20 August 2019

News Flash

IPL 2018 – छापा की काटा? नेमकी नाणेफेक कोणी जिंकली? हा अभुतपूर्व गोंधळ एकदा पाहाच…

हा गोंधळ सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय बनला होता.

केन विल्यमसन - महेंद्रसिंह धोनी नाणेफेकीदरम्यान

आयपीएलच्या प्रत्येक हंगामाचा अंतिम सामना हा कोणत्या न कोणत्या कारणासाठी क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहतो. अकराव्या हंगामाच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनराईजर्स हैदराबाद या दोन संघांनी प्रवेश केला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर हा नाणेफेकीसाठी मैदानावर आला. यादरम्यान नाणेफेकीवेळी उडालेला एक अभुतपूर्व गोंधळ सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय बनला होता.

धोनीने नाणं हवेत फेकल्यानंतर, विल्यमसनने Tails म्हणजेच काटा असा कौल दिला. मात्र नाण जमिनीवर पडल्यानंतर समालोचक संजय मांजरेकर थोडेशे बुचकळ्यात पडलेले दिसले. नेमकं काय घडलं त्यावेळी पाहूयात…

( व्हिडीओ सौजन्य – आयपीएलचं अधिकृत संकेतस्थळ)

यानंतर काही क्षणातच मांजरेकर यांनी आपला गोंधळ सावरत धोनीने नाणेफेक जिंकली आहे असं जाहीर केलं. यादरम्यान पहिल्यांदा फलंदाजी करताना सनराईजर्स हैदराबाद संघाने १७८ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार केन विल्यमसन आणि कार्लोस ब्रेथवेटने फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली.

First Published on May 27, 2018 10:17 pm

Web Title: ipl 2018 final csk vs srh who won the toss in mumbai ms dhoni kane williamson confused
टॅग Csk,IPL 2018,Srh