेक्षित निकाल मिळाले आहेत. तर जपान, सेनेगल, क्रोएशिया आणि आइसलँड या संघांनी बलाढ्य संघाना धक्के दीऊळे आहेत. त्यामुळे ही स्पर्धा अतिशय रोमांचक झाली आहे. पण या साऱ्या गोष्टींदरम्यान स्पर्धेला गालबोट लागण्यासारखी एक गोष्ट घडली होती. एका महिला रिपोर्टरची लाईव्ह टीव्ही रिपोर्टींग करत असताना छेड काढण्यात आली होती. तसेच तिच्याशी तिच्याबरोबर अश्लील चाळे करण्यात आले होते.

या संदर्भातील व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे सर्व स्तरातून ते अश्लील चाळे करणाऱ्या तरुणावर टीका करण्यात आली होती. या दरम्यान, तरुणाकडून या संदर्भात एक अजब स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याने केलेले हे अश्लील वर्तन हा पैजेचा भाग असल्याचे तो म्हणाला आहे. त्याने लावलेल्या पैजेनुसार त्याने हे वर्तन केले असल्याचे त्याने म्हटले आहे.

कोलंबियाची एक महिला रिपोर्टर ज्युलियथ गोन्झालेझ थेरान ही या स्पर्धेचे रिपोर्टींग करत होती. सामना संपल्यानंतर स्टेडियमच्या बाहेर ती रिपोर्टर उभी होती. त्या रिपोर्टरने ज्या वेळी लाईव्ह रिपोर्टींग करण्यास सुरुवात केली, त्यावेळी एका संघाचा चाहता अचानक त्या रिपोर्टरला बिलगला आणि तिच्याशी गैरवर्तणूक केली. मात्र त्या वेळी वेळेचे आणि कॅमेराचे भान राखत रिपोर्टरने त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपले रिपोर्टींग सुरु ठेवले.

हा पहा व्हिडिओ –

त्या रिपोर्टरने लाईव्ह विश्लेषण करण्यास ज्या वेळी सुरुवात केली, त्यावेळी तिच्या आजूबाजूला भरपूर फुटबॉलप्रेमी होते. मात्र लाईव्ह प्रक्षेपण सुरु झाल्याचे दिसल्यानंतर अचानक एक चाहता आला आणि त्याने त्या महिला रिपोर्टरच्या छातीला स्पर्श केला. या संदर्भातदेखील त्याने स्पष्टीकरण दिले आहे. माझा हेतू तिच्या खांदा पकडणे होता, पण चुकून माझा हात तिच्या छातीला लागला, असेही तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 5:47 pm

Web Title: fifa world cup 2018 woman reporter kissed and groped by man for bet
Next Stories
1 FIFA World Cup Flashback : अखेर रोनाल्डोच्या ‘त्या’ हेअरकटमागचं गुपित उलगडलं…
2 FIFA World Cup 2018: बॅकपास : पेलेच्या सावलीतला हिरा
3 FIFA World Cup 2018 : फ्री किक : ‘स्वयंगोल’ नामक आत्मघात
Just Now!
X