पावसाळा म्हटलं की आपल्याला आठवते ती गरमागरम कांदाभजी आणि भाजलेले मक्याचे कणीस. पावसाळय़ात आपले खाण्यावर नियंत्रणच नसते. मात्र असे पदार्थ खाण्याने आपण आजाराला निमंत्रणच देत असतो. मात्र पावसाळ्यासाठीचे असे काही पदार्थ आहेत की ज्यामुळे आपण आजारांना दूर ठेवू शकतो.
मध
वर्षां ऋतूत अल्प प्रमाणात दररोज मध घ्यावे. शीघ्र अशी ऊर्जा देण्याचे काम मध करतो. कफाला कमी करीत मध सर्दी, खोकल्यासारख्या विकारांपासून संरक्षण देतो. आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास असणाऱ्यांनाही आजार बरा होण्यासाठी मदत करतो. सामान्य तापमानाला असलेले एक कप पाणी घेऊन त्यात एक चमचा मध मिसळून दररोज एकदा किंवा दोनदा घ्यावे. मध आणि आल्याचा रस एकत्र करून घेणेही पावसाळ्यातले बरेचसे आजार टाळण्यासाठी फायदेशीर ठरते.
संस्कृत मूगयुष
पदार्थाचे नाव जरी अवघड वाटले तरी हा पदार्थ बनवायला खूपच सोपा आहे! मूगडाळ घेऊन ती पाण्यात शिजवावी. नंतर त्याचे पाणी काढून डाळ वेगळी काढून घ्यावी. या डाळीत थोडी सुंठ पावडर आणि पिंपळी पावडर घालून परत थोडे पाणी घालून आटवावे. खिरीसारखे घट्ट झाल्यानंतर त्याला तुपाची फोडणी देऊन गरमागरम खावे. मूग पचायला हलका, शरीराचे पोषण करणारा असतो. त्यात प्रथिनेही उत्तम आहेत.

संस्कृत मांसरस
‘मूगयुष’प्रमाणेच मांसरस बनवण्याची कृती आहे. साध्या शब्दांत याला ‘चिकन सूप’ म्हणता येईल. मांसाचे म्हणजे चिकन किंवा मटणाचे तुकडे पाण्यात उकळून वेगळे काढून घ्यावे. या तुकडय़ांमध्ये पुन्हा थोडे पाणी घालून आटवावे आणि नंतर त्याला तुपाची फोडणी देऊन गरम खावे. मूगयुष आणि मांसरस हे दोन्ही पदार्थ शरीराला बल देतात आणि पचायलाही सोपे असतात.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण