07 March 2021

News Flash

कॅन्सर प्रतिबंध व आयुर्वेद – २

‘लवकर उठे लवकर निजे, त्यासी आरोग्य धनसंपदा मिळे।’ या दिनचय्रेचे व रात्रचय्रेचे महत्त्व सांगणाऱ्या सूत्राचा विचार आपण मागील लेखात केला.

| December 23, 2014 06:29 am

‘लवकर उठे लवकर निजे, त्यासी आरोग्य धनसंपदा मिळे।’ या दिनचय्रेचे व रात्रचय्रेचे महत्त्व सांगणाऱ्या सूत्राचा विचार आपण मागील लेखात केला. दिवसभरात शरीरात होणाऱ्या वात-पित्त-कफ दोषांच्या बदलांचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे दिनचय्रेचे पालन आवश्यक आहे, त्याचप्रमाणे ऋतुबदलाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी ऋतुचय्रेचे पालन करणे हा स्वस्थवृत्तातील महत्त्वाचा भाग आहे. आयुर्वेदाने उन्हाळा- हिवाळा- पावसाळा यांनुसार संपूर्ण वर्षांचे विभाजन वसंत, ग्रीष्म, वर्षां, शरद, हेमंत, शिशिर या ६ ऋतूंत केले आहे. मराठी महिन्यांनुसार चत्र-वैशाख म्हणजे वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ हा ग्रीष्म ऋतू, श्रावण-भाद्रपद हा पावसाळा म्हणजे वर्षां ऋतू, आश्विन-काíतक म्हणजे शरद ऋतू, मार्गशीर्ष-पौष हा हेमंत ऋतू व माघ-फाल्गुन म्हणजे शिशिर ऋतू होय. शिशिर ऋतूतील हुडहुडी भरविणाऱ्या थंडीमुळे शरीरात कफदोषाचा संचय झाला असतो. वसंत ऋतूतील उन्हामुळे या कफाचे विलयन होऊन कफदोषाचा प्रकोप होतो व सर्दी, खोकला, दमा, कांजिण्या, गोवर असे कफप्रधान आजार या ऋतूत उद्भवतात. त्यामुळे कफाचा नाश करणारे कडू, तिखट, तुरट चवीचे, उष्ण गुणाचे आहारीय पदार्थ या वेळी पथ्यकर ठरतात. यात पडवळ, मेथी, कारले, सुंठ, मिरी, लसूण, मध, कोमट पाणी अशा पदार्थाचा समावेश होतो. वसंत ऋतूत कफाचे आजार बळावत असले तरी वातावरणात उष्णता असते, त्यामुळे कफदोषाचा नाश होईल परंतु अतिशय उष्ण-तीक्ष्णही नाही अशा आहार-विहाराचे पालन करणे ही तारेवरची कसरत या ऋतूत सांभाळावी लागते. कफदोषामुळे उद्भवणाऱ्या या आजारांसाठी पंचकर्मापकी वमन ही चिकित्सा या ऋतूत प्रत्येकाने करून घेणे आवश्यक ठरते. ग्रीष्म ऋतूत अतिशय कडक उन्हात, शरीरात कफदोषाचा क्षय व वातदोषाचा संचय अशी परिस्थिती असल्याने गोड-आंबट चवीचे डािळब, द्राक्ष, सफरचंद असे फळांचे रस, िलबू सरबत, शहाळ्याचे पाणी, कोकमाचे सार, लाह्य़ांचे सूप असे तर्पण करणारे द्रवपदार्थ आहारात अधिक असावेत. अतिशय खारट, तिखट पदार्थ वज्र्य करावेत. दुपारी उन्हात फिरू नये व बाहेर जावे लागलेच तर टोपी, गॉगल यांनी डोक्याचे व डोळ्यांचे रक्षण करावे. वर्षां ऋतू म्हणजे पावसाळा हा वातप्रकोपाचा काळ असल्याने व अन्नाचे पचन करणारा जाठराग्नी या ऋतूत अतिशय मंद असल्याने पचण्यास हलका परंतु गोड, आंबट, खारट चवीचा, किंचित उष्ण व स्निग्ध गुणाचा आहार पथ्यकर! यात गरम पाणी, मऊ भात-तूप, मुगाची खिचडी, भाज्यांचे गरम सूप यांचा विशेष समावेश असावा. या ऋतूत जेवण प्रमाणातच घ्यावे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे वातदोषाचे शोधन करण्यासाठी विधिवत् बस्ति चिकित्सा घ्यावी, जेणेकरून पुढील वर्षभर रोगसमूहांचा राजा व दोषांचा नेता असे ज्याचे आयुर्वेदीय ग्रंथकारांनी वर्णन केले आहे त्या वातदोषावर योग्य नियंत्रण मिळविणे शक्य होते. यापुढील येणारा शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हिट किंवा पित्तप्रकोपाचा काळ. त्यामुळे पित्तशमन करणाऱ्या दूध, तूप, लोणी, साखर, गुलकंद, मोरावळा, डािळब, द्राक्ष, अंजीर, भाताचे पदार्थ यांची आहारात रेलचेल असावी. पित्त दोषाचे शोधन करणारे विरेचन व रक्तमोक्षण हे पंचकर्मापकी उपक्रम या ऋतूत करून घेणे म्हणजे रक्तपित्त, त्वचाविकार, कावीळ, रक्तप्रदर यासारख्या दुष्ट रक्त व पित्तप्रधान आजारांपासून दुष्ट रक्तप्रधान अर्बुद, ल्युकेमिया, हॉजकिंग्स डिझिझ यांसारख्या कॅन्सर प्रकारांपर्यंत सर्व आजारांना प्रतिबंध करणे होय. हेमंत व शिशिर हे दोनही ऋतू हिवाळ्याचे ऋतू असल्याने तसेच या काळात जाठराग्नी बलवान असल्याने पचण्यास जड व शरीराचे बल वाढविणारे बासुंदी, पेढे असे दुग्धजन्य गोड पदार्थ, उडदाचे पदार्थ, स्निग्ध पदार्थ हितकर ठरतात. मांसाहारी व्यक्तींनी या ऋतूत मटण सूप, मटण/ चिकन बिर्याणी असे पचण्यास जड परंतु पोषण करणारे पदार्थ सेवन करणे हितकर ठरते. आपल्या भारतीय संस्कृतीतील सण व ते साजरे करताना आहार-विहारातील ज्या प्रथा सांगितल्या आहेत त्या म्हणजे ऋतुचय्रेचे द्योतकच आहेत. म्हणूनच थंडीत संक्रांतीला पचण्यास जड असे तीळ व उष्णगुणांचा गूळ यापासून तिळगूळ करण्याची प्रथा आहे. वसंत ऋतूत चत्रगौरीच्या हळदीकुंकवास कफघ्न असे चटपटीत हरभरे, वाटली डाळ व उष्णतानाशक कैरीचे पन्हे दिले जाते. श्रावणातील उपवास हे पावसाळ्यात मंद झालेल्या जाठराग्नीस हितकरच आहेत. शरद ऋतूत प्रकुपित झालेल्या पित्तदोषाच्या शमनासाठी कोजागरीला चांदण्या रात्री मसाल्याचे दूध घेण्याची पद्धत आहे, तर हेमंत ऋतूत प्रदीप्त झालेल्या जाठराग्नीचे पोषण करण्यासाठी दिवाळीत करंजी, लाडू, चकली, चिवडा असा पचण्यास जड व स्निग्ध गुणांचा फराळ केला जातो.
ऋतुचय्रेबरोबरच स्वस्थवृत्तातील शरीररक्षक असा महत्त्वाचा नियम म्हणजे वेगावरोध न करणे. आयुर्वेदाने अधोवात, मल, मूत्र, भूक, तहान, िशक, झोप, खोकला, श्रमश्वास, जांभई, अश्रू, उलटी, मथुनेच्छा या शरीराच्या नसíगक १३ क्रियांना अधारणीय वेग अशी संज्ञा दिली आहे. या वेगांची संवेदना झाल्यास लगेचच त्यांची पूर्ती करणे यामुळे शरीरातील वातदोषाचे व त्या त्या संबंधित अवयवांचे स्वास्थ्य राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या वेगांची संवेदना झाली नसतानाच बळेबळेच त्यांचे उदीरण करणे हेही शरीरास तितकेच घातक आहे. आमच्या कॅन्सर संशोधन प्रकल्पात कॅन्सर रुग्णांच्या आहार-विहाराच्या सवयींचा अभ्यास करताना अनेकांमध्ये अशा प्रकारच्या वेगावरोध व वेग उदीरणाच्या सवयी असल्याचे आढळले. विशेषत: लहान आतडे, मोठे आतडे व गुदभागाचा कॅन्सर असलेल्या व्यक्तींत अधोवात व मलाच्या वेगावरोधाचा इतिहास, मूत्राशय – वृक्काच्या- पौरुषग्रंथीच्या कॅन्सरमध्ये मूत्रप्रवृत्तीच्या वेगाच्या अवरोधाची सवय तर आमाशय- ग्रहणी- पित्ताशयाच्या कॅन्सरमध्ये भुकेची वेळ न सांभाळल्याचे अनेक रुग्णांत आढळले. अशी वेगावरोध किंवा वेगउदीरणाची ज्या व्यक्तींना सवयच जडलेली असते त्यांना त्या त्या अवयवाचे कॅन्सरप्रमाणेच इतरही आजार होण्याची संभावना असते. शरीरस्वास्थ्याचे व सर्व आजारांचे मूळ खाण्यापिण्याच्या सवयींवर अवलंबून असल्याने ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।’ या उक्तीनुसार या पवित्र यज्ञकर्माचे आयुर्वेदोक्त नियम माहीत असणे व त्यानुसार आपला आहार सांभाळणे हा स्वस्थवृत्तातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. म्हणूनच आयुर्वेदीय ग्रंथकारांनी पाणी, दूध, मध, एकदल धान्य, द्विदल धान्य, भाज्या, मसाल्याचे पदार्थ, मांसाहारातील पदार्थ यांपासून भात, भाताचे पदार्थ, पोळी, भाकरी, शिजवलेल्या भाज्या, आमटी, लाडू- खीर यांसारखे मिष्टान्न अशा पक्व पदार्थापर्यंत सगळ्यांचेच विस्ताराने गुण व कर्म सांगितले आहेत. एवढेच नव्हे तर अन्नसेवनाच्या योग्य वेळा कोणत्या, अन्नसेवन कोणत्या भांडय़ात, कशा वातावरणात करावे, कोणता आहार किती प्रमाणात घ्यावा, असे आहारसेवनाचे नियमही सकारण सांगितले आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रकृती- वयाचा विचार करून अशा प्रकारे विधिवत् आहार सेवन केला तर शरीरस्वास्थ्याची अर्धी लढाई जिंकता येते.
आहाराबरोबरच दिवसभरातील चालणे, फिरणे, प्रवास, सकाळी उठण्याच्या व रात्री झोपण्याच्या वेळा यांसारख्या विहाराचे नियमही शरीरस्वास्थ्यास हेतुभूत ठरतात. स्वस्थवृत्ताच्या या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले तरी आजच्या ताणतणावयुक्त व स्पध्रेच्या युगात प्रत्येक व्यक्तीने आपले शारीरिक व मानसिक संतुलन राखण्यासाठी नित्यनियमाने काही टॉनिक्स, ज्याला आयुर्वेदाने नित्यसेवनीय रसायन अशी संज्ञा दिली आहे, त्यांचे सेवन करणे आवश्यक आहे.  सर्वात शेवटचा परंतु स्वस्थवृत्तातील महत्त्वाचा नियम म्हणजे आचार रसायन! व्यक्तीपासून समष्टीपर्यंत सर्वानीच धर्मसम्मत सदाचाराचे पालन करणे म्हणजेच आपल्या जीवनातील चतुर्विध आश्रमांतील कर्तव्ये प्रामाणिकपणे व सद्भावनेने पार पाडणे ही तर सर्वागीण आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2014 6:29 am

Web Title: cancer and ayurved 2
टॅग : Cancer 2
Next Stories
1 आले उपासाचे दिवस!
2 पिढींमधले सेतू
3 कॅन्सर प्रतिबंध व आयुर्वेद
Just Now!
X