मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन शिवसेनेत केलेल्या बंडामुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रातील घराघरात एकनाथ शिंदे हे नाव पोहोचले आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांची राज्यातील राजकीय ताकद वरचेवर वाढतानाच दिसत आहे. यात जनमानसातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक वेगळी क्रेझ पाहायला मिळतेय. राज्यातील दहीहंडी असो वा गणेशोत्सव दणक्यात साजरा केला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्याप्रमाणे दहीहंडीनंतर गणेशोत्सवही दणक्यात साजरा झाला. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. गणेशोत्सवात आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमातही एकनाथ शिंदे यांचीच हवा पाहायला मिळाली. अशाच एका कार्यक्रमातील लहान मुलाचा एत व्हिडीओ व्हायरल होतोय. या मुलाने कार्यक्रमात उपस्थितीतांची मनं जिंकण्यासाठी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लूक कॅरी केला होता. त्यामुळे हे चिमुकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या इंटरनेटवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.हा व्हिडीओ पाहून बच्चे कंपनीलासुद्धा एकनाथ शिंदेंची भुरळ पडल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांना भेटी दिल्या. अगदी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री शिंदे गणेश मंडळांचे आमंत्रण स्वीकारत भेटी देताना दिसले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा मोठा फौज-फाटा दिसून आला. अनेक लोक त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आग्रह करताना दिसले. अनेकांचा आग्रह स्वीकारत त्यांनी फोटोही काढले. याच प्रसंगाला अनुसरून एक लहान मुलगा मुख्यमंत्र्यांची हुबेहूब ॲक्टिंग करताना दिसतोय. नौपाड्याचा चिंतामणी, नागेश बाल मित्र मंडळातील एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. त्यात एक लहान मुलगा मुख्यमंत्र्यांची हुबेहूब ॲक्टिंग करताना दिसतोय.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत
dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेश मंडळांना भेट देण्यासाठी ज्याप्रमाणे एन्ट्री घ्यायचे, अगदी त्याचप्रमाणे एक लहान मुलगा भारदस्त दाढी, कपाळी टिळा आणि पांढरी पॅन्ट, शर्ट असा मुख्यमंत्र्यांचा गेटअप करून एन्ट्री घेताना दिसतोय. यावेळी त्याच्या आजूबाजूला मोठा पोलिस फौज-फाटा दिसत असून जो त्यांना मार्ग करून देण्याचे काम करत आहे. यावेळी तो लहान मुलगा गणपतीच्या पाया पडून माध्यमांसमोर मुख्यमंत्री ज्या प्रकारे संवाद साधण्यासाठी उभे राहतात त्याचप्रमाणे उभा राहतो. यावेळी एक मुलगा त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येतो, तेव्हा तो हसून त्याला सेल्फीही देतो. यानंतर मुख्यमंत्र्यांसारखं चेहऱ्यावर स्मित हास्य आणून माध्यमांसमोर हात उंचावून नमस्कार करतो. यानंतर अगदी त्यांच्यासारखेच हावभाव करत माईकवर बोलतो आणि नंतर खिशातील मोबाईल काढत त्यावर बोलत निघून जातो. या मुलाला पाहून प्रेक्षक देखील कौतुकाने टाळ्या वाजवत त्याला प्रोत्साहन देत आहेत. 

यातून लहान मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेशोत्सवातील मंडळांना दिलेल्या भेटीदरम्यानची हुबेहूब नक्कल केली आहे, जी अनेक युजर्सची मनं जिंकत आहे. official_shindesarkarand नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर अनेकांनी भन्नाट कमेंटस केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलेय की, शिंदे साहेब गणपती गेले, आता नवरात्रीच्या तयारीला लागा, परत दिवाळी येत आहे लवकरच. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, रुबाबात साहेब.

मुलांमधील ‘हे’ पाच गुण मुलींना करतात आकर्षित; करा मुलींना असं प्रभावित!

यंदा गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातील बडे उद्योगपती, राजकीय नेते, सेलिब्रिटींच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. त्याचवेळी मुंबई, ठाणे, पुण्यासह विविध ठिकाणच्या प्रसिद्ध गणेश मंडळांनाही त्यांनी आवर्जून भेटी दिल्या. दीड दिवसात मुख्यमंत्र्यांनी जवळपास २५० मंडळांना भेटी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केलेल्या गणेशोत्सवाची आता जोरदार चर्चा रंगतेय.