FIFA World Cup 2018 Prediction : फिफा विश्वचषक स्पर्धेतील अंतिम ८ संघ अखेर निश्चित झाले. अर्जेंटिना आणि पोर्तुगाल हे दोन संघ स्पर्धेबाहेर गेले. त्यामुळे मेसी आणि रोनाल्डो यांचा खेळ सध्या तरी फुटबॉलप्रेमींना अनुभवता येणार नाहीये. पण इतर ८ संघांमधील सामने नक्कीच रोमांचक असतील. पण अचूक भविष्य वर्तवणाऱ्या मिस्टिक मार्कस या डुकराने साखळी सामने सुरु असतानाच Fifa world cup 2018 मधील उपांत्य फेरीतील चार संघ सांगितले होते. मात्र त्या ४ संघांपैकी २ संघ राऊंड ऑफ १६ मध्येच स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे या ‘मार्कस’ बाबाचा अंदाज चुकल्याचे दिसले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मार्कस नावाच्या डुकराने २०१४ साली झालेल्या Fifa world cup स्पर्धेचा विजेता जर्मनी होईल, हे भविष्य सांगितले होते. ते खरे ठरले. त्यामुळे त्याला यंदाच्या स्पर्धेतील अंतिम ४ संघ निवडण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार त्याने हे ४ संघ निवडले. पण त्यापैकी २ संघ सापरधेबाहेर गेलेले असल्याने त्याची भविष्यवाणी खोटी ठरल्याचे दिसत आहे.

या आठ वर्षांच्या मार्कसच्या पुढ्यात ३२ फळे ठेवण्यात आली होती. त्या फळांवर Fifa world cup 2018 मध्ये सहभागी झालेल्या ३२ देशांचे झेंडे लावण्यात आले होते. त्यापैकी मार्कसने ४ फळे निवडून Fifa world cup 2018 च्या उपांत्य फेरीत जाणारे संघ सांगितले होते. अर्जेंटिना, उरुग्वे, बेल्जीयम आणि नायजेरिया हे चार झेंडे असलेली फळे त्याने निवडली होती. पण त्यापैकी उरुग्वे आणि बेल्जीयम हे २ संघच अजूनपर्यंत स्पर्धेत टिकून आहेत. त्यामुळे १०० टक्के रेकॉर्ड असलेल्या या मार्कस बाबाचा या स्पर्धेबाबतचा अंदाज चुकला असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Fifa world cup 2018 prediction marcus pig fails to predicts 4 finalist
First published on: 04-07-2018 at 22:31 IST