शरीरात घाम तयार करणाऱ्या विशिष्ट ग्रंथी असतात. काखेत, जांघेत, तळहातात, तळपायातही या ग्रंथी असतात. काही जणांना ऋतू कोणताही असला तरी प्रचंड घाम येतो. या व्यक्तींचे हात नेहमी घामामुळे ओले राहतात, तर काही जणांना घाम खूप कमी येतो. घामाचा वास येणे खरे त्रासदायक असते. घामात ‘अमोनिया’ हा प्रमुख घटक असतो. या अमोनियाचे विघटन झाले की घामाला वास येतो. काहींच्या घाम तयार करणाऱ्या ग्रंथी खूप जास्त काम करतात. त्यांना अगदी वातानुकूलित खोलीत बसल्यावरही घाम येतोच.
घामाला उपाय काय?
* शरीराची नियमित स्वच्छता ठेवणे हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय.
* खूप घाम येत असेल तर त्वचा कोरडी ठेवण्यासाठी टाल्कम पावडर लावण्याचा फायदा होतो.
* काही जणांना पायाच्या बोटांमध्ये घाम येऊन ओलावा राहिल्यामुळे चिखल्या होतात. अशांनी प्रतिबंधक उपाय म्हणून पायाच्या बोटांच्या बेचक्यात टाल्कम पावडर जरूर लावावी. चिखल्या झाल्या असतील तर बुरशीला अटकाव करणारी ‘अँटीफंगल’ पावडर वापरावी.
* तळपायांना फारच घाम येत असेल तर दिवसातून दोन वेळा पायमोजे बदलावेत.
* घामाचा वास मारण्यासाठी अनेक जण ‘डीओडरंट’ मारतात. पण डीओ घाम न येण्यासाठी मदत करीत नाही हे लक्षात ठेवावे. थेट त्वचेवर डीओ मारल्यामुळे काहींना अ‍ॅलर्जी येते. सतत डीओ वापरल्यास त्या जागची त्वचा लालसर होऊ शकते, तिथे पुरळ आणि खाजही येऊ शकते.
* केसांमध्येही घाम येत असतो. या घामामुळे केसांच्या मुळांना जंतुसंसर्ग होणे, डोक्यावरच्या त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे केस वेळच्या वेळी श्ॉम्पू वापरून धुणे आणि ते पूर्ण सुकवणे आवश्यक असते. प्रसंगी ओले केस सुकवण्यासाठी ‘हेअर ड्रायर’चा वापर केला तरी चालेल. पण केस ओलसर राहू देऊ नका.
* घामाचा फारच त्रास होत असेल तर योग्य वेळी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
घामाच्या दरुगधीचा पचनाशी संबंध नाही
घामाला दरुगधी येत असेल तर त्या व्यक्तीचे पोट साफ नसणार, असे म्हटले जाते. ते खरे नाही. ‘पचन चांगले नसले तर घामाचा वास येईल आणि पोट साफ असेल तर घामाचा वास येणार नाही,’ असे नसते. घामातून बाहेर पडणाऱ्या अमोनियाचे विघटन झाले की घामाचा वास येणारच.
घामाचा असाही त्रास
क्वचित काही जणांच्या घाम तयार करणाऱ्या ग्रंथींपैकी ‘अ‍ॅपोक्राइन’ नावाच्या ग्रंथींना संसर्ग होतो. या संसर्गामुळे या ग्रंथी घाम बाहेर टाकू शकत नाहीत. घाम आतच अडकून राहिल्याने त्यात जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊन गळू तयार होते. त्या ठिकाणी सूज येऊन पू होतो. अशा वेळी प्रतिजैविके देऊन या ग्रंथी कोरडय़ा करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रतिजैविकांच्या प्रभावामुळे काही कालावधीसाठी या ग्रंथी कोरडय़ा होतात. पण पुन्हा त्यांना संसर्ग होतो. शस्त्रक्रिया करून घाम तयार करणाऱ्या ग्रंथी काढून टाकणे अवघड असल्यामुळे रुग्णांसाठी ही गोष्ट त्रासदायक ठरते. 

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे