News Flash

Ganesh Utsav Recipes 2017 : काजूकंद

सर्वांना आवडीचा गोड पदार्थ

काजूकंद

बाप्पा येणार म्हटल्यावर लहानग्यांपासून सगळेच खूश होतात. दिवसातून दोन वेळेस बाप्पाची आरती, गणेशमंडळांची आणि सोसायटीच्या मंडळांची सुरु असणारी लगबग तसेच बाप्पाला दाखविण्यात येणाऱ्या प्रसादाबाबत चर्चा सुरु असते. बाप्पाला रोज काय नैवेद्य दाखवायचा? बाप्पाला आवडेल आणि कुटुंबातीलही सगळ्यांना पचेल, रुचेल असा हा नैवेद्य असावा यासाठी घरातील स्त्रियांची धावपळ चाललेली पहायला मिळते. नवनवीन चविष्ट गोड पदार्थ, तयार करायला सोपे सुटसुटीत आणि शक्यतो हेल्दी असतील असा प्रयत्न आहे. त्यामुळे गणपतीचे १२ दिवस आम्ही घेऊन आलोयत तुमच्यासाठी काही खास रेसिपी…आजची खिरापत काजुकंद !! लहान मुलांना खूप आवडतो आणि बाप्पाालाही आवडेल !!!

काजूकंद

साहित्य : १/४ वाटी काजू पावडर, १ वाटी बारीक रवा, १ वाटी दूध, २ वाट्या साखर, १/४ वाटी तूप, खायचा रासबेरी रेड रंग ४ थेंब , व्हॅनिला इसेन्स १/२ चमचा.

कृती : एका पातेल्यात बारीक रवा, साखर, तूप, दूध एकत्र करावं. मिश्रण २ तास भिजवून ठेवावं. २ तासानंतर मिश्रण एका पॅन मधे घेऊन गॅसवर ठेवून शिजवून घ्यावं. खायचा रासबेरी रेड रंग आणि व्हॅनिला इसेन्स घालावा. ढवळून घ्यावं. गॅसवरून उतरवून काजू पावडर घालावी. १० – १५ मिनिटे घोटावे. एका ट्रेला तुपाचा हात लावून घ्यावा. मिश्रण ट्रेमधे ओतून सारखं पसरवून घ्यावं. वड्या कापाव्यात. काजुकंद तयार !!

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 10:00 am

Web Title: happy ganesh chaturthi recipes 2017 kajukand
Next Stories
1 VIDEO: पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
2 सजावटींद्वारे सैनिकांचे स्मरण
3 नव्या पूजासाहित्यासोबत पत्रींनीही बाजार फुलला
Just Now!
X