‘कॅचेस विन मॅचेस’ अशी म्हण क्रिकेटमध्ये प्रचलित आहे. त्याचाच प्रत्यय रविवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील सामन्यात क्रिकेट चाहत्यांना एक अविस्मरणीय कॅच पाहायला मिळाली. बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने फिरकीपटू पटेलच्या गोलंदाजीवर मारलेला शॉट हा षटकारच होता. पण सीमारेषेवर उभा असलेल्या ट्रेंट बोल्टने त्या षटकाराचे रूपांतर कॅचमध्ये केले आणि कोहलीला तंबूत धाडले. अत्यंत अविश्वसनीय असा हा कॅच बोल्टने अक्षरश: एका हातात पकडला. त्याने पकडलेल्या कॅचवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. कोहली तर आश्चर्यचकित झाल्याचे दिसून आला. तिसऱ्या पंचाची मदत घेतल्यानंतर कोहली बाद झाल्याचे स्पष्ट झाले. बोल्टने एका हातात पकडलेली हा कॅच यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यातील सर्वोत्कृष्ट कॅच ठरण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावांचे लक्ष्य बेंगळुरूसमोर ठेवले होते. बेंगळुरूचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर कोहली आणि डिव्हिलयर्सने संघाला सावरले. कोहली हळूहळू फॉर्ममध्ये येत होता. त्याचवेळी फिरकीपटू पटेलच्या एका चेंडूवर कोहलीने डीप स्वेक्अरवर हवेत शॉट खेळला. प्रत्येकाला तो षटकारच वाटला. परंतु, सीमारेषेवर उभ्या असलेल्या बोल्टने चपळाई दाखवत एका हाताने कॅच पकडला. त्याचा तोल जाऊन तो सीमारेषेवर पडला असता. पण तो सीमारेषे लगतच तोल सांभाळत पडला. त्याने षटकार तर रोखलाच पण कोहलीची अत्यंत महत्वाची विकेटही घेतली. बोल्टच्या या कॅचवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. पंचांनाही निर्णय घेणे कठीण झाले होते. त्यांनाही तिसऱ्या पंचाची मदत घ्यावी लागली. अखेर तिसऱ्या पंचांनी कोहलीला बाद ठरवले. कोहलीने ३० धावा केल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 live updates latest news photos catches best catches in marathi virat kohli trent boult dd vs rcb
First published on: 21-04-2018 at 23:23 IST