आज अनंत चतुर्दशी. गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. आज दहा दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. अनेक जण एकमेंकांच्या घरी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. कलाकारही इतरांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेताना दिसत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी लावत बाप्पाचे दर्शन घेतलं. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेही वाचा- “यावर्षीचे देखावे…” पुण्यातील गणपती दर्शनानंतर प्रिया बेर्डेंची पोस्ट, म्हणाल्या “तो योग आज…” अभिनेते जयवंत वाडकर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. बाप्पाच्या दर्शनानंतर सगळेजण "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया"चा जयघोष करताना दिसत आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर त्यांची पत्नही हजर होती. मराठी कलाकरांसह अनेक कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी लावत बाप्पाचे दर्शन घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान आणि शाहरुख खानने वर्षा’ निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागतही केले. यावेळेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सलमान शाहरुखनंतर रितेश आणि जेनिलियानेही मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. तसेच ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचे आर्शिवाद घेतले. हेही वाचा- Video: संदीप पाठकच्या लेकीनं गणपती बाप्पासाठी गायलं खास गाणं; पाहा व्हिडीओ कलाकारांबरोबर अनेक राजकीय नेत्यांही बाप्पाच्या दर्शनासाठी ‘वर्षा’ निवासस्थानावर हजेरी लावली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही केलं. राज ठाकरेंच्या हस्ते गणपतीची आरतीही करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे हे मागच्या वर्षीही गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही रविवारी वर्षा या निवासस्थानी येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरातील गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हजर होते.