सकाळी झोपेतून उठल्यावर तोंडाला वास का येतो?
तोंडात तयार होणारी लाळ आपल्या नकळत तोंड स्वच्छ तर करत असतेच, पण लाळेत ऑक्सिजन असल्यामुळे तोंडातील जीवाणूंची वाढ कमी करण्याचे कामही लाळ करत असते. रात्री झोपल्यावर मात्र तोंडात कमी प्रमाणात लाळ तयार होऊन तोंड कोरडे पडते. त्यामुळे सहाजिकपणे तोंडात जीवाणू जोमाने वाढतात आणि तोंडाला घाण वास येतो. दिवसा जेव्हा आपण खात- पीत किंवा बोलत नसतो तेव्हाही अनेकदा याच पद्धतीने तोंड कोरडे पडण्याची आणि तोंडाला वास येण्याची शक्यता असते.

सकाळी उठोनी..
सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले आपण दात घासतो. दात घासण्याबरोबर जीभ स्वच्छ करणेही खूप महत्त्वाचे असते. जिभेच्या खरबरीत भागावर अन्नकण, जीवाणू, जीवाणूंनी उत्सर्जित केलेले पदार्थ आणि मृत पेशीही चिकटून राहिलेल्या असतात. हे सर्व घटक मुखदरुगधीस आमंत्रण देणारे आहेत. त्यामुळे दिवसात दोन्ही वेळा दात घासल्यानंतर जीभही टूथब्रशने घासणे आवश्यक आहे. अधिक चांगल्या परिणामासाठी जीभ घासायचे ‘टंग क्लीनर’ वापरले तरी उत्तम. दात आणि जीभ स्वच्छ केल्यावर माऊथवॉश वापरून तोंड धुतले तर तोंडाला दरुगधी येणे अधिक काळपर्यंत टाळता येईल.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

तोंड कोरडे पडू नये यासाठी..
तोंडात तयार होणाऱ्या लाळेचे महत्त्व तर आपण पाहिलेच. ही लाळ पुरेशा प्रमाणात तयार होत राहावी आणि नैसर्गिकरित्या तोंड स्वच्छ राहण्यास मदत व्हावी यासाठी काही गोष्टी करता येतील. दिवसभर भरपूर पाणी पीत राहावे.

‘च्युईंग गम’ अपायकारक
आपण जेव्हा तोंडाला ताजातवाना ‘मिंट’चा वास देणारे ‘च्युइंग गम’ चघळतो, तेव्हा थोळा वेळ अधिक प्रमाणात लाळ तयार व्हायचे काम होते खरे. पण च्युईंग गमचा उपाय तेवढय़ापुरताच उपयोगी पडतो, कारण ‘मिंट’मुळे तात्पुरता तोंडाला चांगला वास येत असला तरी च्युईंग गम जीवाणूंना मारत नाही. उलट च्युईंग गममध्ये साखर असेल तर ते जीवाणूंना मेजवानीच ठरते. त्यामुळे जीवाणूंची वाढ होते आणि ते काही विशिष्ट पदार्थ उत्सर्जित करतात. या पदार्थामुळे तोंडाला घाण वास येतोच.

इतर आजारांचा परिणाम
इतर काही आजारांमुळेही तोंडाला घाण वास येऊ शकतो. हिरडय़ाचे आजार, किडलेले दातही तोंडाला वास येण्यासाठी कारणीभूत ठरतात. श्वसनमार्गाचा संसर्ग, सायनसला होणारा संसर्ग, ब्राँकायटिस, मधुमेह तसेच यकृत आणि मूत्रपिंडाच्या काही आजारांचा संबधही तोंडाला वास येण्याशी असू शकतो. त्यामुळे असे आजार असलेल्या रुग्णांना जर तोंडाला वास येण्याची तक्रारही असेल तर त्यांनी वेळीच डॉक्टरांना त्याची कल्पना देऊन त्यासाठी काही उपाय करता येतील का हे विचारून घेणे आवश्यक आहे.

काही विशिष्ट पदार्थामुळेही मुखदरुगधी!
तोंडाला वास येण्यासाठी कारणीभूत ठरणारे पदार्थ कोणते असा विचार केल्यावर आपल्याला कच्चा कांदा आणि लसूणच प्राधान्याने आठवतो. कांदा- लसूण खाल्ल्यावर त्याचा उग्र वास तोंडाला येतो हे खरे आहे. पण केवळ या दोनच पदार्थाना दोषी ठरवणे चुकीचेच. जे पदार्थ खाताना ते तोंडाच्या आत आणि दातांवर चिकटतात त्या अन्नकणांमुळे नंतर तोंडाला वास येतो. उदा. चिकन किंवा मटणाचा तुकडा खाताना तो चावून गिळला आणि वर पाण्याचा घोट घेतला तरी तोंडाच्या आत त्याचे कण चिकटून राहिलेले असतात. प्रथिनयुक्त आणि पिष्टमय पदार्थ कमी असलेले अन्न शरीरासाठी चांगले असले तरी तोंडाला वास येण्यासाठी ते कारणीभूत ठरते.