News Flash

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आठ विकेट्सने विजयी

* क्रिस गेलची धडाकेबाज फलंदाजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सच्या आठ विकेट्सने पराभव केला. सामन्याला सुरुवात झाली तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी उत्तम फलंदाजीकरत रॉयल

| April 11, 2013 07:41 am

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आठ विकेट्सने विजयी

* क्रिस गेलची धडाकेबाज फलंदाजी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सच्या आठ विकेट्सने पराभव केला. सामन्याला सुरुवात झाली तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी उत्तम फलंदाजीकरत रॉयल चॅलेंजर्ससमोर १५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कोलकाता संघाची धावसंख्याजरी उत्तम झाली असली तरी, समोरील संघात क्रिस गेल असताना १५४ धावांचे लक्ष्य बंगळुरू संघासाठी अगदी कमीच आहे. असे स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या एकूण प्रतिक्रियांतून दिसत होते आणि अगदी झालेही तसेच. कॅरेबीयन खेळाडू क्रिस गेलने धाडाकेबाज फलंदाजीला सुरूवात केली. त्याच्या सोबत फलंदाजीला उतरलेल्या इतर फलंदाजांनीही त्याला उत्तम साथ दिली आणि बंगळुरू संघाने १५४ धावांचे लक्ष्य १७ व्या षटकात गाठले. आयपीएलच्या गत विजेत्या संघाचा पराभव केल्याने रॉयल चॅलेंजर्स संघामध्ये जल्लोषाचे वातावरण पाहावयास मिळाले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2013 7:41 am

Web Title: royal challengers bangalore win by eight wikets
Next Stories
1 हसी के हंगामे !
2 विजयाची घडी अशीच राहू दे !
3 विजयाची गुढी उभारण्यासाठी युवराजसह पुणे सज्ज
Just Now!
X