पहाटे लवकर उठून अंगाला तेलाचा अभ्यंग केल्यावर जाणवणारी उब..थंडीत कुडकुडत उटण्याच्या सुगंधात केलेली गरम पाण्याची आंघोळ.. आणि आंघोळीनंतर घरातल्या सर्वानी एकत्र बसून केलेला फराळ!  दिवाळीतल्या या दिनचर्येचे वर्णन आयुर्वेदातही आहे. कसे, ते पाहूया या लेखात..
हेमंत ऋतु आणि आहार
आयुर्वेदात ऋतुनुसार माणसाचा आहारविहार कसा असावा यासंबंधी सांगितले आहे. आपल्याकडे मुख्य सहा ऋतु मानले जातात. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षां, शरद, हेमंत हे ते सहा ऋतु. यांपैकी दिवाळी हेमंत ऋतुत असते. त्यामुळे दिवाळीत तेल- उटणे लावून केले जाणारे अभ्यंग स्नान, फराळाचे तेलकट, तुपकट, गोडधोड पदार्थ या सर्व गोष्टींचा संबंध हेमंत ऋतुसाठी सांगितलेल्या ऋतुचर्येशी आहे. या ऋतूत थंडी वाढते, त्यामुळे भूक वाढते. याला अग्नी प्रदीप्त होणे असे म्हणतात. पेटलेल्या या अग्नीला पचण्यास जड असणारे पदार्थच देणे आवश्यक असते. उलट या दिवसांत पुरेसा किंवा पचायला थोडा जड असलेला आहार घेतला नाही तर बद्धकोष्ठ, पोटात वायू धरणे, मूळव्याध असे त्रास वाढण्याची शक्यता दिसून येते. म्हणून हेमंत ऋतूत व्यवस्थित पोटभर खाण्यास सांगितले आहे. इतर वेळी अगदी ‘अनहेल्दी’ ठरवला जाणारा आहारही या ऋतूत चालणार आहे. एरवी मांसाहार आणि आयुर्वेद असा काही संबंध दिसत नाही. पण हेमंतात अगदी मांसाहारही चालेल, तो पचू शकेल असा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. नवा तांदूळ खाऊ नका, असे म्हटले जाते. पण हेमंत ऋतुचर्येत नव्या तांदुळालाही स्थान आहे. साजुक तुपाबरोबर तेल आणि अगदी ‘अ‍ॅनिमल फॅट’ही (वसा) आहारात वापरता येईल.  

‘इक्षुविकृती’ आणि ‘दुग्धविकृती’ ही चांगल्याच!
साखरेचा भरपूर वापर असलेल्या पदार्थाचा उल्लेख आयुर्वेदात ‘इक्षुविकृती’ असा केला जातो. तर दुधाच्या पक्वानांना ‘दुग्धविकृती’ म्हटले जाते! म्हणजे साखरेचे पदार्थ आणि दुधापासून बनलेले बासुंदी, खीर असे पदार्थ हेमंत ऋतूत चांगलेच! 
अर्थात आयुर्वेदात नमूद केलेली ऋतुचर्या कोणताही आजार नसलेल्या व्यक्तीसाठी असते हे विसरू नये. म्हणजेच मधुमेही व्यक्तींनी हेमंत ऋतूतही गोडधोडाचे पथ्य पाळायला हवेच. इतर काही आजार असलेल्या व्यक्तींनीही काळजी घ्यायला हवीच. आजारी नसलेल्यांना मात्र तेलातुपात तळलेले, गोड पदार्थ हात थोडा सैल सोडून खाण्याची मुभा नक्कीच आहे.

cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

तेल
आयुर्वेदानुसार त्वचा हे वाताचे स्थान समजले जाते. वात कमी करण्यासाठी तेलासारखे औषध नाही! हे तेलही कोणते असावे, ते कोणत्या द्रव्यांनी सिद्ध केलेले असावे याबद्दल आयुर्वेदात सांगितले आहे. अभ्यंगासाठीच्या तेलाचा ‘बेस’ तिळाच्या तेलाचाच असावा. हे तेल वातघ्न आणि सुगंधी द्रव्यांनी सिद्ध करावे. लोद्र, दशमूळ, नागरमोथा, सुगंधी कचोरा, चंदन ही द्रव्ये यात वापरतात. यष्टीमधु (ज्येष्ठमध), उपळसरी, विडंग ही त्वचेसाठी चांगली असणारी द्रव्येही अभ्यंगासाठीच्या तेलात वापरतात. त्वचेला संसर्गापासून वाचवणारी द्रव्येही तेलात असावीत. आंबेहळद, विडंग हे संसर्गाच्या प्रतिबंधाचे काम करतात. डोक्याला लावण्याचे तेलही अभ्यंगासाठीच्या तेलासारखेच असावे. मात्र केस हा अस्थीधातूचा एक भाग समजला जात असल्यामुळे केसांसाठीच्या तेलात अस्थिधातूचे पोषण करणारी भृंगराज, माका, ब्राम्ही ही द्रव्ये असावीत. केस धुण्यासाठी शिकेकाई आणि रिठय़ाचे मिश्रण उत्तम.     

उटणे  
आंघोळ करताना साबण लावणे टाळले तरच उत्तम. साबण त्वचेच्या रंध्रांमधील तेल धुवून टाकतो. तेलाचे फायदे मिळावेत म्हणून साबणाऐवजी उटण्याची आंघोळ करावी. उटणे लावून आंघोळ केल्यानंतर त्वचा तेलकट राहात नाही. पण त्वचेच्या रंध्रांत झिरपलेले तेल धुवूनही टाकले जात नाही. उटण्याच्या पावडरीत वाळा, नागरमोथा, कचोरा, अनंतमूळ (उपळसरी), आवळा ही द्रव्ये वापरलेली असावीत असे सांगितले आहे. ही द्रव्येही वात दूर करणारी आणि सुगंधी आहेत. काही लोक उटण्यात अगरू, देवदारू ही द्रव्येही वापरतात. पण ती तुलनेने खूप महाग आहेत.

अभ्यंग
आयुर्वेद हेमंत ऋतूत आपले स्वत:चे छान लाड करून घ्यावेत असेच सांगतो! अंगाला तेलाचा मसाज करून म्हणजे अभ्यंग करून, उटणे लावून गरम पाण्याने स्नान करणे हा यातलाच एक प्रकार. दक्षिणायनात सूर्याचे बल कमी असल्याचे आयुर्वेद मानतो. या काळात चंद्राचे बल अधिक असल्याचे मानले जाते. त्यामुळे हेमंत ऋतू हा शरीरात अधिकाधिक शक्ती साठवण्याचा काळ असतो. या काळात शरीराचे पोषण करून घ्या, ही शक्ती उन्हाळ्यात उपयोगी पडेल, असा संदर्भ आहे.
थंडीत त्वचा कोरडी पडू लागते. कोरडय़ा त्वचेला जीवाणू  किंवा बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कोरडय़ा त्वचेसाठी तेलाचा मसाज आणि उटण्याची आंघोळ फायदेशीर ठरते. पण अभ्यंगाचा आणखी एक उपयोगही सांगितलेला आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींना हिवाळा त्रासदायक ठरतो. थंडीमुळे त्वचेच्या वरच्या भागात असलेल्या रक्तवाहिन्या संकुचित होतात. ही प्रक्रिया रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरते. त्वचेला तेलाचा मसाज मिळाल्यावर या रक्तवाहिन्या काहीशा विस्तारतात आणि रक्तदाब पूर्ववत होण्यास मदत होते.
अंगाला तेल लावण्याची खास पद्धतही आयुर्वेदात नमूद करण्यात आली आहे. किमान पाच ते पंधरा मिनिटे अंगाला मसाज देणे आवश्यक असते. तरच स्नेह (तेल) धातूगत होतो, असे म्हटले जाते. सांध्यांच्या ठिकाणी मसाज करताना हात वर्तुळाकृती फिरवून मसाज द्यावा. इतर त्वचेला मसाज देताना वरच्या दिशेने खाली अशा प्रकारे अभ्यंग करावे. तेल लावल्यानंतर लगेच आंघोळ न करता पंधरा मिनिटे थांबावे. याने तेल त्वचेत जिरण्यास मदत होते. अभ्यंग झाल्यावर पंधरा मिनिटांनी गरम पाण्यात भिजवून घेतलेल्या टॉवेलने अंग पुसून काढावे आणि मगच आंघोळ करावी.  
अंगात ताप असताना, कफाचा आजार असताना, कफामुळे डोके दुखत असेल तर अभ्यंग करू नये. अशा व्यक्तींना अभ्यंगाचा त्रास होण्याचीच शक्यता अधिक.  
शब्दांकन संपदा सोवनी

रांगोळी आणि ‘पेंट थेरपी’
सणाला रांगोळी काढावी असे आयुर्वेदात कुठे म्हटलेले आढळत नाही. पण रांगोळीचा उपयोग ‘पेंट थेरपी’सारखा होऊ शकतो. मानसिक ताण घालवायचा असल्यास कागद आणि रंग घेऊन मनात येईल ते चित्र काढावे, म्हणजे बरे वाटेल, अशी पेंट थेरपीची संकल्पना सांगितली जाते. सतत घरातले कष्ट उपसून दमलेल्या स्त्रियांना रांगोळी काढून, त्यात रंग भरून बरे वाटते, मन शांत झाल्यासारखे वाटते, तो यातलाच प्रकार असावा.     

आरोग्य परिचय
दिवाळी अंक- शतायुषी
संपादक- डॉ. अरविंद संगमनेरकर, डॉ. आशा संगमनेरकर
किंमत- १०० रुपये
बदलत्या जीवनशैलीबरोबर झपाटय़ाने फोफावलेल्या मधुमेह या आजाराच्या विविध पैलूंची माहिती यंदाच्या शतायुषीमध्ये विशेष विभागात मिळते. मधुमेह का, कसा, कोणाला होऊ शकतो, त्याची लक्षणे कशी ओळखावीत, लहान मुले आणि तरूणांमधील मधुमेह, स्त्रियांमधील मधुमेह, चाळिशीनंतरचा मधुमेह, मधुमेहासाठीच्या तपासण्या, उपचार आणि त्याबरोबर इतर आजार असल्यास उद्भवू शकणारी गुंतागुंत या सर्व बाबींविषयीच्या पुरेपूर माहितीचा समावेश या विशेष विभागात आहे.
आजार आणि आरोग्यावरील मुक्त संवादात डॉ. अरविंद संगमनेरकर यांचा ‘सेकंडरी इन्फर्टिलिटी’ या विषयावरील ‘डॉक्टर, मला आणखीन एक बाळ हवंय!’ हा लेख माहितीपूर्ण आहे. याशिवाय रात्रपाळीची नोकरी करावी लागणाऱ्यांना होणारे आजार, नव्या युगाचे ‘डिफिशियन्सी’शी निगडित आजार, स्त्रियांमधील ताणतणावांशी संबंधित आजार, मोतिबिंदू आणि लेन्स इम्प्लांट अशा विविध विषयांनाही हा अंक स्पर्श करतो. शेतीतील खते आणि औषधांची फवारणी आणि त्याचा शेतकऱ्याच्या आरोग्याशी असलेला संबंध याविषयीचा डॉ. शशिकला सांगळे यांचा लेख, तसेच अन्नधान्य, पापड- लोणची यांची साठवणूक कशी करावी या विषयावरील डॉ. मुरलीधर तांबे यांचा लेखही वाचनीय.    

कंपवातावर प्रथिन प्रत्यारोपणाने उपचार शक्य
पार्किन्सन म्हणजे कंपवातावर मेंदूत उच्च तंत्रावर आधारित प्रत्यारोपण करता येईल व त्यामुळे कंपवाताची वाढ रोखता येईल. तसेच, रूग्णांच्या मेंदूतील न्यूरॉन्सना जीवदान मिळेल असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या प्रत्यारोपणामुळे रोगग्रस्त पेशींच्या जागी नवीन पेशींची वाढ होईल. परिणामी कंपवात असलेल्या रूग्णांना चांगला फायदा होऊ शकेल. मेंदूरोगतज्ज्ञ डॉ.अ‍ॅलन व्होन व मेंदूशल्यतज्ज्ञ प्रा. स्टीव्हन गील यांनी फ्रांचाय रूग्णालय, ब्रिस्टॉल येथे केलेल्या संशोधनानुसार ग्लायल पेशीतील न्यूरोट्रॉपिक फॅक्टर हे प्रथिन या बाबतीत महत्त्वाचे आहे. कंपवाताच्या सहा रूग्णांवर हे प्रयोग यशस्वी झाले असून ‘जीडीएनएफ’ हे प्रथिन थेट मेंदूत प्रत्यारोपित केल्यास कंपवाताची लक्षणे कमी होतात. त्यामुळे कंपवात वाढतही नाही. मेंदूत हे प्रथिन सोडण्यासाठी एक नवीन पद्धत वैज्ञानिकांनी शोधली आहे. त्यामुळे मरणाऱ्या न्यूरॉन पेशींना जीवदान मिळेल असे गील यांचे मत आहे. सहा रूग्णांमध्ये उपकरणाच्या माध्यमातून हे प्रथिन प्रत्यारोपित करण्यात आले व ते सुरक्षितही आहे. आता या चाचण्यांचे पुढचे टप्पे सुरू होतील, त्यात ३६ रूग्णांवर जीडीएनएफ प्रथिनाचे प्रयोग केले जाणार आहेत. मेंदूतील डोपॅमाईन हे रसायन कमी होऊ लागल्यास चेतापेशी मरतात, त्यामुळे कंपवात होतो. यापूर्वीच्या अभ्यासानुसार ‘जीडीएनएफ’ या प्रथिनामुळे चेतापेशींची वाढ पुन्हा जोमाने होते व कंपवात रोखला जातो.

स्वादुपिंडाचे त्रिमिती मॉडेल
मूळ पेशींच्या माध्यमातून स्वादुपिंड तयार करण्याची अभिनव अशी त्रिमिती पद्धत संशोधकांनी विकसित केली आहे. अशा प्रकारे तयार केलेल्या अवयवांवर नवीन औषधांच्या चाचण्या घेता येतील व प्राण्यांचा वापर करावा लागणार नाही. कोपनहेगन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी त्रिमितीय पेशी संरचना पद्धत शोधून काढली असून त्यामुळे अतिशय कार्यक्षम अशा स्वादुपिंड पेशी तयार करता येतात. यात उंदराच्या पेशीतील घटक वापरून झाडासारखी पेशी रचना तयार करता येते. त्रिमिती आकारामुळे या पेशींची संख्या वाढते असे अ‍ॅनी ग्रापिन बॉटन यांनी म्हटले आहे. आतापर्यंत आम्ही आठवडय़ात अशा ४० हजार पेशी विकसित केल्या अशून त्या जास्त प्रमाणात तयार करून इन्शुलिनसारखी संप्रेरके किंवा वितंचके तयार करता येतील, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रारूपाचा उपयोग मधुमेहावरील पेशी उपचारांसाठीही करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात बिटा पेशी तयार होण्यावर ही उपचार पद्धती अवलंबून आहे. स्वादुपिंडाच्या पेशी या योग्य वातावरणात वाढवाव्या लागतात तरच त्या पेशी उपचार पद्धतीत वापरता येतात असे वैज्ञानिकांचे म्हणणे असून हे संशोधन ‘डेव्हलपमेंट’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
प्रिव्हेन्शन या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

कर्करोगावर स्तनाग्रातून इंजेक्शन
स्तनाग्रातून दिलेल्या इंजेक्शनच्या मदतीने कर्करोगाचा मुकाबला करण्याची नवीन पद्धत संशोधकांनी शोधून काढला आहे. त्यामुळे स्तनातील इतर भागांना हानी पोहोचत नाही. स्तनाचा कर्करोग हा मुळात दुग्धनलिकांमध्ये सुरू होतो तेथेच या इंजेक्शनचा थेट परिणाम साधला जातो त्यामुळे इतर भाग सुरक्षित राहतात. स्तनाग्रातून इंजेक्शन दिल्याने  केमोथेरपीचे इतर वाईट परिणाम टाळता येतात कारण यात विषारी द्रव्ये ही उतींमधून जात असतात,असे डॉ.सिल्वा क्रॉस यांनी सांगितले. यकृतात औषधाचे विघटन होण्याची शक्यता कमी होते. यकृतातच औषधाचे विघटन झाले तर त्याचा हवा तो परिणाम साध्य होत नाही असे क्रॉस यांचे मत आहे. सिल्वा व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पद्धतीचा वापर सुरू केला. नॅनोपार्टिकलवर आधारित असे इंजेक्शन स्तनाग्रात टोचून स्तनाचा कर्करोग निर्माण करणाऱ्या जनुकाचे आविष्करण थांबवले जाते. उंदरांमध्ये या पद्धतीने कर्करोगाची घोडदौड रोखणे शक्य झाले असून त्यात स्तनातील गाठी कमी झाल्या आहेत, असे ‘जर्नल ऑफ व्हिज्युअलाइज्ड एक्सपेरीमेंटस’ या नियतकालिकात म्हटले आहे.

रोज तासभर चालण्याने स्तनांच्या कर्करोगाची जोखीम १४ टक्क्य़ांनी कमी
आठवडय़ाला रोज एक तास चालण्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका १४ टक्के कमी होतो, तर जरा जास्त शारीरिक व्यायामामुळे तो २५ टक्क्य़ांनी कमी होतो, असे एका भारतीय संशोधिकेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. रजोनिवृत्तीनंतरचा काळ अनुभवत असलेल्या ७३ हजार ६१५ स्त्रियांनी शारीरिक क्रियाशीलता बाळगली व दर आठवडय़ाला त्यांनी सात तास चालण्याचा व्यायाम केला, तर स्तनाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते, असा दावा अ‍ॅटलांटातील अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या डॉ. अल्पा पटेल यांनी संशोधनाअंती केला आहे. ज्यांचा रजोनिवृत्तीचा काळ सुरू आहे व ज्या रोज फावल्या वेळात चालण्याचा व्यायाम करीत आहेत. त्यांच्यात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी झालेले दिसले. दुसरा कुठलाही व्यायाम न करता आठवडय़ाला रोज सरासरी एक तास चालण्याने त्यांच्यात कर्करोगाचे प्रमाण कमी झालेले दिसले. शारीरिक व्यायामामुळे या स्त्रियांच्या बीएमआय इंडेक्स (बॉडीमास इंडेक्स व वजनात ) किंवा संप्रेरकांच्या प्रमाणात फारसा बदल दिसून आला नाही. ज्या स्त्रियांनी रोज मोठय़ा प्रमाणात शारीरिक हालचालींचा व्यायाम केला तेव्हा त्यांच्यात स्तनाच्या कर्करोगाचा धोका २५ टक्के कमी झाला. तर, ज्या स्त्रिया आठवडय़ाला सात तास चालण्याचा व्यायाम करतात त्यांच्यात हा धोका १४ टक्क्य़ांनी कमी झाला. चालण्याच्या व्यायामाचा स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीबाबत नेमका काय परिणाम होतो हे जाणून घेणारा हा पहिलाच अहवाल असून त्यात एकूण ५० ते ७४ वयोगटातील ९७ हजार ७८५ स्त्रियांपैकी ७३ हजार ६१५ स्त्रियांच्या माहितीचा आढावा घेण्यात आला . १९९२ ते १९९३ या काळात या स्वयंसेवक महिलांना यात सहभागी करून घेतले होते. हे संशोधन कॅन्सर एपिडिमिऑलॉजी अँड बायोमार्कर्स अँड

पणत्या आणि फटाके.. अशी घ्या काळजी!
*दिवाळीत घरोघरी पणत्या आणि दिवे लावले जातात. हे दिवे लावताना ते कागद, कपडे, लाकूड किंवा ज्वलनशील वस्तूंच्या आसपास तर नाहीत ना, याची खबरदारी घ्यावी.
*शक्यतो फटाके उडवणे टाळावेच, पण तरीही ते उडवायचेच असल्यास घरापासून दूर मोकळ्या जागेत जाऊन उडवावेत.
*फटाके उडवतानाही आसपास काही ज्वलनशील वस्तू नाही ना, याची काळजी घेणे आवश्यकच.
*लहान मुले फटाके उडवत असताना मोठय़ांपैकी कुणीतरी त्यांच्याबरोबर असावे.
*पायांत चपला घातल्याशिवाय फटाके उडवू नयेत.
*फटाके उडवायला जाताना बरोबर पाणी किंवा वाळू भरलेली बादली न्यायला विसरू नका. जवळ प्रथमोपचार पेटीही हवीच.
* अडचणीच्या जागी रॉकेटसारखे फटाके उडवू नका. विद्युत तारांजवळ किंवा घराच्या उघडय़ा खिडक्यांजवळ फटाके उडवणे धोकादायक ठरू शकते.  
*फटाके उडवताना कपडय़ांकडेही लक्ष हवे. अशा वेळी अंगाबरोबर बसणारे आणि शक्यतो सुती कपडेच घाला. घोळदार, नायलॉनचे कपडे फटाके उडवताना नकोत.
*फुलबाज्या उडवून झाल्यावर त्याच्या काडय़ा एका बाजूला एकत्र कराव्या. फुलबाजीच्या काडय़ा धातूच्या असल्यामुळे त्या बराच वेळ गरम राहतात. त्या इथे- तिथे पडल्यास त्यामुळे चटका बसण्याची शक्यता असते.
*फटाके उडवून झाल्यावर ते उडवलेले फटाकेही एका बाजूला सारून ठेवावेत.
*खूप मोठा आवाज सतत कानावर आदळल्यामुळे ऐकू येण्याची शक्ती कमी होणे, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच निद्रानाशासंबंधीचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. अचानक वाढलेल्या ध्वनी प्रदूषणामुळे तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो. ध्वनी प्रदूषण करणारे फटाके न उडवणे आपल्याच हातात आहे.
डॉ. अनुज तिवारी