साहित्य :

अर्धा कप खवा

अर्धा कप साखर

दोन ते तीन टेबल स्पून मिल्क पावडर

दोन चिमटी वेलची पूड

कृती :

प्रथम साखर मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर बनवा. खवा मायक्रोवेव्हसेफ भांडय़ात ठेवून एक मिनिट हाय पॉवरवर गरम करा. भांडे बाहेर काढून ४० ते ४५ सेकंद ढवळा. यामुळे आत कोंडली गेलेली वाफ बाहेर पडेल. परत ४५ ते ५० सेकंद मायक्रोवेव्ह करा. भांडे बाहेर खवा पुन्हा ढवळा. खवा कोमट झाला की पिठीसाखर आणि वेलचीपूड घालून एकत्र करा. मिश्रण व्यवस्थित आळले तर मोदकाच्या साच्यात भरून मोदक करा. मिश्रणाला जर मोदक होण्याइतपत घट्टपणा आला नसेल तर मिल्क पावडर घाला. हाताने मळून घ्या. (खूप मळू नये, नीट एकजीव होईस्तोवर मळावे. नाहीतर गोळा तुपकट आणि चिकट होईल.) मिश्रण अगदी किंचित कोमट असेल तेव्हा मोदक बनवावेत.

टीप्स : खव्याचे मिश्रण घट्ट झाले नसेल तर थोडी मिल्क पावडर घालावी.

साखर घातल्यावर मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये.

 

प्रिया निकुम

सौजन्य – लोकप्रभा