26 October 2020

News Flash

IPL 2018 – दुखापतग्रस्त केदार जाधवऐवजी इंग्लंडच्या डेव्हि़ड विलीला चेन्नईच्या संघात जागा

मांडीच्या स्नायू दुखावल्यामुळे केदार जाधव उर्वरित हंगाम संघामधून बाहेर

डेव्हिड विलीला चेन्नईच्या संघात जागा

मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे अकराव्या हंगामातील आयपीएल सामन्यांवर पाणी सोडावं लागणाऱ्या, केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्ज संघाने पर्याय शोधून काढला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीची चेन्नईच्या संघात वर्णी लागलेली आहे. ३३ वर्षीय केदार जाधवने अकराव्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

डेव्हिड विलीचा काउंटी क्रिकेट क्लब यॉर्कशायरने आपल्या ट्विटर अकाउंटवर विली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार असल्याची माहिती दिली आहे.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात केलेल्या खेळीमुळे केदारला पहिल्या सामन्यात सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाजांना भरणा असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघात डेव्हिड विलीला जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 10:46 am

Web Title: ipl 2018 david willy is the replacement for kedar jadhav in chennai super kings
Next Stories
1 IPL 2018 – मुंबई इंडियन्सच्या अडचणींमध्ये वाढ, महत्वाचा गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर
2 चेपॉकवर विजयासाठी चेन्नई उत्सुक
3 IPL 2018: ‘हा’ संघ आयपीएल ट्रॉफी जिंकत रचणार इतिहास; सट्टा बाजार गरम
Just Now!
X