युद्धात शत्रूच्या मोर्चेबंदीवर तोफांचा भडिमार करण्याबरोबरच रॉकेट्सचा मारा करणे हा एक प्रभावी डावपेच आहे. भारताने आजवर त्यासाठी रशियाच्या बीएम-२१ ग्राद आणि बीएम-३० स्मर्च या मल्टिपल-बॅरल रॉकेट लाँचर (एमबीआरएल) प्रणालींवर भिस्त ठेवली होती. यातील बीएम-२१ ग्राद प्रणाली कारगिल युद्धाच्या टेलिव्हिजन चित्रीकरणात अनेकांनी पाहिली असेल. बीएम-२१ ग्रादला ४० नळ्या (बॅरल) असून त्यातून २० सेकंदांत, ४० रॉकेट डागली जातात आणि ती २० किमी अंतरावर मारा करतात. तर बीएम-३० स्मर्च प्रणालीला १२ बॅरल असून त्यातून ३८ सेकंदांत, १२ रॉकेट साधारण २० ते ९० किमी अंतरापर्यंत डागता येतात.

या यंत्रणांवर आधारित पिनाक नावाची मल्टिपल-बॅरल रॉकेट लाँचर (एमबीआरएल) प्रणाली भारताने १९८०-९० च्या दशकात विकसित केली आहे. पिनाक म्हणजे शिवधनुष्य. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) पुणे येथील आर्मामेंट रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (एआरडीई) हे केंद्र, ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्ड, टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक इंजिनीअरिंग डिव्हिजन, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प पार पाडला जात आहे. पिनाक मार्क-१ प्रणालीत १२ बॅरल असून त्यातून २१४ मिमी व्यासाची, १२ रॉकेट, ४४ सेकंदांत डागली जातात आणि ती ४० किमीपर्यंत मारा करतात. प्रत्येक रॉकेट १०० किलोहून अधिक दारूगोळा वाहून नेते. त्यांच्या एकत्रित माऱ्याने शेकडो चौरस मीटर क्षेत्रफळातील शत्रूसैन्याचा काही क्षणांत विनाश घडवता येतो.

Mango exports were hit hard by the Israel Palestine war Pune news
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला मोठा फटका…झाले काय?
Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…

कारगिल युद्धात पिनाक मार्क-१ प्रणालीच्या प्रत्यक्ष चाचण्या घेतल्या गेल्या. त्याला मर्यादित प्रमाणात यश मिळाले. पिनाक मार्क-१ प्रणालीत अनेक दोष आढळले. काही वेळा त्यांची रॉकेट बॅरलच्या व्यासापेक्षा मोठी तयार झाली होती, तर काही वेळा रॉकेट ४० किमीचा अपेक्षित पल्ला गाठू शकत नव्हती. काही प्रसंगी रॉकेटचा बॅरलमध्येच स्फोट झाला. यासह रॉकेटमधून आगीचे लोळ बाजूला फेकले जाऊन सैनिकांना इजा होण्याचे प्रकारही घडले. सुरुवातीला ट्रकवरील रॉकेट लाँचरला तिरपे उभे करणारी यंत्रणा (लाँचर इरेक्टर) व्यवस्थित काम करत नव्हती. या सर्व अडचणींचे अद्याप पूर्णपणे निराकरण झाले नसल्याने सेनादले पिनाकला पूर्णपणे स्वीकारण्यास राजी नाहीत.

त्याच दरम्यान डीआरडीओने पिनाक मार्क-२ ही सुधारित आवृत्ती विकसित केली आहे. तिच्या सुरुवातीच्या चाचण्या नुकत्याच यशस्वीही झाल्या आहेत. पिनाक मार्क-२ चा पल्ला ७५ किमीपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच नव्या आवृत्तीत पिनाकच्या रॉकेटला डागल्यानंतर दिशादर्शनाची सुविधा आहे. या गायडेड रॉकेट्समुळे पिनाक मार्क-२ प्रणालीची अचूकता ६० किमी अंतरात २५ मीटर इतकी सुधारली आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com