FIFA World Cup 2018 : आयसिसच्या नव्या व्हिडीओने खळबळ

ड्रोन बॉम्बने विश्वचषक स्पर्धेचा स्टेडियम उडवण्याचा कट

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ड्रोन बॉम्बने विश्वचषक स्पर्धेचा स्टेडियम उडवण्याचा कट

रशियात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दहशतवादी हल्ल्याच्या धमक्या आयसिसकडून वारंवार देण्यात येत आहेत. या धमकीचे पुढील सत्र म्हणून आयसिसने नवीन व्हिडीओ जाहीर केला असून त्यात त्यांनी ड्रोन बॉम्बच्या साहाय्याने स्टेडियम उडवणार असल्याचे सांगितले आहे.

या व्हिडीओत त्यांनी धमकीचा संदेशही दिला आहे आणि त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, ‘‘आमची तुमच्यावर करडी नजर आहे. आमच्याकडे ड्रोन आहेत आणि त्याचा वापर करून आम्ही स्टेडियमवर बॉम्ब हल्ला करणार आहोत.’’ हा व्हिडीओ अ‍ॅनिमेटेड असला तरी त्यातील धमकीला हलक्यात घेऊ नका, असे जिहादोस्कोप या गटाचे प्रमुख राफेल ग्लकने सांगितले.

आयसिसने यापूर्वी ड्रोन बॉम्बने इराक आणि सीरियाच्या सैन्यतळावर हल्ले केले आहेत. हे ड्रोन ५०० ग्रॅम वजनाचे असतात आणि त्यातील जीपीएस प्रणाली बंद केलेली असते. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण जाते. अशा परिस्थितीत काही सरकार गरुडांना ड्रोनचा शोध घेण्याचे प्रशिक्षण देत आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Isis fifa world cup