21 February 2019

News Flash

IPL 2018 – ‘RCB ने धोका दिला’ म्हणणारा ख्रिस गेल आता म्हणतो…

काही दिवसांपूर्वी ख्रिस गेलने बंगळुरू संघाबाबत एक गौप्यस्फोट केला होता. बंगळुरू संघ व्यवस्थापनाने त्याला धोका दिल्याचा आरोप त्याने केला होता.

वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेल सध्या पंजाब संघाकडून आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. त्याने या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. मात्र लिलाव प्रकियेदरम्यान त्याला कोणीही विकत घ्यायला तयार नव्हते. अखेर पंजाब तिसऱ्या फेरीत त्याला खरेदी केले आणि गेलने संधीचे सोने केले.

काही दिवसांपूर्वी ख्रिस गेलने बंगळुरू संघाबाबत एक गौप्यस्फोट केला होता. बंगळुरू संघ व्यवस्थापनाने त्याला धोका दिल्याचा आरोप त्याने केला होता. मी जेव्हा विचारणा केली, तेव्हा बंगळुरू संघाने मला रिटेन करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी मला रिटेनही केले नाही आणि खरेदीदेखील केले नाही, असे आरोप त्याने केले होते.

त्यातच आता बंगळुरू संघाचा एक खेळाडू मला ‘मिस’ करत आहे. माझी आठवण काढत आहे, असे ख्रिस गेल म्हणाला आहे. सोमवारी पंजाब आणि बंगळुरू या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात बंगळुरूचा संघ विजयी झाला. या सामन्यानंतर बंगळुरूचा फिरकीपटू युझवेन्द्र चहल याने खिस गेलसोबत एका फोटो काढला. या फोटोत त्या दोघांमधील मैत्री स्पष्टपणे दिसत आहे. हा फोटो चहलने इंस्टाग्रामवर शेअर केला.

Caption?

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23) on

चहलने शेअर केलेला हा फोटो पाहून गेलने त्यावर ‘तो (चहल) माझी आठवण काढत आहे’ अशी कमेंट केली. त्यावर चहलनेही ‘हो, मला नेहमीच तुझी आठवण येते. मी तुला मिस करतो’, असा रिप्लाय दिला.

First Published on May 17, 2018 1:32 pm

Web Title: chahal shares photo of chris gayle with him